| मराठी चित्रपट निर्मितीत ज्या प्रमाणे नव नवीन प्रयोग होत आहेत त्याच प्रमाणे मराठी चित्रपटाच्या मार्केटिंग आणि प्रमोशन संदर्भात सुद्धा अत्याधुनीक नवनवीन प्रयोग होत आहेत. मराठी चित्रपट निर्माते आणि वितरकांना ऑनलाईन मिडिया च्या चांगलेच परिचित झाले आहेत व त्या माध्यमाचा आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी पुरे पूर उपयोग करून घेऊन, चित्रपट संदर्भीत माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यास कार्यशील आहेत. ह्याचेच उदाहरण म्हणजे ज्या प्रमाणे हॉलिवुड, बॉलिवुडमध्ये डिजिटल पोस्टर रिलीज केले जाते त्याच प्रमाणे मराठीतील पहिले डिजिटल आगामी 'बाबूरावला पकडा' ह्या चित्रपटाचे रिलिज करण्यात आले. वितरक आणि मार्केटिंग टीम च्या मते हे मराठीतील पहिलेच डिजिटल पोस्टर आहे. भरत जाधव, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर हे मराठीतले तीन सुपरस्टार्स आपल्याला 'बाबूरावला पकडा' या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. आपला | |
| चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि प्रत्येक माध्यमातून पोहचवला म्हणून हा नवीन प्रयोग करण्यात आला आहे. हिंदी सिनेमा मध्ये सुद्धा ह्या प्रकारची खूप मोजकीच उदाहरणे आहे. ( एक था टायगर, क्या कुल है हम, इशकजादे...) मराठीतील हा पहिलाच प्रयत्न म्हणता येईल. हे पोस्टर मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम चे जितेंद्र मोरे ह्यांनी डिझाईन केले असून त्यांच्या मते, "हल्ली पोस्टर्स फक्त रस्त्यांवर किवा भिंतींवर लावण्याचा काळ नाहीये. कारण बहुतांश तरुण आणि अपेक्षित प्रेक्षक आहे इंटरनेट आणि दूरदर्शन वर व्यस्त असतो. शिवाय फक्त स्टॅटिक पोस्टर पेक्षा डिजिटल पोस्टर हे ऍनिमेटेड व दृकश्राव असल्याने ते जास्त आकर्षित दिसते. ह्यात आपल्या चित्रपटातील पंच लाईन टाकून आपण ते अधिक हॅमर करु शकतो. आताचे जग हे हळू हळू Traditional methods वरून information-net-savvy होत आहे. येणाऱ्या काळात चित्रपट च्या first look sathi त्याचे digital poster चा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येईल "हे पोस्टर फेसबुक, युट्युब, सारख्या सोशिअल नेटवर्किंग वेबसाईट बरोबरच लवकर टी व्ही वर सुद्धा झळकणार आहे. डिजीटल पोस्टरच्या या अनोख्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळून सिनेमा प्रत्येकांपर्यंत पोहचवण्यात यश मिळेल असा निर्मात्यांना विश्वास आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. | |
Monday, April 30, 2012
मराठीतले डिजिटल पोस्टर 'बाबूरावला पकडा'
‘जुनागड सिटी हॉस्पिटल’ चित्रपट मुहूर्त संपन्न
‘ब्ल्यू स्काय सिनेव्हिजन ‘ प्रस्तुत , नईम आर. अन्सारी निर्मित ‘जुनागड सिटी हॉस्पिटल’ या हिंदी चित्रपटाचा मुहूर्त छत्रपती शिक्षण मंडळ, विवेकानंद विद्यालय , सेक्टर ४ सानपाडा, नवीमुंबई येथे नुकताच संपन्न झाला. यावेळेस दादासाहेब फाळके स्मृती प्रतिष्ठानचे प्रबंधक आणि चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर उपस्थित होते. त्यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. तसेच दादासाहेब फाळके यांच्या पत्नी सरस्वती फाळके यांचे देखील मोठे योगदान या क्षेत्रात असल्यामुळे त्यांच्या नावाने महिला दिग्दर्शकांना पुरस्कार देण्याची विनंती त्यांनी या वेळेस केली. यावेळेस चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक तसेच प्रमुख कलाकार मंडळी देखील उपस्थित होते. त्यांनीही चित्रपटाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आपल्या सभोवताली घडणाऱ्या अनेक घटनांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यावर चांगला वाईट परिणाम होत असतो. तर काही घटनांचा संबंध थेट समाजाशी जोडलेला असतो. आपण अनेक वेळा या घटनांवर उघडपणे बोलणे टाळतो. समाजात वावरताना अनेक गोष्टी खटकत असतानाही आपण त्याला विरोध करत नाही. तर काही वेळा या गोष्टींविरुद्ध आवाज उठवला तरी काही समाज कंटकांच्या सहाय्याने त्याची मुस्कटदाबी केली जाते. यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातो. एक अपघात म्हणून त्या घटनेकडे नंतर दुर्लक्ष केले जाते पण त्यात एका व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य पणाला लागते. त्यावेळेस माणुसकीचा, आपलेपणाचा विसर पडतो. अशावेळी आपले म्हणवणारे आपले कुटुंबीय देखील आपल्यापासून दुरावले जातात. ‘जुनागड सिटी हॉस्पिटल’ हा अशाच प्रकारचा एका मध्यमवर्गीय कुटुंबावर बेतलेला, महत्त्वपूर्ण अशा सामाजिक विषयावर भाष्य करणारा व सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे.
या चित्रपटाचे सहनिर्माते सुमंतकुमार झा असून संदीप राऊत कार्यकारी निर्माते आहेत. आदित्य गायकवाड – देशमुख यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कृष्णा गौडा, संदीप राऊत, महेश शिंदे आणि आदित्य गायकवाड – देशमुख यांनी एकत्रितपणे या चित्रपटाचे कथा – पटकथा लेखन केले आहे. जहिर कलाम यांनी संवादलेखन आणि गीतरचना केली आहे तर एन. इलनथिरैयन, परिवेशसिंग आणि दर्पण अगरवाल हे नावाजलेले संगीतकार या गीतांना संगीतबद्ध करणार आहेत. या चित्रपटाची गीते उदित नारायण, नेहा राजपाल आणि कृष्णा बिऊरा या दिग्गज गायकांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात येणार आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण तानाजी सणस करणार असून २००हून अधिक दाक्षिणात्य चित्रपटात नृत्य दिग्दर्शन करणारे तिरूभुवन यांचे नृत्यदिग्दर्शन या चित्रपटाला लाभणार आहे. शिल्पा तुळसकर, समीर धर्माधिकारी, विजू खोटे, अरुण बक्षी आणि किशोर नांदलसकर या दिग्गज कलाकारांबरोबरच ७ वर्षीय आर्य गमरे या बालकलाकाराची महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे.
‘ब्ल्यू स्काय सिनेव्हिजन ‘ प्रस्तुत , नईम आर. अन्सारी निर्मित ‘जुनागड सिटी हॉस्पिटल’ या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून एका सत्यघटनेचा आधार घेऊन माणुसकी, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न निर्माता दिग्दर्शक करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, पनवेल, नवी मुंबई तसेच अजमेर येथे करण्यात येणार आहे. हा आशयघन चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.
Sunday, April 29, 2012
खेळ मांडला
खेळ मांडला’ हा कळसूत्री बाहुल्यांच्या खेळावर आधारित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे खास आकर्षण आहे मंगेश देसाईचा अभिनय. मंगेश देसाईने यावेळेस त्याची विनोदी अभिनेत्याची इमेज मोडून , एक वेगळी, गंभीर भूमिका केली आहे. मंगेशने या चित्रपटात ‘धासू’ नावाच्या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या माणसाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला धासू आपल्या वडिलांपाशी मुंबईला जाऊन काही वेगळं काम करण्याची इच्छा व्यक्त करतो, त्यामुळे ते दोघेही मुंबईला येतात. धासूला आपली स्वप्ननगरी सुंदर आणि सरळ वाटत असते, पण प्रत्यक्षात मात्र ती मायानगरी अगदी उलटी असते. कामाच्या शोधात धासू खूप जणांकडे जातो पण त्याला कोणीही काम देत नाही. शेवटी एक दिवस धासू आपला पिढीजात कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करायला लागतो, जे बघून त्याचे वडील खुश होतात. परंतु, एका भरधाव ट्रकच्या धडकेने त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो व त्यामुळे सगळ्या आनंदाचे दुःखात परिवर्तन होते. पुढे एका दंगलीत चित्रपटाची कहाणी एक वेगळेच वळण घेते. धासूला रस्त्यात एक अनाथ मुलगी मिळते. धासू सगळ्यांकडे चौकशी करतो पण तिला कोणीच स्वीकारत नाही. हे बघून धासू स्वतः तिचं पालनपोषण करायचं ठरवतो. अशाप्रकारे धासू आपल्या वडिलांच्या मृत्युच्या धक्क्यातून सावरून एका नवीन आयुष्याची सुरुवात करतो. परंतु, धासूला आणखी एक धक्का बसतो, जेव्हा त्याला समजतं की ती मुलगी आंधळी, बहिरी आणि मुकी आहे. आता धासू तिच्या पालनपोषणाची एक नवीन पद्धत अवलंबतो. तो तिला कळसूत्री बाहुलीसारखं तयार करतो आणि त्यानंतर जिवंत कळसूत्री बाहुलीचा खेळ करायला लागतो. धासू या मुलीचं नावही बाहुली ठेवतो. इथे चित्रपटाची कहाणी परत एक वेगळं वळण घेते. एक वार्ताहर धासूचा हा खेळ आपल्या वाहिनीवर दाखवते, त्यामुळे धासू प्रसिद्ध होतो. याच बातमीला बघून एक कुटुंब बाहुलीचे आई वडील असल्याचा दावा करते. ते वार्ताहरच्या मदतीने बाहुलीला शोधायचा प्रयत्न करतात. धासूला हे अजिबात पटत नाही, त्यामुळे तो बाहुलीला घेऊन पळून जातो. शेवटी खूप विचारांती धासू बाहुलीला तिच्या कुटुंबीयांकडे द्यायला तयार होतो आणि चित्रपट संपता संपता आपले डोळे पाणावतात.
खेळ मांडला ३.५ स्टार्स
‘जीवनप्रकाश’ कादंबरीवर आधारित ‘याला जीवन ऐसे नाव’
वास्तुयोगी श्री. हरीभाऊ लिमये यांच्या ‘जीवनप्रकाश’ कादंबरीवर आधारित ‘याला जीवन ऐसे नाव’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वतः लिमये यांनीच उचलली आहे. प्रमोद प्रभाकर समेळ यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्याच्या फिल्म अँड टेलीविजन इंस्टीट्युटच्या सभागृहात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी फिल्म अँड टेलीविजन इंस्टीट्युट ऑफ इंडियाचे (FTII) राजेंद्र पाठक, लेखक-निर्माते श्री. हरिभाऊ लिमये, दिग्दर्शक प्रमोद प्रभाकर समेळ, आमदार श्री. उल्हासदादा पवार, अभिनेते विलास उजवणे हे मान्यवर उपस्थित होते. अभिनेते विलास उजवणे आणि चेतन क्षीरसागर यांच्यावर मुहूर्त दृश्य चित्रित करण्यात आले.
या चित्रपटाची निर्मिती ‘लिमये विश्वप्रकाश प्रॉडक्शन्स’च्या वतीने करण्यात येत आहे. दोन मित्रांच्या भावनिक, वैचारिक प्रवासावर हरिभाऊ लिमये लिखित ‘याला जीवन ऐसे नाव’ची कथा बेतलेली असून पटकथा-संवाद लक्ष्मीकांत विसपुते यांनी लिहिले आहेत. संगीतकार लहू माधव यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटात आनंद अभ्यंकर, विलास उजवणे, चेतन क्षीरसागर, किशोर नांदलस्कर, तेजस्विनी पाटील, किरण रोंगे, ईशा केतकर, सई कल्याणकर यांच्या भूमिका आहेत.
कामाव्यतिरिक्त आज कोणालाही कोणाशी संवाद साधायला फारसा वेळ नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात माणसं नैतिक मूल्य विसरत चालली आहेत. जो तो स्वतःच्या व्यापात मग्न आहे. अशावेळी जीवाला जीव देणारी नाती आणि मैत्री जपणं किती महत्त्वाचं आहे हा संदेश या मराठी चित्रपटातून देण्यात येणार आहे.
Saturday, April 28, 2012
‘देऊळ’च्या यशानंतर ‘देविशा’ फिल्म्सचा आगामी सिनेमा ‘भारतीय’
‘देविशा फिल्म्स’ने ‘देऊळ’ चित्रपटाची निर्मिती करून पदार्पणातच सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी दिले जाणारे सुवर्णकमळ, तीन राष्ट्रीय पुरस्कार, आणि मराठी सिनेमाला अनेक वर्षांनी शंभर दिवस पूर्ण करण्याचे भाग्य दिले. नुकतीच वरळीच्या मेफेअर हॉटेलमध्ये ‘देविशा फिल्म्स’ने आपल्या आगामी ‘भारतीय’ या चित्रपटाची घोषणा केली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते अभिजित घोलप, दिग्दर्शक गिरीश मोहिते, कथालेखक अनिरुद्ध पोतदार, संवाद लेखक संजय पवार, संगीतकार अजय-अतुल, गीतकार गुरु ठाकूर आणि संदीप खरे, सुलेखनकार अच्युत पालव तसेच या चित्रपटातील कलाकार सुबोध भावे, मकरंद अनासपुरे, मिता सावरकर, जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, कुलदीप पवार, ऋषिकेश जोशी उपस्थित होते.
निर्माते अभिजित घोलप यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर ‘भारतीय’ विषयी माहिती देताना ते म्हणाले, ” २०१०मध्ये स्थापन झालेल्या ‘देविशा फिल्म्स’च्या माध्यमातून करमणूकप्रधान पण सामाजिक भान ठेऊन केलेले चित्रपट निर्माण होतील याची मी खात्री देतो. ‘देऊळ’ह्या आमच्या पहिल्याच चित्रपट निर्मितीला जगभरातून लक्षणीय प्रतिसाद मिळाला. माझा पुढचा चित्रपट त्या अपेक्षा पूर्ण करणारा असेल असाच विषय आणि टीम आम्ही घेतली आहे. ह्या चित्रपटाचा विषय देखील राष्ट्रीय स्वरूपाचा आहे जो आम्ही मराठी ह्या भाषेत करत आहोत. “मी शिवाजीराजे” फेम संजय पवार यांचे संवाद प्रत्येकाला अंतर्मुख करतील. नटरंग नंतर अजय-अतुल यांचे मराठी चित्रपटात पुनर्पदार्पण होत असून सुबोध, मकरंद, जितेंद्र, ऋषिकेश, मिता यांच्याबरोबरच कुलदीप पवार आणि डॉ. आगाशे महत्वाच्या भूमिकेत दिसतील. चित्रपट बघताना खदाखदा हसणारे प्रेक्षक घरी गेल्यानंतर अंतर्मुख होतील हे नक्की. करमणुकीबरोबरच समाजप्रबोधन होईल असा हा मोठा चित्रपट आम्ही १०ऑगस्टला प्रदर्शित करू.”
यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते ‘भारतीय’ चित्रपटाबद्दल आपले विचार मांडताना म्हणाले, “या फिल्मचा कॅनवास खूप मोठा आहे. ही लोकल ते ग्लोबल असा प्रवास करणारी गोष्ट आहे. अनेक लेयर्स,अनेक घटना, तिरकस विनोद हे सगळा मांडताना त्यात एक खूप मोठा चालेंज असणार आहे. हा एक संपूर्ण भारतीय सिनेमा असणार आहे. ‘देविशा’ फिल्म्स बद्दल सांगायचं तर निर्माता तोच परफेक्ट असतो ज्याला उत्तम फिल्म बनवण्याबरोबर पूरक मार्केटिंगही करता येतं आणि हे सगळं अभिजीतना चांगलं जमलंय, म्हणूनच ही फिल्म आणि ही निर्मितीसंस्था माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत.”
‘भारतीय’विषयी बोलताना या चित्रपटाचे संवाद लेखक संजय पवार म्हणाले, “मी जेव्हा अनिरुद्धची ही कथा ऐकली तेव्हा इंस्टंटली मला या प्रोजेक्टवर काम करावंसं वाटलं. आपल्या भारतीय असण्याची जी मजा आहे ती मांडताना मला खूप मजा येतेय.”
‘भारतीय’द्वारे अजय-अतुल तब्बल तीन वर्षांनी पुन्हा मराठी संगीत रसिकांना भेट देणार आहेत. मराठीत परत काम करण्यासाठी त्यांनी खास भारतीय याच चित्रपटाची निवड केली. याविषयी बोलताना अतुल म्हणाले, “परत एकदा मराठीत येण्यासाठी एखाद्या चांगल्या स्क्रिप्टची आम्ही वाट बघत होतो. या चित्रपटाची कथाच फार छान आहे, शिवाय यात आम्हालाही काहीतरी वेगळं करण्याचा आनंद आहे. ‘देविशा’फिल्म्ससाठी खरंतर ‘देऊळ’च्याच वेळेस आम्हाला काम करायचं होतं पण हिंदीतल्या आमच्या कमिटमेंटमुळे ते आम्ही करू शकलो नाही पण आता जेव्हा अभिजीतने आम्हाला या प्रोजेक्टबद्दल सांगितले तेव्हा हे आपण करायचंच असं आम्ही ठरवलं.”
यानंतर अत्यंत अभिनव पद्धतीने ‘the new common-man’ या ‘mascot’चे अनावरण करून या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली. हा नवीन ‘भारतीय’ आजच्या काळातील सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे चित्रपटाचे निर्माते अभिजित घोलप यांनी जाहीर केले.
नंतर अभिनेता सुबोध भावे याने ‘भारतीय’विषयी त्याचे विचार मांडले, ” मुळात मला या चित्रपटाची कथाच खूप आवडली आणि त्याबरोबरच गिरीश सोबत चित्रपट करायला मिळणार होता कारण गिरीश हा माझा लाडका दिग्दर्शक आहे. त्याच्या सोबत इतर खूप कामं केली असली तरी चित्रपट करायला मिळण्याची ही पहिलीच संधी आहे. पहिलीच निर्मिती असलेल्या ‘देऊळ’ला जे यश अभिजित घोलप यांनी मिळवून दिलंय त्यामुळे अभिजित सोबत काम करण्याची एक छान संधी मला मिळाली. आणखी आम्ही एकाच शाळेचे विद्यार्थी असल्यामुळे ते कनेक्शनही होतंच. भारतीय असण्याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान असतो तसा मलाही आहे. इतकाच काय पुढच्या जन्मी आणि त्याच्या पुढच्या जन्मीही परत परत भारतीय म्हणूनच जन्माला यायला मला आवडेल.”
मकरंद अनासपुरे ‘भारतीय’बद्दल मत मांडताना म्हणाले, “संजयचं लिखाण आणि गिरीशचं दिग्दर्शन या दोन गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे मला हा चित्रपट करावासा वाटलं. ‘टिकल ते पोलिटिकल’ करत असताना मी संजय सोबत बरंच काम केलंय. शिवाय गिरीश सोबत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ करतानाही फार मजा आली होती. त्यामुळे या दोघांचा मिळून असणारा चित्रपट भन्नाट असणारच या विषयी शंका नव्हती. सोबतच ‘देऊळ’च्या यशानंतर अभिजीत घोलप यांचा हा दुसरा सिनेमा आहे. ते या चित्रपटाचे निर्माते असल्याने या चित्रपटाच्या यशाबद्दलही मला खात्रीच आहे. ‘भारतीय’ ही एक युनिव्हर्सल संकल्पना आहे आणि ती युनिव्हर्सल आणि युनिक असणंच खूप महत्त्वाचं आहे. तिला तुकड्या तुकड्यात विभागून चालणारच नाहीये.”
यानंतर ‘भारतीय’ बद्दल सांगताना डॉ. मोहन आगाशे म्हणाले, “एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट असूनही तो वेगळा नाहीये. आज चित्रपटाची घोषणा करत असतानाच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित केली जातेय, मराठी सिनेमासाठी ही एक नवीन बाब आहे. जुन्या पिढीतला असल्याने या गोष्टीचं माझ्यावर नाही म्हणलं तरी थोडं दडपण आहेच पण अभिजीत घोलप हे या चित्रपटाचे निर्माते असल्याने मी आश्वस्तही आहे, आतापर्यंत ते जे बोलतात ते करूनही दाखवतात असाच अनुभव आहे.”
जितेंद्र जोशी या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले, “या चित्रपटासाठी जेव्हा मला विचारण्यात आले तेव्हा मला संजय कडून एक मेसेज मिळाला, तो असा होता ‘मित्रा जे चाललंय आणि घडतंय त्याला उत्तर देण्याची धमक असेल तर या चित्रपटाचा तू नक्की विचार कर’ आणि मी हा चित्रपट करायचाच असं ठरवलं.”
‘भारतीय’मधील आपल्या भूमिकेविषयी बोलताना मिता म्हणाली, ” या चित्रपटातून गावातल्या मिलीची भूमिका मी करणार आहे आणि असं असलं तरीही नेहमीच्या गाव की गोरी भूमिकेपेक्षा ही वेगळी असणार आहे इतकंच मी आत्ता सांगणार आहे.”
या चित्रपटाची कथा ज्यांना सुचली ते अनिरुद्ध पोतदार नंतर म्हणाले, “साधारणतः तीन वर्षांपूर्वी मला ही कथा सुचली. एक भारतीय म्हणून जगताना मी स्वतः भारतीय असण्याचे अनेक कंगोरे अनुभवलेत. रस्त्यातील खड्ड्यातून जाताना मी वेगळा भारतीय असतो, सचिन तेंडूलकर सेन्चुरी मारतो तेव्हा मी एक वेगळाच भारतीय असतो. असे भारतीयपणाचे वेगवेगळे पैलू यात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. गिरीश सारखा दिग्दर्शक आणि अभिजीत घोलप यांसारखा एक जाणकार निर्माता माझ्या कथेला एका उंचीवर नेतील याबद्दल मला खात्रीच आहे.”
या चित्रपटाचे प्रसिद्धीकार आणि या वर्षीच्या राज्य पुरस्कारात ‘देऊळ’साठीच उत्कृष्ट जाहिरातीचा पुरस्कार प्राप्त करणारे प्रसिद्ध सुलेखनकार अच्च्युत पालव यांनी ‘भारतीय’ या त्यांच्या संकल्पनेविषयी माहिती देताना सांगितले, “आजच्या युवकांच्या सैरभैर आणि गोंधळलेल्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय, हिंदुस्थानी, इंडियन अशी अनेक नावं असणारा तरीही भारतीय असणारा, आजूबाजूच्या परिस्थितीने भरकटून गेलेला आणि चौफेर घडणाऱ्या घटनांची जाणीव असावी लागते याची जाणीव झालेला असं हा mascot ‘भारतीय’ या चित्रपटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी साकारला गेला आहे. ‘देविशा फिल्म्स’बरोबर ‘देऊळ’ हा माझा पहिला चित्रपट. काम करताना खूप आनंद वाटला. ‘देऊळ’सारखा एक वेगळा विषय, चांगला दिग्दर्शक आणि निर्मात्याने माझ्यासारख्या कलाकाराला जाहिरात करण्यासाठी दिलेलं स्वातंत्र्य यामुळे काम करायला खूप मजा आली ज्यामुळे यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट जाहिरातीचा पुरस्कार मला मिळाला.”
याप्रसंगी उपस्थित पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी चित्रपटाच्या कलाकार आणि तंत्रज्ञांकडून चित्रपटाविषयी अधिक माहिती मिळवली.
आपलं ‘भारतीय’ असणं म्हणजे नेमकं काय याचा शोध घेण्याचा एक मार्मिक प्रयत्न म्हणजे ‘देविशा’ फिल्म्सचा नवीन चित्रपट ‘भारतीय.’ मनोरंजनासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्याच्या आपल्या शब्दांवर परत एकदा खरे उतरण्यासाठी ‘देविशा फिल्म्स’, ‘भारतीय’ या चित्रपटासोबत सज्ज झाली आहे. मराठी रसिकांसाठी ‘देविशा फिल्म्स’चा आगामी चित्रपट ‘भारतीय’ हा विचार आणि मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे.
निर्माते अभिजित घोलप यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर ‘भारतीय’ विषयी माहिती देताना ते म्हणाले, ” २०१०मध्ये स्थापन झालेल्या ‘देविशा फिल्म्स’च्या माध्यमातून करमणूकप्रधान पण सामाजिक भान ठेऊन केलेले चित्रपट निर्माण होतील याची मी खात्री देतो. ‘देऊळ’ह्या आमच्या पहिल्याच चित्रपट निर्मितीला जगभरातून लक्षणीय प्रतिसाद मिळाला. माझा पुढचा चित्रपट त्या अपेक्षा पूर्ण करणारा असेल असाच विषय आणि टीम आम्ही घेतली आहे. ह्या चित्रपटाचा विषय देखील राष्ट्रीय स्वरूपाचा आहे जो आम्ही मराठी ह्या भाषेत करत आहोत. “मी शिवाजीराजे” फेम संजय पवार यांचे संवाद प्रत्येकाला अंतर्मुख करतील. नटरंग नंतर अजय-अतुल यांचे मराठी चित्रपटात पुनर्पदार्पण होत असून सुबोध, मकरंद, जितेंद्र, ऋषिकेश, मिता यांच्याबरोबरच कुलदीप पवार आणि डॉ. आगाशे महत्वाच्या भूमिकेत दिसतील. चित्रपट बघताना खदाखदा हसणारे प्रेक्षक घरी गेल्यानंतर अंतर्मुख होतील हे नक्की. करमणुकीबरोबरच समाजप्रबोधन होईल असा हा मोठा चित्रपट आम्ही १०ऑगस्टला प्रदर्शित करू.”
यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते ‘भारतीय’ चित्रपटाबद्दल आपले विचार मांडताना म्हणाले, “या फिल्मचा कॅनवास खूप मोठा आहे. ही लोकल ते ग्लोबल असा प्रवास करणारी गोष्ट आहे. अनेक लेयर्स,अनेक घटना, तिरकस विनोद हे सगळा मांडताना त्यात एक खूप मोठा चालेंज असणार आहे. हा एक संपूर्ण भारतीय सिनेमा असणार आहे. ‘देविशा’ फिल्म्स बद्दल सांगायचं तर निर्माता तोच परफेक्ट असतो ज्याला उत्तम फिल्म बनवण्याबरोबर पूरक मार्केटिंगही करता येतं आणि हे सगळं अभिजीतना चांगलं जमलंय, म्हणूनच ही फिल्म आणि ही निर्मितीसंस्था माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत.”
‘भारतीय’विषयी बोलताना या चित्रपटाचे संवाद लेखक संजय पवार म्हणाले, “मी जेव्हा अनिरुद्धची ही कथा ऐकली तेव्हा इंस्टंटली मला या प्रोजेक्टवर काम करावंसं वाटलं. आपल्या भारतीय असण्याची जी मजा आहे ती मांडताना मला खूप मजा येतेय.”
‘भारतीय’द्वारे अजय-अतुल तब्बल तीन वर्षांनी पुन्हा मराठी संगीत रसिकांना भेट देणार आहेत. मराठीत परत काम करण्यासाठी त्यांनी खास भारतीय याच चित्रपटाची निवड केली. याविषयी बोलताना अतुल म्हणाले, “परत एकदा मराठीत येण्यासाठी एखाद्या चांगल्या स्क्रिप्टची आम्ही वाट बघत होतो. या चित्रपटाची कथाच फार छान आहे, शिवाय यात आम्हालाही काहीतरी वेगळं करण्याचा आनंद आहे. ‘देविशा’फिल्म्ससाठी खरंतर ‘देऊळ’च्याच वेळेस आम्हाला काम करायचं होतं पण हिंदीतल्या आमच्या कमिटमेंटमुळे ते आम्ही करू शकलो नाही पण आता जेव्हा अभिजीतने आम्हाला या प्रोजेक्टबद्दल सांगितले तेव्हा हे आपण करायचंच असं आम्ही ठरवलं.”
यानंतर अत्यंत अभिनव पद्धतीने ‘the new common-man’ या ‘mascot’चे अनावरण करून या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली. हा नवीन ‘भारतीय’ आजच्या काळातील सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे चित्रपटाचे निर्माते अभिजित घोलप यांनी जाहीर केले.
नंतर अभिनेता सुबोध भावे याने ‘भारतीय’विषयी त्याचे विचार मांडले, ” मुळात मला या चित्रपटाची कथाच खूप आवडली आणि त्याबरोबरच गिरीश सोबत चित्रपट करायला मिळणार होता कारण गिरीश हा माझा लाडका दिग्दर्शक आहे. त्याच्या सोबत इतर खूप कामं केली असली तरी चित्रपट करायला मिळण्याची ही पहिलीच संधी आहे. पहिलीच निर्मिती असलेल्या ‘देऊळ’ला जे यश अभिजित घोलप यांनी मिळवून दिलंय त्यामुळे अभिजित सोबत काम करण्याची एक छान संधी मला मिळाली. आणखी आम्ही एकाच शाळेचे विद्यार्थी असल्यामुळे ते कनेक्शनही होतंच. भारतीय असण्याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान असतो तसा मलाही आहे. इतकाच काय पुढच्या जन्मी आणि त्याच्या पुढच्या जन्मीही परत परत भारतीय म्हणूनच जन्माला यायला मला आवडेल.”
मकरंद अनासपुरे ‘भारतीय’बद्दल मत मांडताना म्हणाले, “संजयचं लिखाण आणि गिरीशचं दिग्दर्शन या दोन गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे मला हा चित्रपट करावासा वाटलं. ‘टिकल ते पोलिटिकल’ करत असताना मी संजय सोबत बरंच काम केलंय. शिवाय गिरीश सोबत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ करतानाही फार मजा आली होती. त्यामुळे या दोघांचा मिळून असणारा चित्रपट भन्नाट असणारच या विषयी शंका नव्हती. सोबतच ‘देऊळ’च्या यशानंतर अभिजीत घोलप यांचा हा दुसरा सिनेमा आहे. ते या चित्रपटाचे निर्माते असल्याने या चित्रपटाच्या यशाबद्दलही मला खात्रीच आहे. ‘भारतीय’ ही एक युनिव्हर्सल संकल्पना आहे आणि ती युनिव्हर्सल आणि युनिक असणंच खूप महत्त्वाचं आहे. तिला तुकड्या तुकड्यात विभागून चालणारच नाहीये.”
यानंतर ‘भारतीय’ बद्दल सांगताना डॉ. मोहन आगाशे म्हणाले, “एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट असूनही तो वेगळा नाहीये. आज चित्रपटाची घोषणा करत असतानाच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित केली जातेय, मराठी सिनेमासाठी ही एक नवीन बाब आहे. जुन्या पिढीतला असल्याने या गोष्टीचं माझ्यावर नाही म्हणलं तरी थोडं दडपण आहेच पण अभिजीत घोलप हे या चित्रपटाचे निर्माते असल्याने मी आश्वस्तही आहे, आतापर्यंत ते जे बोलतात ते करूनही दाखवतात असाच अनुभव आहे.”
जितेंद्र जोशी या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले, “या चित्रपटासाठी जेव्हा मला विचारण्यात आले तेव्हा मला संजय कडून एक मेसेज मिळाला, तो असा होता ‘मित्रा जे चाललंय आणि घडतंय त्याला उत्तर देण्याची धमक असेल तर या चित्रपटाचा तू नक्की विचार कर’ आणि मी हा चित्रपट करायचाच असं ठरवलं.”
‘भारतीय’मधील आपल्या भूमिकेविषयी बोलताना मिता म्हणाली, ” या चित्रपटातून गावातल्या मिलीची भूमिका मी करणार आहे आणि असं असलं तरीही नेहमीच्या गाव की गोरी भूमिकेपेक्षा ही वेगळी असणार आहे इतकंच मी आत्ता सांगणार आहे.”
या चित्रपटाची कथा ज्यांना सुचली ते अनिरुद्ध पोतदार नंतर म्हणाले, “साधारणतः तीन वर्षांपूर्वी मला ही कथा सुचली. एक भारतीय म्हणून जगताना मी स्वतः भारतीय असण्याचे अनेक कंगोरे अनुभवलेत. रस्त्यातील खड्ड्यातून जाताना मी वेगळा भारतीय असतो, सचिन तेंडूलकर सेन्चुरी मारतो तेव्हा मी एक वेगळाच भारतीय असतो. असे भारतीयपणाचे वेगवेगळे पैलू यात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. गिरीश सारखा दिग्दर्शक आणि अभिजीत घोलप यांसारखा एक जाणकार निर्माता माझ्या कथेला एका उंचीवर नेतील याबद्दल मला खात्रीच आहे.”
या चित्रपटाचे प्रसिद्धीकार आणि या वर्षीच्या राज्य पुरस्कारात ‘देऊळ’साठीच उत्कृष्ट जाहिरातीचा पुरस्कार प्राप्त करणारे प्रसिद्ध सुलेखनकार अच्च्युत पालव यांनी ‘भारतीय’ या त्यांच्या संकल्पनेविषयी माहिती देताना सांगितले, “आजच्या युवकांच्या सैरभैर आणि गोंधळलेल्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय, हिंदुस्थानी, इंडियन अशी अनेक नावं असणारा तरीही भारतीय असणारा, आजूबाजूच्या परिस्थितीने भरकटून गेलेला आणि चौफेर घडणाऱ्या घटनांची जाणीव असावी लागते याची जाणीव झालेला असं हा mascot ‘भारतीय’ या चित्रपटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी साकारला गेला आहे. ‘देविशा फिल्म्स’बरोबर ‘देऊळ’ हा माझा पहिला चित्रपट. काम करताना खूप आनंद वाटला. ‘देऊळ’सारखा एक वेगळा विषय, चांगला दिग्दर्शक आणि निर्मात्याने माझ्यासारख्या कलाकाराला जाहिरात करण्यासाठी दिलेलं स्वातंत्र्य यामुळे काम करायला खूप मजा आली ज्यामुळे यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट जाहिरातीचा पुरस्कार मला मिळाला.”
याप्रसंगी उपस्थित पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी चित्रपटाच्या कलाकार आणि तंत्रज्ञांकडून चित्रपटाविषयी अधिक माहिती मिळवली.
आपलं ‘भारतीय’ असणं म्हणजे नेमकं काय याचा शोध घेण्याचा एक मार्मिक प्रयत्न म्हणजे ‘देविशा’ फिल्म्सचा नवीन चित्रपट ‘भारतीय.’ मनोरंजनासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्याच्या आपल्या शब्दांवर परत एकदा खरे उतरण्यासाठी ‘देविशा फिल्म्स’, ‘भारतीय’ या चित्रपटासोबत सज्ज झाली आहे. मराठी रसिकांसाठी ‘देविशा फिल्म्स’चा आगामी चित्रपट ‘भारतीय’ हा विचार आणि मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे.
Friday, April 27, 2012
स्त्री-देहाचं राजकारण मांडणाऱ्या कथा
स्त्रीच्या हृदयाव्यतिरिक्त शरीराच्या इतर अवयवांनाही अस्तित्व असतं; हे अवयव तिच्या भावविश्वाशी कसे आणि किती खोलवर निगडीत असू शकतात, याचं अनोखं प्रत्यंतर या कथा वाचताना येतं. स्त्रीला नेहमी गृहीत धरणारा, तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व नाकारणारा समाज तसेच तिची घुसमटही या कथांमध्ये स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे. स्त्रीच्या नैसर्गिक उर्मी, संवेदना, चेतना कायम बाजूला सारून तिला एक चौकटबद्ध दुय्यम आयुष्य जगायला भाग पडणारी समाजाची मानसिकता या कथांमधून सतत जाणवत राहते. स्वतःच्या निखळ अभिव्यक्तीसाठी धडपडणारी आणि स्वतःच्या शरीराशी तादाम्य साधत, आपल्या बरोबरच्या इतर स्त्रियांना समजून घेण्याचा प्रयत्न करत, त्यांनाही जगण्याचा वेगळा मंत्र देत समाजव्यवस्थेच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न करणारी या कथांमधली प्रत्येक तेजस्विनी नायिका वाचकाला विचार करायला लावते.
मनोविकास प्रकाशनाच्या ‘भारतीय लेखिका’ या मालिकेतील हे पुस्तक आहे. यातील कथा देहाशी निगडीत असून, देहापल्याड घेऊन जाणाऱ्या आहेत. देहापल्याड जाऊन स्त्रीच्या अस्तित्वाचा एक व्यक्ती म्हणून शोध घेणाऱ्या या कथा आहेत. एक वेगळं जग या कथांमधून बाहेर येतं. अनुवाद सरस असून मराठीशी एकजीव झालेल्या या कथा आहेत, हे जाणवते.
Thursday, April 26, 2012
'जीवनप्रकाश' कादंबरीवर आधारित 'याला जीवन ऐसे नाव'
आजच्या धावपळीच्या जीवनात माणस नैतिक मूल्य विसरत चालली आहेत. कामाव्यतिरिक्त कुणाला कुणाशी संवाद साधायला ही फारसा वेळ नाही आहे. जो तो स्वत:च्या व्यापात मग्न आहे. अश्यावेळी जीवाला जीव देणारी नाती आणि मैत्री जपण किती महत्वाचे आहे हे सांगू पाहणाऱ्या मराठी चित्रपटाची निर्मिती 'लिमये विश्वप्रकाश प्रोडक्शन्स' च्या वतीने करण्यात येतेय. वास्तुयोगी श्री. हरिभाऊ लिमये यांच्या 'जीवनप्रकाश ' कादंबरीवर 'याला जीवन ऐसे नाव' हा चित्रपट आधारित असून लिमये यांनी स्वत:च या चित्रपट निर्मितीची धुरा उचलली आहे.
प्रमोद प्रभाकर समेळ यांचे दिग्दर्शन असलेल्या 'याला जीवन ऐसे नाव' चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्याच्या Film & Television Instituteच्या सभागृहात जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते क्लप देऊन करण्यात आला. या प्रसंगी FTII चे राजेंद्र पाठक, लेखक - निर्माते श्री. हरिभाऊ लिमये, दिग्दर्शक प्रमोद प्रभाकर समेळ, आमदार श्री उल्हासदादा पवार, अभिनेते विलास उजवणे हे मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अभिनेते विलास उजवणे आणि चेतन क्षीरसागर ह्यांच्यावर मुहूर्त दृशा चित्रित करण्यात आले.
दोन मित्रांच्या भावनिक, वैचारिक प्रवासावर हरिभाऊ लिमये लिखित 'याला जीवन ऐसे नाव' ची कथा बेतलेली असून पटकथा - संवाद लक्ष्मीकांत विसपुते यांनी लिहिले आहेत. संगीतकार लहू माधव यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. आनंद अभ्यंकर, विलास उजवणे, चेतन क्षीरसागर, किशोर नांदलस्कर, तेजस्विनी पाटील, किरण रोंगे, इशा केतकर, सई कल्याणकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.
Singularity : मराठी कलाकारांची हॉलीवूडमध्ये भरारी
‘Singularity’ मध्ये अभय देओल, बिपाशा बसू, मिलिंद गुणाजी यांच्याबरोबरच अतुल कुलकर्णी एका ठळक भूमिकेत दिसणार आहे. या फिल्म संदर्भात मिलिंद गुणाजीशी संपर्क केला असता मिलिंद मनमोकळेपणाने बोलला. मिलिंद म्हणाला की फार पूर्वी Roland Joffe भारतात आला असताना आणि त्याला महाराष्ट्रातील लोकेशन्स दाखवताना मिलिंद अभिनेता असल्याचं कळलं. मिलिंद तेव्हाच त्याला आवडला होता, तसंच त्याची ‘शो रील’ ही आवडली होती. साधारण दीड वर्षापूर्वी त्याने परत मिलिंदशी संपर्क करून त्याला ‘Singularity’ मधील ‘शिव’ या maratha warrior च्या रोलसाठी साईन केलं. मिलींदची पहिली हिंदी फिल्म ‘द्रोहकाल’मध्येही मिलींदची ‘शिव’ नावाचीच व्यक्तिरेखा होती. भूमिका प्रभावशाली होती पण मिलिंदला एकही संवाद नव्हता. योगायोगाने ‘Singularity’ मध्येही मिलिंद ‘शिव’च साकारतोय आणि या फिल्ममध्येही त्याला तुरळक संवाद आहेत. मिलिंदचा रोल फार मोठा नसला तरी पूर्ण सिनेमामध्ये हा handsome अभिनेता आपल्याला बघायला मिळणार आहे. सिनेमाचे मेकअपमन Paul Pattison, ज्यांनी Mel Gibson चा मेकअप यापूर्वी केला आहे, त्यांनाही मिलिंदचा face fabulous वाटतो. मिलींदची उंची आणि व्यक्तिमत्व हॉलीवूड फिल्म्ससाठी उत्तम असल्यामुळे Roland त्याला पुढच्या प्रोजेक्टसाठीही sign करेल.
‘Singularity’ लवकरच रिलीज होणार आहे, त्यापूर्वी मे २०१२मध्ये ६५ व्या वार्षिक कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये तो दाखवण्यात येईल.
Tuesday, April 24, 2012
‘खेळ मांडला’
‘अमृता प्रॉडक्शन्स’ निर्मित आणि ‘मिराह एन्टरटेनमेंट’ प्रस्तुत ‘खेळ मांडला’ या चित्रपटात नियतीच्या लपंडावाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपलं आयुष्य एक रंगमंच असून आपण रंगमंचावरील कलाकार आहोत कारण प्रत्येकालाच आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका निभवाव्या लागतात. कधी पदरी सुख पडते तर कधी निराशा. या सगळ्याचेच धागे नियतीच्या हातात असतात. हीच नियती जेव्हा कठोरपणे आपल्या नात्यांवर घाव घालते तेव्हा त्यातून निर्माण होणारे दुःख वेदनादायक असते. नियतीच्या या कठोर खेळाची गोष्ट आपल्याला ‘खेळ मांडला’मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून बाप लेकीच्या भावस्पर्शी नात्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
चित्रपटाची कथा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या दासूची आणि त्याच्या मुलीची आहे. बाहुल्यांच्या जगात वावरणाऱ्या आणि निर्जीव बाहुल्यांनाही आपल्या कलेने जिवंत करणाऱ्या दासूने आपल्या मुलीचं नावही बाहुली ठेवलं आहे. तिला आपल्या वडिलांचे मायेचे शब्द ऐकता येत नाहीत की त्यांच्या डोळ्यातील प्रेमही टिपता येत नाही कारण दासूची ही बाहुली जिवंत असली तरी ती जन्मजात मूक-बधीर आणि आंधळी आहे. तिला फक्त स्पर्शाची भाषा कळते. दासू तिच्यावर जीवापाड प्रेम करत तिला एखाद्या बाहुलीप्रमाणे जपतो. बाहुलीच त्याच्या जगण्याचा उद्देश आहे. कळसूत्री बाहुल्यांचे खेळ करत तो आपल्या लाडक्या बहुलीलाही या खेळत सामील करून घेतो आणि आपल्या हातातील दोऱ्यांच्या साहाय्याने तिला एक नवीन भाषा समजावून सांगतो. या दोरीनेच बांधल्या गेलेल्या मायेच्या या नात्यावर नियतीची वाईट दृष्टी पडते आणि तिच्या विचित्र खेळामध्ये दासूच्या आयुष्याची घडी विस्कटून जाते. मंगेश देसाई, प्रसाद ओक, मानसी साळवी, उदय सबनीस, उर्मिला कानेटकर, संतोष जुवेकर आणि अनन्या या कलाकारांच्या ‘खेळ मांडला’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
चित्रपटात एकून तीन गाणी असून ती चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केली आहेत. ‘चांदन्याच्या रथामंदी’ हे गीत प्रा. अशोक बागवे यांनी लिहिलं असून ते चिनार खारकर यांनी गायले आहे तर ‘कौन संग बांधे डोर’ या अभिजीत पानसेंच्या गीताला नंदेश उमप यांनी स्वरबद्ध केलं आहे. विजू माने यांनी या कथेचं सार मांडणारं ‘खेळ मांडला’ हे अर्थपूर्ण गीत लिहिलं असून अवधूत गुप्ते यांनी ते स्वरबद्ध केलं आहे. अतिशय संवेदनशील आणि भावस्पर्शी कथानक असलेल्या या चित्रपटाचे संगीतही कथेला साजेसंच आहे.
चित्रपटात दासूची मध्यवर्ती भूमिका मंगेश देसाई या गुणी अभिनेत्याने साकारली असून या चित्रपटाच्या निमित्ताने तो प्रथमच एका गंभीर भूमिकेत दिसणार आहे. दासूच्या मूक-बधीर, अंध मुलीची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे अनन्या या छोट्या मुलीने. चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी यापूर्वी ती ‘रात्र’, ‘शर्यत’ सारखे वेगळे चित्रपट दिले आहेत. ‘खेळ मांडला’ या चित्रपटाद्वारेही अतिशय वेगळा विषय मांडण्याचं धाडस त्यांनी केलं आहे.
‘मुंबई पुणे मुंबई’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘फक्त लढ म्हणा’ असे एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या ‘मिराह एन्टरटेनमेंट’च्या ‘खेळ मांडला’ या नवीन कलाकृतीने विविध चित्रपट महोत्सवात प्रेक्षक-परीक्षकांची वाहवा मिळवली आहे. हा चित्रपट येत्या २७ एप्रिलला चित्रपटगृहात दाखल होत आहे.
चित्रपटाची कथा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या दासूची आणि त्याच्या मुलीची आहे. बाहुल्यांच्या जगात वावरणाऱ्या आणि निर्जीव बाहुल्यांनाही आपल्या कलेने जिवंत करणाऱ्या दासूने आपल्या मुलीचं नावही बाहुली ठेवलं आहे. तिला आपल्या वडिलांचे मायेचे शब्द ऐकता येत नाहीत की त्यांच्या डोळ्यातील प्रेमही टिपता येत नाही कारण दासूची ही बाहुली जिवंत असली तरी ती जन्मजात मूक-बधीर आणि आंधळी आहे. तिला फक्त स्पर्शाची भाषा कळते. दासू तिच्यावर जीवापाड प्रेम करत तिला एखाद्या बाहुलीप्रमाणे जपतो. बाहुलीच त्याच्या जगण्याचा उद्देश आहे. कळसूत्री बाहुल्यांचे खेळ करत तो आपल्या लाडक्या बहुलीलाही या खेळत सामील करून घेतो आणि आपल्या हातातील दोऱ्यांच्या साहाय्याने तिला एक नवीन भाषा समजावून सांगतो. या दोरीनेच बांधल्या गेलेल्या मायेच्या या नात्यावर नियतीची वाईट दृष्टी पडते आणि तिच्या विचित्र खेळामध्ये दासूच्या आयुष्याची घडी विस्कटून जाते. मंगेश देसाई, प्रसाद ओक, मानसी साळवी, उदय सबनीस, उर्मिला कानेटकर, संतोष जुवेकर आणि अनन्या या कलाकारांच्या ‘खेळ मांडला’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
चित्रपटात एकून तीन गाणी असून ती चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केली आहेत. ‘चांदन्याच्या रथामंदी’ हे गीत प्रा. अशोक बागवे यांनी लिहिलं असून ते चिनार खारकर यांनी गायले आहे तर ‘कौन संग बांधे डोर’ या अभिजीत पानसेंच्या गीताला नंदेश उमप यांनी स्वरबद्ध केलं आहे. विजू माने यांनी या कथेचं सार मांडणारं ‘खेळ मांडला’ हे अर्थपूर्ण गीत लिहिलं असून अवधूत गुप्ते यांनी ते स्वरबद्ध केलं आहे. अतिशय संवेदनशील आणि भावस्पर्शी कथानक असलेल्या या चित्रपटाचे संगीतही कथेला साजेसंच आहे.
चित्रपटात दासूची मध्यवर्ती भूमिका मंगेश देसाई या गुणी अभिनेत्याने साकारली असून या चित्रपटाच्या निमित्ताने तो प्रथमच एका गंभीर भूमिकेत दिसणार आहे. दासूच्या मूक-बधीर, अंध मुलीची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे अनन्या या छोट्या मुलीने. चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी यापूर्वी ती ‘रात्र’, ‘शर्यत’ सारखे वेगळे चित्रपट दिले आहेत. ‘खेळ मांडला’ या चित्रपटाद्वारेही अतिशय वेगळा विषय मांडण्याचं धाडस त्यांनी केलं आहे.
‘मुंबई पुणे मुंबई’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘फक्त लढ म्हणा’ असे एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या ‘मिराह एन्टरटेनमेंट’च्या ‘खेळ मांडला’ या नवीन कलाकृतीने विविध चित्रपट महोत्सवात प्रेक्षक-परीक्षकांची वाहवा मिळवली आहे. हा चित्रपट येत्या २७ एप्रिलला चित्रपटगृहात दाखल होत आहे.
Monday, April 23, 2012
आयटम साँगवर थिरकणार याना…
हरहुन्नरी मंगेशने खेळ मांडला
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
’प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या आगामी मराठी सिनेमाचं खास आकर्षण म्हणजे त्याचं दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी करणार आहे. मालिका असो वा रुपेरी पडदा, कोणतीही भूमिका सहजतेने साकारणारी मृणाल आता या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे. बदलत असलेल्या लग्नसंस्थेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाबाबत मृणाल खूपच उत्सुक आहे. या चित्रपटाची कथा स्वतः मृणालनेच लिहिली असून पटकथा – संवाद मनिषा रोकडे यांचे आहेत. अमोल प्रॉडक्शन निर्मित ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या सिनेमाचे सचिन पारेकर हे निर्माते आहेत तर श्री साईबाबा एन्टरटेनमेंटचे कौशल प्रवीण ठक्कर हे सहनिर्माते आहेत. तसेच प्रविण ठक्कर हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात सचिन खेडेकर, पल्लवी जोशी, विक्रम गोखले, सुहास जोशी, सुनिल बर्वे आणि मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आजपर्यंत अनेक विविध प्रकारच्या भूमिका साकारून, आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी मृणाल आता प्रेमाची व्याख्या मांडताना दिसणार आहे. कॉलेज जीवनात एका एकांकिकेचे दिग्दर्शन केल्यानंतर आता प्रथमच ती दिग्दर्शिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
पंचतत्वावर आधारित
ढोलकीच्या तालावर’
‘ढोलकीच्या तालावर’ या अस्सल मराठमोळ्या रिआलिटी शोने आत्तापर्यंत एकापेक्षा एक क्रिएटिव्हीटीचा वापर करून आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या शोने सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकून त्यांना घुंगरांच्या बोलावर ठेका धरायला लावलं. आता हा शो आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. सेमी फायनलचा अंतिम भाग पंचतत्वांवर आधारित आहे. सृष्टीची निर्मिती ज्या पंचमहाभूतांपासून करण्यात आली, त्या पंचतत्वांचा प्रतीकात्मक वापर करून लावणी सादर करण्यात आली आहे. लेझीम, झिम्मा, फुगडी, हुतुतू, आट्यापाट्या अशा विविध पारंपारिक खेळांचा वापर करून बहारदार लावण्या सादर केल्या आहेत. पंचतत्वांपैकी एक ‘जल’. स्नेहा वाघने जल या तत्वाचा वापर करून ‘सख्या रे, सख्या रे घायाळ मी हरिणी’ ही गाजलेली लावणी सदर केली, तर सुकन्या काळण हिने ‘अग्नि’ या पंचतत्वाचा प्रतिकात्मक वापर करून ‘ज्वानीच्या आगीची मशाल हाती’ या लोकप्रिय लावणीवर परफॉर्मन्स दिला. सोनाली पवार या लावण्यवतीने ‘वायू’ या पंचतत्वाचा वापर करून ‘गं बाई बाई झोंबतो हा गारवा’ ही लावणी सादर केली, तर ‘भूमी’ या तत्वाचा वापर करून वैशाली जाधव या नर्तकीने ‘मी सोडून सारी लाज अशी बेभान नाचले आज की घुंगरू तुटले रे’ ह्या बहारदार लावणीवर परफॉर्मन्स दिला. आऊटडोअर शूट हे या चारही लावण्यांचे खास आकर्षण आहे.
या चारीही लावण्यवतीनी रसिकांची माने जिंकून अंतिम भागात प्रवेश केला आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या ‘या रावजी बस भाऊजी’ या गाजलेल्या लावणीवर स्नेहा वाघने परफॉर्मन्स देऊन परिक्षकांची वाहवा मिळवली. सुकन्या काळण हिने ‘झाल्या तिन्ही सांजा’ ही लावणी सादर केली. सोनाली पवार या नर्तकीने ‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ ही लावणी सादर केली तर ‘मी साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहू नका’ या लावणीवर वैशाली जाधव या लावण्यवतीने परफॉर्मन्स दिला. या लावण्या सादर करून या चारीही नर्तकीनी परिक्षकांची मने जिंकली.
‘ढोलकीच्या तालावर’ या शोच्या फायनल राऊन्डमध्ये आगामी भागात प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक आपल्या नृत्याच्या माध्यमातून स्पर्धकांना शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित राहणार आहे. पंचगणीच्या tableland वर ‘गं बाई मी पतंग उडवित होते’ ही अतिशय गाजलेली लावणी सादर करण्यासाठी या लोकेशनची निवड करण्यात आली. जिथे नजर जाईल तिथे क्षितीजच दिसून येईल अर्थातच ‘आकाश’ या पंचतत्वाचा वापर करून ही लावणी सादर करण्यात आली.
आऊटडोअर लोकेशन्सवर जाऊन सादर केलेल्या लावण्या, पंचमहाभूतांवर आधारित लावण्या तसेच महाराष्ट्रातील पारंपारिक खेळांचा वापर करून सादर केलेल्या लावण्या येत्या बुधवार ४ एप्रिल आणि गुरुवार ५ एप्रिलला रात्री ९:३० वाजता ई टीव्ही मराठीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ मध्ये अवश्य पाहा
Exclusive ‘देऊळ’चा YouTube ला सुधा दणका
देविशा फिल्म्सची पहिली कलाकृती म्हणजेच मराठी सिनेमा ‘देऊळ’. निर्माते अभिजीत घोलप व दिग्दर्शक उमेश कुलकर्णी असलेल्या या सिनेमाचं सगळीकडेच भरभरून कौतुक झालं. असे अनेक दिवसात घडलेच नव्हते कि एखाद्या मराठी चित्रपटाने शंभर दिवस पूर्ण केलेत. मराठी चित्रपट सृष्टीने अनेक वर्षांनी म्हणलं तरी चालेल पण ‘देऊळ’ च्या निमित्ताने हा सोनियाचा दिन पाहिला. पदार्पणातच ह्या सिनेमाने अनेक सन्मान आणि रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळवला. ह्या दर्जेदार सिनेमाला वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवल्समध्येही awards मिळाले. उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार ( सुवर्ण कमळ) , बॉक्स ऑफिसवर पूर्ण केलेली शंभरी आणि म्हणूनच लोकाग्रह मानून परत एकदा महाराष्ट्रभरात ३२ चित्रपटगृहातून दररोज ५० खेळ घेऊन, आपल्या मनोरंजनासाठी ‘देऊळ’ सज्ज झाले होते .अभिजीत घोलप यांनी YouTube वरून आता ‘देऊळ’ काढला आहे.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ मध्ये पुण्याचं गर्वगीत
मराठी रसिकांच्या भेटीला आशुतोष राणा
काकस्पर्श
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी पुण्यात ‘हिरकणी चारिटेबल ट्रस्ट’ ची स्थापना करण्यात आली आहे
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी पुण्यात ‘हिरकणी चारिटेबल ट्रस्ट’ ची स्थापना करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘हिरकणी ट्रस्ट’च्या उद्घाटन समारंभाचा पहिलाच कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. मराठी चित्रपटांसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारांची कामगिरी ऑडिओ व्हिज्युअल्सच्या रूपात यावेळी दाखवण्यात आली. या कलाकारांमध्ये माधव वझे, गिरीश कुलकर्णी, आनंद भाटे, अमित फाळके, मिताली जगताप, विवेक वाघ, निलेश नवलखा, अश्विन चितळे, अविनाश देशपांडे, राजेश पिंजानी, वीरेंद्र वळसंगकर , सुजय डहाके यांचा समावेश होता. गिरीश कुलकर्णी, आनंद भाटे, अमित फाळके, मिताली जगताप, निलेश नवलखा आणि अमित वझे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. गिरीश कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले की चित्रपटात समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही कलाकाराला पुरस्कार मिळणं हे त्या एकट्या व्यक्तीचं नाही तर ते सगळ्या टीम चं यश आहे. आनंद भाटे यांनी ‘बालगंधर्व’ चित्रपटातील ‘चिन्मया सकला हृदया’ हे पद सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मनसेच्या महाराष्ट्र महिला सेनेच्या उपाध्यक्षा रीटा गुप्ता यांच्या हस्ते ‘हिरकणी चारिटेबल ट्रस्ट’चे उद्घाटन करण्यात आले. गणेश ढापले, मधुकर सणस आणि हिरकणीच्या संस्थापक दीपा सणस यावेळी उपस्थित होत्या.
‘ मराठी चित्रपट व्यवसायाच्या भरभराटीसाठी महाराष्ट्र शासनाचा क्रांतीकारी निर्णय ‘
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा मराठी चित्रपटसृष्टीला येणाऱ्या अनेक अडचणींविषयी शासनाच्या सांस्कृतिक खात्याकडे सतत पाठपुरावा सुरु होता. त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन सांस्कृतिक मंत्री मा. ना. श्री. संजय देवतळे साहेब यांनी डिजिटल फॉर्मेटवरील चित्रपट व सध्या असलेल्या चित्रपट अनुदान योजनेची फेररचना करण्यासाठी समिती स्थापन केली. सांस्कृतिक मंत्री मा. ना. श्री. संजय देवतळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, मंत्रालयातील त्यांच्या दालनामध्ये, या समितीची नुकतीच महत्वपूर्ण प्रदीर्घ बैठक संपन्न झाली.
दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री.शाम तागडे, उपसचिव सौ. स्वाती म्हसे-पाटील, अप्पर सचिव श्रीमती अलका पाटील, सांस्कृतिक कार्यसंचालक श्री.आशुतोष घोरपडे, कोल्हापूर चित्रनगरीचे अधिकारी श्री. संजय पाटील , श्री यावलकर साहेब इत्यादी शासनाचे अधिकारी तसेच चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रसाद सुर्वे, प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक श्री. महेश-मांजरेकर, अभिनेते-निर्माते श्री.विजय पाटकर, प्रसिद्ध निर्माते श्री.नितीन देसाई, प्रसिद्ध दिग्दर्शक श्री.चंद्रकांत कुलकर्णी यांच्या समवेत बैठक पार पडली.
यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी सांस्कृतिक मंत्री श्री. संजय देवतळे साहेब यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रसाद सुर्वे यांनी मराठी चित्रपट सृष्टीला येणाऱ्या अनेक अडचणींविषयी उपाय योजनेबाबत सूचना केल्या व सदर बैठकीत निर्णय मान्य झाला असून दि. ३ मे रोजी भारतीय चित्रपटसृष्टी १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे याचं औचित्य साधून यावर्षीच्या राज्य पारितोषिक वितरण समारंभामध्ये याची घोषणा होणार आहे.
१. यामध्ये मराठी चित्रपट प्रथम निर्मितीससुद्धा अनुदान प्राप्त होणार आहे.
२. पूर्वीचे ‘अ’ ‘ब’ ‘क’ या वर्गवारीमधून ‘क’ वर्ग रद्द करण्यात आला असून ‘अ’ व ‘ब’ वर्गच ठेवण्यात आलेले आहेत व यामध्ये डॉल्बी डिजिटल चित्रपट केल्यास ‘अ’ वर्गास ३५ लाख व ‘ब’ वर्गास ३० लाख रुपये असे प्रत्येकी ५ लाख वाढ करण्यात आली असून याचबरोबर अनेक सवलती देण्यात आलेल्या आहेत.
याची सविस्तर माहिती एक खास पत्रकार परिषद घेऊन महामंडळाचे अध्यक्ष श्री.प्रसाद सुर्वे हे सर्वांना देणार आहेत. तसेच श्री. प्रसाद सुर्वे व संचालक मंडळ यांनी महामंडळाच्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल समितीमधील सर्व सदस्यांचे व शासनाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी आवर्जून राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. पृथ्वीराज चव्हाण साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक मंत्री श्री. संजय देवतळे साहेब यांनी मराठी चित्रपट व्यवसाय वाढीसाठी चांगले निर्णय घेतल्याबद्दल समस्त मराठी चित्रपट व्यवसायाच्यावतीने शासनाचे शतशः आभार मानले व धन्यवाद दिले. लवकरच मराठी चित्रपट व्यवसायाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. पृथ्वीराज चव्हाण साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार साहेब, सांस्कृतिक मंत्री मा.ना.श्री. संजय देवतळे साहेब व राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे श्री. प्रसाद सुर्वे यांनी सांगितले.
‘आम्ही चमकते तारे’ मध्ये रंगणार गायन स्पर्धा; छोट्या दोस्तांना भेटणार महागुरू
दीपक एस.चौधरी व प्रकाश जाधव निर्माण करत असलेल्या ‘आम्ही चमकते तारे’ या चित्रपटाचे चित्रीकरण आता शेवटच्या टप्प्यात आले असून शेवटच्या शेड्युलमध्ये सिनेमाचा अतिमहत्वाचा भाग असलेल्या गायन स्पर्धेचे चित्रीकरण करण्यात आले. मराठी सिनेजगताला नवसंजीवनी देणाऱ्या ‘श्वास’ सिनेमाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या दीपक एस. चौधरी यांनी ‘आम्ही चमकते तारे’ या चित्रपटासाठीही काहीसा आगळावेगळा विषय निवडला आहे. या चित्रपटात सचिन नावाच्या ताऱ्याची कथा पाहायला मिळेल. इंद्रजीत मोरे हा बालकलाकार ही भूमिका साकारतोय. शालेय जीवनातल्या स्पर्धेच्या युगात अव्वल नंबर असणाऱ्या सचिनला आपल्याला असलेल्या आजारामुळे बालवयात कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो याचे चित्रण या चित्रपटात करण्यात येत आहे. चित्रपटाच्या शेवटी हा सचिन एका गायन स्पर्धेत सहभागी होतो आणि आपल्या कलागुणांच्या बळावर तो कशाप्रकारे इतर स्पर्धकांना मात देतो ते यात पाहायला मिळेल.
सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर या चित्रपटामध्ये विशेष भूमिकेमध्ये दिसणार आहेत. केवळ छोट्या पडद्यावर महागुरुची जबाबदारी पार पाडणारे सचिन पिळगावकर या सिनेमातही आपल्या अभिनयाची जादू कशी दाखवतात हे पाहणे प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहे. आपलाच नावकरी असलेल्या सचिनला ते कशाप्रकारे प्रोत्साहन देतात आणि मार्गदर्शन करतात ते सुद्धा यावेळेस पाहायला मिळेल.
या सिनेमात इंद्रजीतला एकीकडे सचिनजींसारख्या बालकलाकाराच्या रूपात आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या कलाकारासोबत तर दुसरीकडे भारत जाधवसारख्या मराठीतील सुपरस्टारबरोबरही काम करायची संधी मिळाली आहे. त्यामुळे या सिनेमात सकस अभिनयाचे नक्कीच दर्शन घडणार आहे. याशिवाय प्रसाद ओक, निशा परुळेकर, योगेश महाजन, निर्मला कोटणीस, रिमा लागू, आनंद अभ्यंकर, मानसी माघीकर, संजय देसाई आणि सतिश पुळेकर यांसारख्या कलाकारांनीही यात महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रकाश जाधव करत आहेत तर सिनेमाची कथा अनंत सुतार यांची आहे. सागर पवार, रवींद्र आवटे तसेच प्रमोद बेजकर या गीतकारांनी या सिनेमासाठी गीतरचना केल्या असून संगीतकार आहेत सुप्रसिद्ध संगीतकार श्रीरंग आरस. मराठीतील आघाडीचे गायक स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, आनंद शिंदे, संजीवनी भेलांडे, साधना सरगम , बेला शेंडे यांनी या सिनेमातील गीते गायली आहेत.
मराठी सिनेसृष्टीत सध्या लहान मुलांवर आधारित बरेच सिनेमे बनत असले तरी ‘आम्ही चमकते तारे’ हा चित्रपट छोट्या दोस्तांचे भावविश्व उलगडून दाखवेल. ‘रमाबाई आंबेडकर (रमाई)’ नंतर पुन्हा एकदा वेगळा आणि आव्हानात्मक विषय हाताळताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत तसेच एक आशयघन विषय तितक्याच ताकदीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असेल अशी ग्वाही प्रकाश जाधव यांनी दिली आहे. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शनाच्याबाबतीतही सिनेमा उजवा ठरेल असा आत्मविश्वास दिपक एस. चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
हिंदीतील ‘मुन्नी’ आणि ‘शीला’ ला मात देणार मेघनाची मराठी ‘शैला’
सीएस फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या आगामी सिनेमात दक्षिणेकडच्या मेघना नायडूचा मोहक चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सीएस फिल्म्सची ही दुसरी निर्मिती आहे. ‘कलियों का चमन’ फुलताना काय काय घडते त्याचे वर्णन आपल्या मादक अदांच्या आधारे करत थेट बॉलीवूडपर्यंत भरारी घेतल्यानंतर ‘हवस’, ‘एके ४७’, ‘क्लासिक डान्स ऑफ लव’ यासारख्या हिंदी सिनेमांसोबतच तेलुगु, तमीळ, बंगाली, मल्याळम, कन्नड अशा विविध भाषांमधील सिनेमांमध्ये काम करणारी मेघना आता या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीकडे वळली आहे.
सुवर्णा बांदिवडेकर यांची निर्मिती असलेल्या ‘करून टाक गोलमाल’ या सिनेमात मेघना एक आयटम साँग करणार आहे.बॉलीवूडमध्ये ‘मुन्नी’ आणि ‘शीला’चा बोलबाला झाल्यावर मेघना आता मराठीत ‘शैला’ बनून दाखवणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक राजेंद्र बांदिवडेकर यांनी मेघनाला मराठीत आणण्याची किमया साधली आहे. मेघना एक उत्तम नृत्यांगना असून ती या गीताला योग्य न्याय देईल असा विश्वास असल्यानेच आपण या गाण्यासाठी तिची निवड केल्याचे मत राजेंद्र बांदिवडेकर यांनी व्यक्त केले आहे. ते असेही मानतात की या गाण्याला त्यांना सुंदर चेहऱ्याबरोबरच उत्तम नृत्यांगना हवी होती आणि मेघानावर येऊन त्यांचा शोध संपला. अभिनयासोबत नृत्यातही पारंगत असलेल्या मेघानावर चित्रीत करण्यात येणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचे बोल ‘शैला मी शैला’ असे आहेत. आपल्या भारतीय सिनेसृष्टीचा पाया असलेल्या मराठी सिनेसृष्टीत गाण्याच्या निमित्ताने का होईना पण काम करण्याची संधी मिळाल्याने मेघना खुश आहे आणि मराठीतील ही आपली सुरुवात असल्याचं तिने म्हणलं आहे.
‘करून टाक गोलमाल’ मध्ये ‘शैला मी शैला’ या गीताबरोबरच ‘तुझाच भास, तुझा आभास…’, हृदयी तार छेडताना…’, ‘देते तुम्हा विडा आधी सुपारी फोडा…’ आणि एका शीर्षकगीताचा समावेश आहे. कोकणातील वेळणेश्वरसारख्या आजवर कधीही पडद्यावर न आलेल्या नयनरम्य लोकेशन्सवर ‘तुझाच भास तुझा आभास…’ आणि ‘हृदयी तार छेडताना…’ या दोन गीतांचे चित्रीकरण यापूर्वी करण्यात आले असून प्रसाद भेंडे यांनी कोकणातले निसर्गसौंदर्य कॅमेरात कैद केले आहे. या सिनेमात अनिकेत विश्वासराव मुख्य भूमिकेत असून त्याच्या जोडीला गिरीजा जोशी हा नवा चेहरा रुपेरी पडद्यावर चमकणार आहे. याशिवाय मोहन जोशी, उमा सरदेशमुख, अशोक समर्थ, धनंजय मांद्रेकर, विजू खोटे, विद्याधर जोशी, जयवंत वाडकर, अरविंद धनू, सुनील शिंदे इत्यादी कलाकारांचा समावेश आहे.
राजेश वामगुडे यांनी मेघानावर चित्रीत होणारे गीत लिहिले आहे तर सुदेश भोसले आणि पौर्णिमा यांच्या आवाजात ते ध्वनीमुद्रित करण्यात आले आहे. संगीतकार निर्मलकुमार यांनी मेघनाच्या या ‘शैला’ला संगीत दिले आहे. या गीताचे नृत्यदिग्दर्शन मराठीतील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव करणार आहेत.
प्रेक्षकांचे सर्वांगाने मनोरंजन करणारा परिपूर्ण चित्रपट ‘करून टाक गोलमाल’च्या निमित्ताने द्यायचा असल्याचे मत निर्माती सुवर्णा बांदिवडेकर व्यक्त करतात. त्या म्हणल्या की यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील असून, जे जे उत्तम ते ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्याचाच एक भाग म्हणून मेघना नायडू सारख्या महागड्या अभिनेत्रीला मराठीत आणले आहे.
‘श्यामची आई’ साठी माधुरी आणि विद्यात चुरस
साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ पुस्तकावर आचार्य अत्रे यांनी बनवलेल्या चित्रपटाने इतिहास घडवला होता. ‘श्यामची आई’ अत्यंत लोकप्रिय चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ‘सुवर्णकमळ’ पटकावले होते. निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मनात या पुस्तकावर नव्याने चित्रपट काढावा अशी इच्छा कित्येक दिवस घोळत होती. आता त्यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट बनवण्याचे ठरवले आहे. त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी तरूण दिग्दर्शक सुजय डहाके यांच्याकडे सोपवली आहे. सुजय डहाके यांच्या ‘शाळा’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. या चित्रपटातील स्वातंत्र्यपूर्ण काळ साकारण्यासाठी कला दिग्दर्शनाची जबाबदारी सत्यजित देशपांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे तर चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन गौरी बापट करत आहेत.
‘श्यामची आई’ ह्या चित्रपटात काम करण्यासाठी विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या अव्वल अभिनेत्रींमध्ये चुरस आहे. ‘फेरारी की सवारी’मध्ये लावणीची अदा दाखवणाऱ्या विद्या बालनने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा वारंवार दर्शवली आहे. विशाल भारद्वाज यांच्या ‘देढ इश्कियाँ’मध्ये विद्याच्या जागी माधुरीची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर माधुरीला ‘खो’ देण्यासाठी विद्या ‘श्यामची आई’ बनणार अशा चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे जरी माधुरी मराठी चित्रपटामध्ये काम करण्यास उत्सुक असली तरी सध्या विद्याचे पारडे जड वाटते आहे.
‘ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट’ तर्फे या दोन्ही अभिनेत्रींशी संपर्क साधण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत माधुरीचे सचिव रिक्कू राकेशनाथ यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. विद्याला मराठीत काम करायचे आहे पण ‘श्यामची आई’ बाबत आत्ता काहीही सांगू शकत नाही असे विद्याच्या सचिवांनी सांगितले. मांजरेकर म्हणाले,” या दोघींबाबत केवळ चर्चा करत आहोत. कोणाचेही आव अंतिम झालेले नाही. निर्णय झाला की नक्कीच जाहीर करू.”
त्यामुळे या स्पर्धेत कोणाची वर्णी लागते ते रसिकांना लवकरच कळेल.
रंगभूमी, स्वतःचं गाणं आणि सायकल
कुमार गंधर्व यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध गायिका वसुंधरा कोमकली यांनी स्वतःकडून राहून गेलेल्या गोष्टींना उजाळा दिला. वसुंधराजी माहेरच्या श्रीखंडे. त्या कलकत्त्यात जन्मल्या. त्यावेळेचं कलकत्ता म्हणजे एकदम सांस्कृतिक शहर, तसंच ते भारतीय संगीताचं मोठं केंद्र होतं. त्यांच्या घरातही सांस्कृतिक बहार होती. वसुंधराजींचं सुरुवातीचं गाणं कलकत्त्यातच आकाराला आलं आणि त्यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी कलकत्त्याच्या ‘ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स’सारख्या मानाच्या संगीतसभेत कुमारगटात गाऊन पहिला पुरस्कार म्हणून चांदीची छोटी तंबोरी मिळवली. या गाण्यामुळे त्या लहान वयातंच रेडिओ आर्टिस्टही बनल्या जिथे प्रसिद्ध तबलावादक अल्लारखाँ साहेब यांची साथ त्यांना लाभली.
त्यानंतर कलकत्त्याच्या सभेत कुमार गंधर्वांचं गाणं झालं. वसुंधराजींना त्यांचं गाणं खूप आवडायचं, तसंच त्यांच्याकडून वसुंधराजींना गा णं शिकायचंही होतं. १९४२ च्या महायुद्धाचा परिणाम आणि गाणं शिकण्यासाठी कुमार गंधर्वांची अट या दोन्ही गोष्टींमुळे वसुंधराजींचे कुटुंब मुंबईत आले व देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिकमध्ये त्यांचं संगीतशिक्षण सुरु झालं. स्वतःचं संगीतशिक्षण सुरु असतानाच वसुंधराजींनी शिवाजी पार्कला संगीत क्लास सुरु केला व एका शाळेत त्यांनी संगीत शिक्षिका म्हणूनही काम केले. पु. ल. देशपांडे यांच्या ‘भाग्यवान’ नाटकासाठी नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांनी त्यांना विचारलं तेव्हा वसुंधराजींनी त्यात काम केलं जे नावाजलंही गेलं. त्यानंतर चिंतामणरावांनी बसवलेल्या स्वा तंत्र्यवीर सावरकरांच्या ‘सन्यस्त खड्ग ‘ नाटकाच्या अंकातही त्यांची मुख्य भूमिका होती.
वसुंधराजींसाठी रंगभूमीचं एक अनोखं दालन उघडलं गेलं असताना, तसंच नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांसारखा माणूस त्यांच्या पाठीशी उभा असताना त्या तिथे स्वतःच्या हक्काची स्वतंत्र जागा नक्कीच निर्माण करू शकल्या असत्या पण कदाचित त्यांच्या आईला तेव्हा नाटकात काम केलेलं फार आवडायचं नाही म्हणून किंवा वसुंधराजींच्या संगीताच्या वेडाने या नाट्यवेडावर मात केली आणि त्यांच्या हातून नाटक कायमचं निसटलं.
कुमारजींच्या पत्नी भानुताई यांचं १९६१ मध्ये निधन झाल्यावर वसुंधराजींनी १९६२ मध्ये कुमारजींशी विवाह केला आणि त्या मध्यप्रदेशात देवासला गेल्या. संगीताचा तळपता सूर्य घरात असल्याने वास्तविक त्यांचं गाणं वाढायला हवं होतं, स्वतंत्रपणे काही करायची संधी त्यांना मिळायला हवी होती पण घर सांभाळताना त्या स्वतःचं गाणं हरवून बसल्या. त्यामुळे जरी लोक त्यांना ज्येष्ठ गायिका म्हणून ओळखतात,त्यांनी गेल्या पंधरा वीस वर्षात स्वतंत्रपणे अनेक मैफलीही केल्या तरी ऐन उमेदीच्या काळात मात्र गाणं त्यांच्या हातून निसटलं.
देवासमध्ये शाळेत शिकवायला जाताना वसुंधराजी जेव्हा पहिल्यांदा सायकलवर जायला लागल्या तेव्हा त्या पडल्या आणि परत कधीही त्यांनी सायकलचं नाव काढलं नाही. त्यामुळे आता वयाच्या ८१व्या वर्षीही त्यांना रुखरुख लागते की सायकल न शिकल्यामुळे त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. तसंच मनात आलं की पाहिजे तिथे सायकलवरून जाता येत नाही.
अशाप्रकारे वसुंधराजींच्या मते ‘ कलकत्त्यापासून देवासपर्यंतच्या प्रवासात त्यांच्या हातून रंगभूमी, स्वतःचं ऐन उमेदीतील गाणं आणि सायकल या गोष्टी अलगद निसटून गेल्या ज्या जपणं त्यांच्या स्वतःच्याच हातात होतं. आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर काही ना काही निसटतं आणि हे अंतिम सत्य स्वीकारावंच लागतं पण तरीही कधीतरी एकांतक्षणी ती रुखरुख उचंबळून येते.’
शिवाजी महाराजांवर ‘थ्री-डी’ चित्रपट : नितीन देसाई
देसाई यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर बनवलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराजांची तर मृणाल कुलकर्णी यांनी जिजाऊंची व्यक्तिरेखा साकारली होती. तब्बल २४० मिनिटांच्या या मालिकेचे रुपांतर देसाई यांनी २ तास १४ मिनिटांच्या मराठी चित्रपटात केले आहे.
या चित्रपटापाठोपाठ देसाई आता शिवाजी महाराजांवर ‘थ्री-डी’ चित्रपट काढणार आहेत. हा चित्रपट जून किंवा जुलैमध्ये सेटवर जाईल. ‘मालिकेचा चित्रपट बनवणे कठीण काम होते. तरीही आम्ही उत्तम चित्रपट देण्याचे काम केले आहे. मालिकेप्रमाणेच या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळेल’, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. यानंतर शिवाजी महाराजांचे कार्य सातासमुद्रापार नेण्यासाठी ‘थ्री-डी’ चित्रपट काढणार आहोत असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य शासनाचे ४९ वे चित्रपट पुरस्कार जाहीर
यावर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्र शासनाने ४९वे राज्यचित्रपट पुरस्कार जाहीर केले. सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी हे पुरस्कार जाहीर केले.
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अंशुमन जोशी, सुबोध भावे, गिरीश कुलकर्णी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मानसी साळवी, मृणाल कुलकर्णी, प्रिया बेर्डे
सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक – नितीन देसाई (बालगंधर्व)
सर्वोत्कृष्ट संकलन – फैजल इम्रान (अर्जुन)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – महेश लिमये (बालगंधर्व)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा – विक्रम गायकवाड (बालगंधर्व)
सर्वोत्कृष्ट वस्त्रभूषा – पूर्णिमा ओक (ताऱ्यांचे बेट)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - ईशान तांबे (ताऱ्यांचे बेट)
सर्वोत्कृष्ट ध्वनी – क्रिस्तोफर हार्वे (शाळा)
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ‘मला एक चानस हवा’च्या ध्वनिमुद्रिकेचं प्रकाशन
‘हृषीकेश आर्ट्स’च्या आगामी ‘मला एक चानस हवा’ या मराठी चित्रपटाच्या ध्वनिमुद्रिकेचं, माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते, त्यांच्या निवासस्थानी नुकतंच अनावरण झालं. यावेळी चित्रपटाचे निर्माते विठ्ठल चव्हाण, सहनिर्माते अडवोकेट एकनाथ जावीर, कार्यकारी निर्माते जितेंद्र गोळे आणि अभिनेत्री दिपाली सय्यद उपस्थित होते.
या चित्रपटात मकरंद अनासपुरे, दिपाली सय्यद, कुलदीप पवार, विजय पाटकर, मधु कांबीकर, राघवेंद्र कडकोळ, चेतन दळवी आदि कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. दादा कोंडके यांच्या पहिल्या चित्रपटाच्या कथा लिहिण्यापासून ते चित्रपट प्रेक्षागृहात प्रदर्शित झाल्यानंतरची सर्व कामगिरी सांभाळणारे बाळ मोहिते यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. बाळ मोहिते दादांच्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करत असत व ते मराठी चित्रपटसृष्टीत सर्वांना परिचित आहेत. ‘मला एक चानस हवा’ या मराठी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाचं काम त्यांनी केलं आहे.
मराठी चित्रपटांमध्ये आज आशयाच्या बाबतीत वैविध्यपूर्ण प्रयोग होत आहेत. विनोदी चित्रपटांबरोबरच प्रबोधन करणारेही अनेक चित्रपट आज तयार होत आहेत. ‘मला एक चानस हवा’ मध्येही प्रेक्षकांना असेच नवीन प्रयोग पाहायला मिळणार आहेत.
*Exclusive*’डॅंबिस’ सन्मानित होणार बॉस्टन इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये
सूत्रांनी सांगितल्यानुसार बॉस्टन इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल २०१२ मध्ये आपला मराठी ‘डॅंबिस’ हा चित्रपट ‘स्पेशल रेकग्निशन अवॉर्ड‘ने सन्मानित केला जाणार आहे. त्याबद्दल सिनेमाचे निर्माते सयाजी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले,”बॉस्टन इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘सिद्धार्थ मुवीज’ची निर्मिती असलेल्या ‘डॅंबिस’ ला अवॉर्ड मिळाल्यामुळे अर्थातच खूप आनंद झाला आहे. आमच्याकडून आम्ही चांगल्या कामाचा मनापासून प्रयत्न केला. प्रेक्षकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अरविंद जगताप यांचं या चित्रपटासाठी मोलाचं योगदान मिळालं. मकरंद अनासपुरे यांनीही दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट असूनही उत्तम कामगिरी केली आहे. आत्ता मी पुढच्या प्रोजेक्टसाठी कोचीनमध्ये आहे, तिथेही वृत्तपत्रांमध्ये ‘डॅंबिस’ बद्दल वाचायला मिळालं. भाषेच्या मर्यादा तोडून, परदेशात पुरस्कार मिळवल्याचा खूप आनंद वाटतोय. या सिनेमाचा विषयच गोड आहे आणि आमचे हेतूही शुद्ध होते. त्यामुळे टीमवर्कही छान झालं. बालकलाकार शुभंकर अत्रेचं खास कौतुक करावंसं वाटतंय. तसंच आनंद मोडक यांनी दिलेल्या संगीताबद्दल त्यांचे खास आभार. एकूणच हा पुरस्कार म्हणजे टीम एफर्ट आहे.” सयाजी शिंदे यांनी आत्तापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगु, कन्नड, मल्याळी अशा सात भाषात काम केलं आहे. त्यातील चार भाषांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट खलनायकाचे पुरस्कार मिळाले आहेत.
त्यानंतर सिनेमाचे दिग्दर्शक व अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “जरी आपल्याकडे या चित्रपटाला फारशी दाद मिळाली नसली तरी परदेशात आपल्या चित्रपटाची फार छान दखल घेतली गेली याचा मला आनंद वाटतोय. प्रथमच दिग्दर्शन करताना सगळ्या टीमचीच खूप मदत झाली. आनंद मोडक यांच्या संगीताबद्दल त्यांचं खास अभिनंदन! शुभंकर, प्रज्ञा शास्त्री, लोकेश गुप्ते व इतर कलाकारांचेही अभिनंदन! निर्माते सयाजी शिंदे व मुरकुटे मामा यांचेही त्यांनी विशेष आभार मानले. विनोदी अभिनेत्याची इमेज मोडून गंभीर भूमिका करतानाचा अनुभव खूप छान होता. सगळ्याच भूमिका मी मनापासून करतो तशीच ही गंभीर व भावनाप्रधान भूमिकाही मी अगदी मनापासून साकारली.”
त्यानंतर सिनेमाचे कथालेखक, गीतकार असलेले अरविंद जगताप म्हणाले, “मकरंद अनासपुरेचा इमेज ब्रेकिंग रोल आहे. त्याचं काम अफाट वेगळं आहे. सिनेमाचा विषय गंभीर आहे, त्यात मकरंदची दिग्दर्शक म्हणून ही पहिली फिल्म आहे, तसंच त्याची इमेज ब्रेक करून सयाजी शिंदेंनी खरं तर रिस्क घेतली पण त्यांनी ती कधी जाणवू दिली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरची अचिव्हमेंट ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे खूप आनंद झाला आहे.” अरविंद जगताप यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचे राज्य शासनाचे नामांकनही मिळाले आहे.
‘डॅंबिस’ च्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन !!!
Sunday, April 22, 2012
काकस्पर्श
निर्माता – दिग्दर्शक महेश मांजरेकर एकाहून एक सरस मराठी चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत. ‘काक स्पर्श’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शीर्षकावरूनच विषयाचे गांभीर्य आणि काळाचा संदर्भ लक्षात येतो. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे अनावरण नुकतेच मा.राजसाहेब ठाकरे, प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ब्ल्यू सी येथे संपन्न झाले. यावेळी मा. किरण शांताराम व पार्श्व पब्लिकेशन्सचे राहुल मेहता यांच्या हस्ते ‘काकस्पर्श’ या चित्रपटाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. ‘काकस्पर्श’ च्या निमित्ताने मराठी कॉफी टेबल बुकची ही पहिलीच निर्मिती आहे. या चित्रपटाशी निगडीत छायाचित्र, चित्रीकरणप्रसंगीच्या घटना, गमतीजमती , कलाकारांच्या मुलाखती आणि चित्रपट करताना आलेले अनुभव यात मांडण्यात आले आहेत. या प्रसंगी श्यामची आई आणि बुद्धिबळ या दोन आगामी चित्रपटांची घोषणा करण्यात आली. ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट एल. एल. पी. प्रस्तुत मेधा मांजरेकर, अनिरुद्ध देशपांडे निर्मित ‘काकस्पर्श’ची कथा उषा दातार यांची आहे. तत्कालीन परिस्थितीचे अवलोकन गिरीश जोशींनी आपल्या लेखन कौशल्याने पटकथा-संवादरूपात उत्तमरित्या साधले आहे. चित्रपटाच्या मागणीनुसार, साधारण पन्नास वर्षांपूर्वीचा काळ तंतोतंत उभारण्याचा कलादिग्दर्शक प्रशांत राणे आणि अभिषेक विजयकर यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते श्रीपाद पद्माकर आहेत तर राहुल भातणकर संकलक आहेत. पारंपारिक गीतांबरोबरच किशोर कदम यांच्या गीतांना राहुल रानडे आणि अजित – समीर यांचे कर्णमधूर संगीत लाभले आहे. सोनिया परचुरे यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून अजित रेड्डी यांचे छायांकन आहे. कोकणातील ब्राम्हण कुटुंबात घडलेल्या विविध घटना, तत्कालीन ब्राम्हणी रीतीरिवाज, समाजव्यवस्था आणि ‘वाडा’ संस्कृतीवर, प्रस्थापितांच्या दांभिक वृत्तीवर प्रकाश टाकणारी ‘काकस्पर्श’ची कथा आहे. १९३० ते १९५५ अशा २५ वर्षांच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील हृदयस्पर्शी, वास्तवदर्शी चित्रपट म्हणजे ‘काकस्पर्श’. रूढी – परंपरांच्या विळख्यात गुरफटून मानवतेला काळीमा फासणारी, स्त्रीला शूद्राहून – शूद्र लेखून तिच्या जगण्याच्या मुलभूत जन्मसिद्ध हक्कांवर गदा आणणारी, पाखंडी लोकांच्या अत्याचार व दुराचाराची कहाणी या चित्रपटात रेखाटली आहे. आजच्या पिढीला आणि प्रेक्षकांना रुचेल अशीच ही कथा आहे. आपला इतिहास, धर्म कुणी विसरू शकत नाही. इतिहासाचे दाखलेच पुढील सुधारणांचे खरे आधार ठरतात. त्यामुळे जुन्या पिढीला या चित्रपटामुळे पुनःप्रत्यय येईल तर नव्या पिढीला आपल्या इतिहासात डोकावता येईल. विषयांचे वैविध्य, आशयाचे गांभीर्य यांच्या जोडीला उत्कृष्ट पटकथा – संवाद आणि अनुभवी दिग्दर्शन अशी चांगल्या मनोरंजक चित्रपटासाठीची खास जमलेली भट्टी ‘काकस्पर्श’द्वारे लवकरच पाहायला मिळणार आहे.
Saturday, April 21, 2012
२७ एप्रिलला 'खेळ मांडला'.
मंगेश देसाई यांच्या सोबत प्रसाद ओक, मनसी साळवी, उदय सबनीस, उर्मिला कानेटकर, संतोष जुवेकर या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची कथा- पटकथा-संवाद विजू माने यांनी लिहीले आहेत. प्रा. अशोक बागवे, विजू माने, अभिजीत पानसे यांनी गीतरचना केली असून चिनार-महेश या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केली आहे.
Friday, April 20, 2012
'काकस्पर्श' चित्रपटासाठी २८ कलाकारांचे केशवपन.
यात सविता मालपेकर या अभिनेत्रीचा समावेश असून सचिन खेडेकर, अभिजीत केळकर, संजय खापरे, वैभव मांगले, सक्षम कुलकर्णी या मराठीतील लोकप्रिय कलाकारांसोबत श्रीराम पेंडसे, रवी संगवई, सुदेश मांजरेकर, गणेश मोडक, प्रणय मांजरेकर, प्रसन्न बापट, बाबासाहेब खरे, अमोल दिक्षित, आत्माराम दळवी, महेश दळवी, भगीरथ गौडा, संजय धुमाळ, आनंद कडणे, श्रीधर जोशी, गौरव भावे, रणजीत मोरे, दिपक राणे, अभिषेक विजयकर, अशा एकूण २४ कलाकारांसोबत पुण्याच्या वेधशाळेतील चार कलाकारांनीही 'काकस्पर्श्'साठी मुंडण केले आहे.
१९३० ते १९५५ चा कालखंड रेखाटणार्या गिरीश जोशी लिखित या चित्रपटात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ रेखाटण्यात आला आहे. चित्रपटाला अधिक परिणामकारक करण्यात कोणताही विग न लावता खरोखरीचे मुंडण करणार्या कलाकारांचे महत्त्वाचे योगदान महत्त्वाचे आहे; कारण केस वाढेपर्यंत त्यांना अन्य कोणत्याही चित्रपटात काम करता आले नाही. या कलाकारांची भूमिकेशी असलेली बांधिलकी चित्रपट रसिकांना ४ मे ला 'काकस्पर्श' प्रदशित झाल्यावर नक्कीच जाणवेल.
Tuesday, April 17, 2012
'माझी शाळा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.
या चित्रपटाचे नाव जरी 'माझी शाळा' असेल तरी त्यातील विषय मात्र सामाजिक आहे. विनोद अनंत तांबे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही त्यांनीच लिहिले आहेत. 'माझी शाळा' साठी हृषीकेश कोळी यांनी गीतलेखन केले असून सचिन-देपेश या संगीतकार जोडीने या गीतांना स्वरसाज चढवला आहे. छायाचित्रणाची जबाबदारी विनायक जाधव यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहे. कला दिग्दर्शन विजय मयेकर यांचे असून संकलनाची बाजू सुरेश नागनाले यांनी सांभाळली आहे.
एका ध्येयवेड्या शेतकऱ्याच्या मुलीची कथा या चित्रपटात पहायला मिळेल. शेतकऱ्याने शेतकरीच बनून जीवन व्यतित करावे या विचारसरणीला छेद देण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेते अरुण नलावडे मुख्य भूमिकेत असून त्यांनी रामचंद्र नावाच्या शेतकऱ्याच्या मुलाची भूमिका सरकारी आहे. या शिवाय अलका कुबल-आठल्ये, जयंत सावरकर, देवेंद्र दोडके, दिपज्योती, अशोक पावडे, बबन जोशी, संचित यादव, पूर्णिमा व्हावळ आणि बाल कलाकार आकाश वाघमोडे यांच्या 'माझी शाळा' मध्ये भूमिका आहेत.
'बुरा ना मानो' हे नाटक लवकरच रंगभूमीवर.
दिग्दर्शक विजय पगारे यांनी गंभीर विषय अगदी विनोदी पध्दतीने मांडला आहे. 'बुरा ना मानो' या नाटकाचे निर्मिती प्रमुख आहेत अरविंद भोंगळे, निखोल भोंगळे तर गीतकार आहेत कुणाल खाडे व विक्रांत केदार यांच्या गीताला संगीत बध्द केल आहेत हेमंत बाबरीया व कुणाल खाडे यांनी. तसेच बबन जोशी, संदीप गायकवाड, स्नेहा जोशी, अश्विनी नांदेडकर, स्वप्नील बारसकर, प्रणव कुलकर्णी, संदेश प्रभाकर, मयुरी मोहिते, सायली पावसकर, अभिजित भोसले आणि शशिकांत केरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
'बुरा ना मानो' हे कुटुंबासोबत पाहण्यासारख नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे.
Monday, April 16, 2012
'फक्त तुझी साथ हवीय' हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.
एका मुलीच्या आयुष्यात येणार्या प्रेमाची गोष्ट आणि संस्काराचे महत्त्व अधोरेखित करणारी ही नाटय़कृती, निर्माती अनुराधा वाघ त्यांच्या 'आशय प्रॉडक्शन' द्वारे घेऊन येत आहेत.
'मी रेवती देशपांडे' आणि 'सुखांशी भांडतो आम्ही' या नाटकाचे दिग्दर्शक कुमार सोहनी हे या नाटकाचे दिग्दर्शन करीत असून प्रकाशयोजनासुद्ध त्यांची आहे. नेपथ्य प्रदीप पाटील यांचे असून वेषभुषा महेश शेरला यांची आहे तर रंगभूषा शशी सकपाळ यांची आहे. अशोक पत्की यांच संगीत असून महेश कांबळे यांनी सूत्रधाराची भूमिका बजावली आहे. प्रसिद्ध अभिनेता अशोक समेळ, तेजश्री प्रधान, आशिष कुलकर्णी, उपेंद्र दाते, राजन जोशी, सरिता पुजारी, राजेश साळवी, स्वप्निल फडके आणि रत्नाकर देशपांडे इत्यादी कलकारांचा दमदार अभिनय पहायला मिळणार आहे.
कौटुंबिक विषय असणारे 'फक्त तुझी साथ हवीय' हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Saturday, April 14, 2012
'खेळ मांडला' ध्वनीफित प्रकाशन सोहळा संपन्न.
प्रा. अशोक बागवे, अभिजीत पानसे, विजू माने यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार खारकर, नंदेश उमप, अवधुत गुप्ते यांनी स्वरबद्ध केली आहेत आणि चिनार महेश यांनी संगीत दिले आहे.
विविध चित्रपट महोत्सवांत प्रेक्षक -परीक्षकांची वाहवा मिळविलेला 'खेळ मांडला' हा चित्रपट येत्या २७ एप्रिलला राज्यभर प्रदर्शित होत आहे.
Thursday, April 12, 2012
'तू तिथे मी' १६ एप्रिलपासून झी मराठीवर दाखल.
या मालिकेच लेखन चिन्मय मांडलेकर यांचे असून या मालिकेत ते सत्यजीतच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर मंजिरीच्या भूमिकेत आहे आपली शमिका म्हणजेच मृणाल दुसानीस तर अन्य भूमिकांमध्ये प्रिया मराठे, विद्या करंजीकर, वंदना वाकनीस, अजय पूरकर, शर्वाणी पिल्ले आणि रमेश भाटकर प्रमुख भूमिका बजावत आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन श्रीधर पाटील करत असून छायांकन पुष्पांक गावडे यांचे आहे. शीर्षक गीताला अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे. निर्माते शशांक सोळंकी यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. 'तू तिथे मी' ही मालिका १६ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता झी मराठीवर दाखल होत आहे.
Wednesday, April 11, 2012
'काकस्पर्श' या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे अनावरण.
'काकस्पर्श'च्या निमित्ताने मराठी चित्रपटाच्या कॉफीटेबल बुकची ही पहिलीच निर्मिती आहे. या चित्रपटाशी निगडीत छायाचित्र, चित्रीकरणादरम्यानच्या घटना, गमतीजमती, कलाकारांच्या मुलाखती आणि चित्रपट करताना आलेले अनुभव यात मांडण्यात आले आहेत. याप्रसंगी 'श्यामची आई' आणि 'बुद्धीबळ' या दोन आगामी चित्रपटांची घोषणा करण्यात आली.
ग्रेट मराठा एण्टरटेनमेंट एल.एल. पी प्रस्तुत मेधा मांजरेकर, अनिरुद्ध देशपांडे यांची निर्मित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्शाची कथा उषा दातार यांची आहे. गिरीष जोशी यांनी आपल्या लेखन कौशल्याने पटकथा- संवादरुपात उत्तमरित्या साधले आहे. पारंपरिक गीतांसोबतच किशोर कदम यांच्या गीतांना राहुल रानडे आणि अजित समीर यांनी संगीत दिले आहे. कलादिग्दर्शक प्रशांत राणे आणि अभिषेक यांनी चित्रपटाच्या मागणीनुसार सधारणतः ५० वर्षापूर्वीचा काळ तंतोतंत उभारण्याचा प्रयत्न केला आहे.
Monday, April 9, 2012
'अघोर' जीवनाचा जगण्याशी संघर्ष चित्रपटाचा मुहूर्त गीतधनीमुद्रणाने संपन्न.
राजू धिवदोंडे, रमण सेनाड, मंगेश पितळे निर्मित आणि सलीम शेख दिग्दर्शित 'अघोर' या चित्रपटासाठी रविंद्र साठे, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, कुणाल गांजावाला, स्वप्निल बांदोडकर, कौस्तुभ दातार, वैशाली सामंत आणि बेला शेंडे यांसारख्या सुप्रसिद्ध गायक गायिकांनी आपला आवाज दिला आहे. गीतकार प्रविण दवणेंच्या शब्दांना प्रसिद्ध संगीतकार नंदू होनप यांच्या सुरेल चाली लाभल्या आहेत. विविध प्रकारच्या गीतांचा 'अघोर जीवनाचा जगण्याशी संघर्ष' मध्ये समावेश करण्यात आला आहे.
Subscribe to:
Comments (Atom)