Monday, April 23, 2012

पंचतत्वावर आधारित

6364523 पंचतत्वावर आधारित

ढोलकीच्या तालावर’
‘ढोलकीच्या तालावर’ या अस्सल मराठमोळ्या रिआलिटी शोने आत्तापर्यंत एकापेक्षा एक क्रिएटिव्हीटीचा वापर करून आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या शोने सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकून त्यांना घुंगरांच्या बोलावर ठेका धरायला लावलं. आता हा शो आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. सेमी फायनलचा अंतिम भाग पंचतत्वांवर आधारित आहे. सृष्टीची निर्मिती ज्या पंचमहाभूतांपासून करण्यात आली, त्या पंचतत्वांचा प्रतीकात्मक वापर करून लावणी सादर करण्यात आली आहे. लेझीम, झिम्मा, फुगडी, हुतुतू, आट्यापाट्या अशा विविध पारंपारिक खेळांचा वापर करून बहारदार लावण्या सादर केल्या आहेत. पंचतत्वांपैकी एक ‘जल’. स्नेहा वाघने जल या तत्वाचा वापर करून ‘सख्या रे, सख्या रे घायाळ मी हरिणी’ ही गाजलेली लावणी सदर केली, तर सुकन्या काळण हिने ‘अग्नि’ या पंचतत्वाचा प्रतिकात्मक वापर करून ‘ज्वानीच्या आगीची मशाल हाती’ या लोकप्रिय लावणीवर परफॉर्मन्स दिला. सोनाली पवार या लावण्यवतीने ‘वायू’ या पंचतत्वाचा वापर करून ‘गं बाई बाई झोंबतो हा गारवा’ ही लावणी सादर केली, तर ‘भूमी’ या तत्वाचा वापर करून वैशाली जाधव या नर्तकीने ‘मी सोडून सारी लाज अशी बेभान नाचले आज की घुंगरू तुटले रे’ ह्या बहारदार लावणीवर परफॉर्मन्स दिला. आऊटडोअर शूट हे या चारही लावण्यांचे खास आकर्षण आहे.
या चारीही लावण्यवतीनी रसिकांची माने जिंकून अंतिम भागात प्रवेश केला आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या ‘या रावजी बस भाऊजी’ या गाजलेल्या लावणीवर स्नेहा वाघने परफॉर्मन्स देऊन परिक्षकांची वाहवा मिळवली. सुकन्या काळण हिने ‘झाल्या तिन्ही सांजा’ ही लावणी सादर केली. सोनाली पवार या नर्तकीने ‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ ही लावणी सादर केली तर ‘मी साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहू नका’ या लावणीवर वैशाली जाधव या लावण्यवतीने परफॉर्मन्स दिला. या लावण्या सादर करून या चारीही नर्तकीनी परिक्षकांची मने जिंकली.
‘ढोलकीच्या तालावर’ या शोच्या फायनल राऊन्डमध्ये आगामी भागात प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक आपल्या नृत्याच्या माध्यमातून स्पर्धकांना शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित राहणार आहे. पंचगणीच्या tableland वर ‘गं बाई मी पतंग उडवित होते’ ही अतिशय गाजलेली लावणी सादर करण्यासाठी या लोकेशनची निवड करण्यात आली. जिथे नजर जाईल तिथे क्षितीजच दिसून येईल अर्थातच ‘आकाश’ या पंचतत्वाचा वापर करून ही लावणी सादर करण्यात आली.
आऊटडोअर लोकेशन्सवर जाऊन सादर केलेल्या लावण्या, पंचमहाभूतांवर आधारित लावण्या तसेच महाराष्ट्रातील पारंपारिक खेळांचा वापर करून सादर केलेल्या लावण्या येत्या बुधवार ४ एप्रिल आणि गुरुवार ५ एप्रिलला रात्री ९:३० वाजता ई टीव्ही मराठीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ मध्ये अवश्य पाहा

No comments:

Post a Comment