या चित्रपटाचे नाव जरी 'माझी शाळा' असेल तरी त्यातील विषय मात्र सामाजिक आहे. विनोद अनंत तांबे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही त्यांनीच लिहिले आहेत. 'माझी शाळा' साठी हृषीकेश कोळी यांनी गीतलेखन केले असून सचिन-देपेश या संगीतकार जोडीने या गीतांना स्वरसाज चढवला आहे. छायाचित्रणाची जबाबदारी विनायक जाधव यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहे. कला दिग्दर्शन विजय मयेकर यांचे असून संकलनाची बाजू सुरेश नागनाले यांनी सांभाळली आहे.
एका ध्येयवेड्या शेतकऱ्याच्या मुलीची कथा या चित्रपटात पहायला मिळेल. शेतकऱ्याने शेतकरीच बनून जीवन व्यतित करावे या विचारसरणीला छेद देण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेते अरुण नलावडे मुख्य भूमिकेत असून त्यांनी रामचंद्र नावाच्या शेतकऱ्याच्या मुलाची भूमिका सरकारी आहे. या शिवाय अलका कुबल-आठल्ये, जयंत सावरकर, देवेंद्र दोडके, दिपज्योती, अशोक पावडे, बबन जोशी, संचित यादव, पूर्णिमा व्हावळ आणि बाल कलाकार आकाश वाघमोडे यांच्या 'माझी शाळा' मध्ये भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment