दुसरीकडे वृंदामुळे आपला लेक प्रसाद आपल्यापासून दुरावेल, या असुरक्षिततेच्या भावनेपोटी कांताकाकूंनी वृंदा आणि तिच्या कुटुंबीयांना अप्रत्यक्षपणे त्रास द्यायला सुरुवात केली. आपल्याविषयी वाटत असलेल्या असुरक्षिततेमुळे कांताकाकू प्रसादला विनाकारण स्वतःच्या पंखांखाली घेतायंत आणि त्यामुळे प्रसाद अजूनही स्वतःचं अस्तित्व नसलेल्या, आईच्या आधाराने चालणा-या शाळकरी मुलासारखा वागतोय, हे आता वृंदाला कळलंय. कांताकाकूंचे खरे रंग सर्वांसमोर उघड करण्याचं आता वृंदाने ठरवलंय. वृंदा आता मूग गिळून गप्प न बसता तिचा मूळ अवतार पुन्हा धारण करणार आहे. कांताकाकूंचं बिंग वृंदा कसं फोडेल आणि कांताकाकूंना त्यांच्या वागण्याची कोणती शिक्षा मिळेल, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा - दिल्या घरी तू सुखी राहा - सोमवार ते शनिवार संध्या.७.०० वाजता झी मराठीवर !
Thursday, April 5, 2012
वृंदाला कळले कांताकाकूंचे सत्य! 'दिल्या घरी तू सुखी रहा'.
दुसरीकडे वृंदामुळे आपला लेक प्रसाद आपल्यापासून दुरावेल, या असुरक्षिततेच्या भावनेपोटी कांताकाकूंनी वृंदा आणि तिच्या कुटुंबीयांना अप्रत्यक्षपणे त्रास द्यायला सुरुवात केली. आपल्याविषयी वाटत असलेल्या असुरक्षिततेमुळे कांताकाकू प्रसादला विनाकारण स्वतःच्या पंखांखाली घेतायंत आणि त्यामुळे प्रसाद अजूनही स्वतःचं अस्तित्व नसलेल्या, आईच्या आधाराने चालणा-या शाळकरी मुलासारखा वागतोय, हे आता वृंदाला कळलंय. कांताकाकूंचे खरे रंग सर्वांसमोर उघड करण्याचं आता वृंदाने ठरवलंय. वृंदा आता मूग गिळून गप्प न बसता तिचा मूळ अवतार पुन्हा धारण करणार आहे. कांताकाकूंचं बिंग वृंदा कसं फोडेल आणि कांताकाकूंना त्यांच्या वागण्याची कोणती शिक्षा मिळेल, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा - दिल्या घरी तू सुखी राहा - सोमवार ते शनिवार संध्या.७.०० वाजता झी मराठीवर !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment