
आर्यन क्रिएशन्स आणि ए. व्ही. ग्रुप मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘सोनी दे नखरे’ या चित्रपटातील धमाकेदार आयटम साँग ‘ए बाबु आखियाँ दो चार कर लो’ लवकरच याना गुप्तावर चित्रित करण्यात येणार आहे. एक मॉडेल म्हणून याना गुप्ताने करिअरला सुरुवात केली आणि ‘बाबूजी जरा धीरे चलो, बिजली खड़ी यहाँ बिजली खड़ी’ या दमदार आयटम साँगद्वारे आयटम गर्ल म्हणूनच तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. ‘चलो दिल्ली ‘, ‘रख्त’, ‘दम’, ‘मर्डर २’ यासारख्या चित्रपटातून आयटम गर्लच्या रूपात, आपल्या नखरेल अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी आयटम बॉम्ब, आपल्या दिलखेच अदाकारीची बरसात करायला पुन्हा एकदा येणार आहे. ’सोनी दे नखरे’ या चित्रपटाचे निर्माते अनंत कुमार गुप्ता आहेत , तर विकी खरात दिग्दर्शक आहेत. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुनिधि चौहानने हे आयटम साँग गायले आहे. ‘तेरी आँखे’ या सुपरहिट अल्बमचे संगीतकार राज आशू यांनी ते संगीतबद्ध केले आहे.’ आरक्षण’, ‘टर्निंग३०’, ‘रन वे’, ‘विकल्प’ यासारख्या चित्रपटातील गीतांचे नृत्यदिग्दर्शन करणारे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक जयेश प्रधान या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन करणार आहेत. गीतरचना मुरली अग्रवाल यांची आहे.या आयटम साँगचे चित्रीकरण लवकरच मुंबईत करण्यात येणार आहे व तेव्हा याना आपले जलवे दाखवण्यासाठी हॉट आयटम साँगवर थिरकणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत नायिकांपेक्षा आयटम गर्लचीच चलती आहे. मुन्नी, शीला, चिकनी चमेली यांच्या एक से बढकर एक धमाकेदार नृत्यांमुळे बॉलिवूडमध्ये आयटम साँगची स्पर्धा वाढते आहे. या स्पर्धेत आता बॉलिवूडची लैला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यानाची जादू बघायला मिळणार आहे.
No comments:
Post a Comment