Saturday, April 21, 2012

२७ एप्रिलला 'खेळ मांडला'.

कळसुत्री बाहुल्यांचा खेळ करणार्‍या दासूची आणी त्याची मुलगी म्हणजे बाहुलीवर जीवापाड प्रेम आहे. जन्मापासूनच अंध आणि मुकबधीर असणारी त्याची बाहुलीच त्याच्या जगन्याच उद्देश आहे. बाहुलीला दिसत नाही पण दासू स्वत:च्या नजरेतून तिला जग दाखवतो. तिला बोलता येत नाही पण दासू मायेच्या प्रेमाच्या भाषेत तिचं सर्व म्हणणं समजून घेतो. अशोक नारकर निर्मित 'खेळ मांडला' हा चित्रपट २७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. 'अमृता प्रॉडक्शन' निर्मित आणि 'मिराह एण्टरटेन्मेण्ट' प्रस्तुत 'खेळ मांडला' या चित्रपटाचं दिग्दर्शन विजू माने यांनी केलं आहे.

मंगेश देसाई यांच्या सोबत प्रसाद ओक, मनसी साळवी, उदय सबनीस, उर्मिला कानेटकर, संतोष जुवेकर या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची कथा- पटकथा-संवाद विजू माने यांनी लिहीले आहेत. प्रा. अशोक बागवे, विजू माने, अभिजीत पानसे यांनी गीतरचना केली असून चिनार-महेश या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केली आहे.

No comments:

Post a Comment