'खेळ मांडला' ध्वनीफित प्रकाशन सोहळा संपन्न.
नियती जेव्हा कठोरतेने आपल्या नात्यांवर निष्ठूरतेने घाव घालते तेव्हा त्यातून निर्माण होणारे दु:ख हे वेदनादायक असते. नियतीच्या याच विचित्र खेळाची कथा 'खेळ मांडला' या चित्रपटातून पडद्यावर बघायला मिळणार आहे. अमृता प्रॉडक्शनस निर्मित आणि मिराह एण्टरटेन्मेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले असून त्यात मंगेश देसाई, प्रसाद ओक, मानसी साळवी, उदय सबनीस, उर्मिला कानेटकर, संतोष जुवेकर आणि अनन्या या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या संकेतस्थळाचे आणि ध्वनीफितीचे प्रकाशन ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे जिद्द विशेष शाळेमध्ये महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिद्द विशेष शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेटे, विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण, ठाणे पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी, पोलिस उपनिरिक्षक श्री. पखाले आणि चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.प्रा. अशोक बागवे, अभिजीत पानसे, विजू माने यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार खारकर, नंदेश उमप, अवधुत गुप्ते यांनी स्वरबद्ध केली आहेत आणि चिनार महेश यांनी संगीत दिले आहे.विविध चित्रपट महोत्सवांत प्रेक्षक -परीक्षकांची वाहवा मिळविलेला 'खेळ मांडला' हा चित्रपट येत्या २७ एप्रिलला राज्यभर प्रदर्शित होत आहे.
No comments:
Post a Comment