Tuesday, April 17, 2012

'बुरा ना मानो' हे नाटक लवकरच रंगभूमीवर.

सध्या रंगभूमीवर वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. त्यामुळे रंगभूमीला सुगीचे दिवस आले आहेत अस म्हणायला हरकत नाही आहे. त्यातलंच 'बुरा ना मानो' हे आगामी नाटक. 'बुरा ना मानो' या नाटकातून एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न दिग्दर्शक विजय पगारे यांनी केला आहे. आपण एका मित्राला एप्रिल फुल करतो पण या एप्रिल फुलचे भयंकर प्रकार होऊ शकतात,  हे सांगणार उत्तुंग थिएटर्स प्रस्तुत, सुमित सुरेश मोरे निर्मित 'बुरा ना मानो' एक नाटक. 

दिग्दर्शक विजय पगारे यांनी गंभीर विषय अगदी विनोदी पध्दतीने मांडला आहे. 'बुरा ना मानो' या नाटकाचे निर्मिती प्रमुख आहेत अरविंद भोंगळे, निखोल भोंगळे तर गीतकार आहेत कुणाल खाडे व विक्रांत केदार यांच्या गीताला संगीत बध्द केल आहेत हेमंत बाबरीया व कुणाल खाडे यांनी. तसेच बबन जोशी, संदीप गायकवाड, स्नेहा जोशी, अश्विनी नांदेडकर, स्वप्नील बारसकर, प्रणव कुलकर्णी, संदेश प्रभाकर, मयुरी मोहिते, सायली पावसकर, अभिजित भोसले आणि शशिकांत केरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

'बुरा ना मानो' हे कुटुंबासोबत पाहण्यासारख नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे.

No comments:

Post a Comment