Thursday, April 12, 2012

'तू तिथे मी' १६ एप्रिलपासून झी मराठीवर दाखल.

Tu Titeh Mee, Zee Marathi
रांगडा सत्यजीत आणि मंजिरी यांच लग्न अगदी ठरवून झालेलं. परस्परांशी अजिबात ओळख नसलेले हे दोन ध्रुवावरचे दोघे लग्नानंतर एकत्र येतात आणि परस्परांना सुखी करण्यासाठी वचनबद्ध होतात. खरंतर विश्वसाच्या आधारावर उभं असलेलं हे नातं प्रेमाने हळूवार उमलत जातं. विश्वासाच्या पायावर सुखी संसाराच्या घेतलेल्या या आणाभाका सत्यजित आणि मंजिरीला पूर्ण करता येतील... याचा वेध घेणारी कथा म्हणजेच 'तू तिथे मी' ही झी मराठीवरची नवी मालिका. 

या मालिकेच लेखन चिन्मय मांडलेकर यांचे असून या मालिकेत ते सत्यजीतच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर मंजिरीच्या भूमिकेत आहे आपली शमिका म्हणजेच मृणाल दुसानीस तर अन्य भूमिकांमध्ये प्रिया मराठे, विद्या करंजीकर, वंदना वाकनीस, अजय पूरकर, शर्वाणी पिल्ले आणि रमेश भाटकर प्रमुख भूमिका बजावत आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन श्रीधर पाटील करत असून छायांकन पुष्पांक गावडे यांचे आहे. शीर्षक गीताला अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे. निर्माते शशांक सोळंकी यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. 'तू तिथे मी' ही मालिका १६ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता झी मराठीवर दाखल होत आहे.

No comments:

Post a Comment