Friday, August 31, 2012

‘वैशाली कॉटेज’ : वास्तविक अस्तित्वाची रहस्यपूर्ण खेळी

vaishali cottage वैशाली कॉटेज : वास्तविक अस्तित्वाची रहस्यपूर्ण खेळी



1972 साली अमेरिकेत ब्रॉडवेवर आलेलं ‘व्हेरोनिकाज रूम’ हे इरा लेविन या नाटककाराचं नाटक अत्यंत लोकप्रिय झालं होतं. याच नाटकाचं मराठी रूपांतरण रंगभूमीवर साकारत आहे. ‘नाट्यमंदार’ प्रस्तुत, रहस्यमय कथानक असलेल्या या नाटकाचे मराठी रूपांतरण सुरेश जयराम यांनी उत्कृष्टरित्या केले आहे.
‘वैशाली कॉटेज’ या नाटकातील नायिका आणि नायक या दोघांच्याही आयुष्यात आलेल्या एका थरारक आणि अकस्मात वळणावर आधारित हे नाटक आहे. एका मॉलमध्ये फिरत असताना एका प्रौढ जोडप्याला ही नायिका म्हणजे ते ज्या बंगल्याचे केअर टेकर आहेत त्या घरातल्या वैशालीसारखी दिसते आहे असे वाटते. त्यामुळे थोड्यावेळासाठी त्यांच्या बंगल्यावर येऊन जाण्याची विनंती ते शिवानीला (नायिकेला) करतात. बंगल्यावर गेल्यावर वैशाली ही पूर्वीच मेलेली आहे पण तिची बहीण माधवी मात्र तिच्या अस्तित्वात अजूनही गुंतलेली असून वैशाली जिवंतच आहे या भ्रमात आयुष्य जगत असल्याचं शिवानीला सांगितलं जातं. अंथरुणाला खिळलेल्या माधवीसाठी शिवानीने वैशाली बनावं अशी विनंतीपूर्ण मागणी हे जोडपे शिवानीकडे करते. शिवानीचा मित्र समीरचा विरोध असतानाही थ्रील म्हणून आणि माधवीची दया येऊन शिवानी या खेळाला सुरुवात करते. असा हा नियतीच्या विरुद्ध चाललेला अस्तित्वाचा खेळ शेवटी एका खुनाच्या घटनेने रक्तबंबाळ होतो.
अमिता खोपकर, तेजस्विनी पंडित, शिरीष घाग आणि संकर्षण क-हाडे यांच्या सरस भूमिकांचा मेळ या नाटकात प्रेक्षकांना पाहता येतो. रहस्यमय कथानकाची यशस्वी पकड साधण्यात दिग्दर्शकाचा मोठा वाट असतो आणि मंगेश कदम यांनी ही जबाबदारी नेटाने पार पाडल्याचं लक्षात येतं. प्रदीप पाटील यांचे उठावदार नेपथ्य, राहुल रानडे याचं सुयोग्य पार्श्वसंगीत आणि शीतल तळपदे यांची थरारक प्रकाश योजना अशी सर्वांगसुंदर कलाकृती म्हणून या नाटकाकडे पाहता येईल.
अनपेक्षित प्रसंग, कुठेच नसलेली अतिशयोक्ती, सर्वच पात्रांचे अनोखे रंग या सर्वातून हे रहस्य अधिक गडद होत जातं आणि प्रेक्षकांना त्यांचं अस्तित्व विसरायला लावतं.

म्हैसकर मिफ्ता नाट्य-चित्रपट महोत्सव २०१२ नामांकन

 नाट्य नामांकन

MIFTA 2012 : 10 selected Drama
Name of the Play
:Production House
Sargam
:Suyog
Keshva Madhva
:Rasik Ranjan
Ali baba aani chalishitle chor
:Maharashtra Cultural Centre
Shivaji Underground in Bhimnagar Mohalla
:Adwait presents Public Opinion Production Rangmala nirmit
Mi Revati Deshpande
:Shri Chintamani
Saasu Majhi Dhasu
:Prashant Damle Fan Foundation
Khal Khatyak
:Shri Chitra
Lagnabambal
:Shubham Sparsh
Tom Aani Jerry
:Ashwami - Adwait
Vaishali Cottage
:Natyamandar

चित्रपट नामांकन


MIFTA 2012 : 10 selected Films

Name of the Movie

:Production House

Masala

:Arbhat Nirmiti

Zakas

:20 -20 Entertainment

Satrangi Re  

:Vishwas Chitra

Tukaram       

:Everest Entertainment Pvt Ltd

Shala

:Great Maratha Entertainment LLP
Nishad audio Visuals and Navlakha Arts
Media and Entertainment

Ajintha

:Iconic Chandrakant Productions Pvt Ltd

Badam Rani Gulam Chor

:Manohar Entertainment

kaksparsh

:Great Maratha Entertainment LLP

Deool

:Devisha Films

Bhartiya

:Devisha Films

Thursday, August 30, 2012

“चॅम्पियन्स” येत आहेत…

२०१० मध्ये सामाजिक विषयाच्या आशयाचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘चॅम्पियन्स’ उद्यापासून मुंबई, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर या चार महानगरांमध्ये प्रदर्शित होत आहे. ‘Aishwarya Arts n Vision, IME Motion Pictures Pvt. Ltd.’ प्रस्तुत या सिनेमाच्या निर्मात्या ऐश्वर्या नारकर असून अभय गाडगीळ आणि श्रीरंग गोडबोले हे सहनिर्माते आहेत.
भारतातील सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे समृद्ध शिक्षणाचा. अजूनही असे अनेक विभाग आहेत जिथे शिक्षणाच्या सोयीचा अभाव आपल्याला दिसून येतो. याच विषयावर भाष्य करणारी कथा रमेश मोरे यांनी लिहिलेली आहे. एका अविकसित, लहानश्या गावात राहणारे कुटुंब, परिस्थितीही तशी बेताचीच. पण आई वडिलांची इच्छाशक्ती आणि मुलांची जिद्द अशा दुहेरी प्रयत्नातून दोन्ही मुले आयुष्यातले यशाचे शिखर गाठण्यात यशस्वी होतात. त्यांच्या शिक्षणात येणा-या अडचणी, संधींचा अभाव या सर्वाची जाणीव असूनही आपल्या मुलांमध्ये असलेल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेऊन आई वडील त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि परिस्थितीला झुकवून उंच झेप घेण्याचं बळ त्या मुलांना मिळवून देतात.
आज भारतातील Municipal शाळेमध्ये १०० मुलांपैकी फक्त ४० ते ५० मुलं दहावीच्या परीक्षेला सामोरे जाण्याचं चित्र दिसत आहे. अशा वेळी मुलांमध्ये शिक्षणासाठी तळमळ निर्माण करण्याची आणि त्यासाठी त्यांची मानसिक, वैचारिक वाढ होण्याची अत्यंत गरज आहे. या चित्रपटातून हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शन रमेश मोरे आणि सहदिग्दर्शन दिलीप असुर्डेकर करत आहेत. ऐश्वर्या नारकर,अविनाश नारकर, अरुण नलावडे, उदय सबनीस, हृदयनाथ राणे, मृणाल चेंबूरकर, सविता गोस्वामी,भाग्यश्री पाने, राजेश आंबोळे, अशोक परब या सर्व कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. शंतनू रांगडेकर आणि मच्छिंद्र गडकर या दोन बालकलाकारांचा उत्कृष्ट अभिनय या चित्रपटात पाहता येईल.
‘शिक्षण मिळत नसते ते मिळवावे लागते’ असा संदेश देणारा हा सिनेमा मनोरंजनाबरोबर सामाजिक जाणीवही करून देतो.

Mifta Festival 2012

म्हैसकर मिफ्ता नाट्य-चित्रपट महोत्सव २ ते ९ सप्टेंबर २०१२
स्थळ – डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे.

image


 

Tuesday, August 28, 2012

ए. के. हंगल अनंतात विलीन : सर्वांच्या लाडक्या रहीम चाचांना शेवटचा सलाम

11111111 ए. के. हंगल अनंतात विलीन : सर्वांच्या लाडक्या रहीम चाचांना शेवटचा सलाम



‘शोले’ या हिंदी चित्रपटातील रहीम चाचांच्या भूमिकेने अजरामर झालेले ए.के. हंगल यांचे २६ ऑगस्ट रोजी मुंबईतील पारेख रुग्णालयात निधन झाले. २००६ मध्ये पद्मभूषण पुरस्‍काराने सन्मानित करण्यात आलेले हंगल ९८ वर्षाचे होते. सांताक्रुझ येथील आशा पारेख रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हंगल यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. पण रविवारी सकाळी तिथेच अवतार किशन हंगल यांची प्राणज्योत मालवली. ए. के. हंगल अशाच नावाने प्रसिद्ध असलेले हंगल यांनी त्यांच्या ४५ वर्षांच्या कारकिर्दीत २५० हून जास्त चित्रपटांमध्ये अभिनय साकारला.
१९७१ साली वयाच्या ५० व्या वर्षी हृषिकेश मुखर्जींच्या गुड्डी या चित्रपटातून हंगल यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. अभिनेत्री जया बच्चन यांचादेखील हा पहिलाच सिनेमा होता. रंगभूमीशी अत्यंत जवळचे नाते असलेल्या हंगल यांनी अनेक नाटके लिहून त्या भूमिका समर्थपणे निभावल्या. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेशी फार पूर्वीपासून ते जोडले गेले होते. सतत बदलणा-या या रंगांमध्ये आजची तरुणाई रंगभूमीवर काय प्रयोग करतेय हे पाहण्यासाठी हंगल इप्टाच्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांना आवर्जुन उपस्थित राहत.
हंगल यांना गेली अनेक वर्ष पाठदुखीने ग्रासले होते. घरात पडल्यामुळे त्यांच्या कमरेला जबर मार बसला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणेही अशक्य झाले होते, अशी माहिती त्यांचे पुत्र विजय हंगल यांनी दिली.
४५ वर्ष रुपेरी पडदा गाजवलेल्या या चाचांना mazzacinema.com कडून भावपूर्ण श्रद्धांजली…..

Monday, August 27, 2012

‘टॉम आणि जेरी’ : नात्यांमधली पकडापकडी

अश्वमी व अद्वैत थिएटर्स निर्मित ‘टॉम आणि जेरी’ हे एका वेगळ्याच वळणाचं नाटक रंगभूमीवर साकारत आहे. आजच्या घड्याळाच्या सेकंदावर धावणारी माणसे, त्यांच्या न संपणा-या महत्वाकांक्षा, स्वत:बद्दल असलेला स्वाभिमान, आणि त्यातून उद्भवलेला आत्मकेंद्री स्वभाव हे सध्याच्या पिढीचं समीकरण बनलं आहे. जगण्यासाठी महत्वाकांक्षेपेक्षाही नाती महत्वाची असतात, कारण या नात्यातून मिळणा-या प्रेमातूनच आपल्या आयुष्यात स्थैर्य येत असतं. पैसा आणि यशाची धुंदी नात्यांच्या मर्यादेत राहूनच नियंत्रित राहू शकते.
आज कामानिमित्त अनेकजण आपली माणसं सोडून, टार्गेट पूर्ण करता यावं यासाठी परदेशात जाऊन राहतात. पण नवरा बायकोच्या नात्यांमध्ये असा प्रसंग येऊन, नुकताच सुरु झालेला संसार या कामाच्या रगाड्यात पुरता होरपळून निघतो. नवरा एका देशात तर बायको दुस-या देशात अशी परिस्थिती असताना मग संपर्क काय तो मोबाईलसारख्या कृत्रिम यंत्रांच्या माध्यमातूनच. थोड्या दिवसाचं ठीक आहे पण ‘आपण ज्याच्याशी संपर्क ठेऊन आपलं नात टिकावं यासाठी प्रयत्न करतोय ते नातं आधी परिपक्व तरी आहे का?’ असा प्रश्न दोघांच्या मनात निर्माण होतो आणि मग सुरु होते सहन न होणारी चलबिचल, चिडचिड आणि अनियंत्रित संभाषण. पण मग या अशा शारिरिकच नाही तर मानसिक नात्यातलं अंतर जास्त असताना ते जवळ यावं किंवा त्याचा सोक्षमोक्ष लावावा या एका समान मुद्द्यावर होणारी दोघांची भेट आणि त्या नात्याचे ठरणारे भविष्य. अशा वास्तव परिस्थितीवर मोकळेपणाने भाष्य करणारी कथा असलेले हे नाटक आहे.
लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि प्रमुख भूमिका अशी चतुरस्त्र जबाबदारी अत्यंत गुणवान रंगकर्मी निखिल रत्नपारखी यांनी निभावली आहे. यापूर्वी ‘साठेचं काय करायचं?’, ‘मसाज’ यांसारख्या नाटकांतून त्यांच्या अभिनयाचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला आहे. कादंबरी कदम हिनेदेखील आपल्या सरस अभिनयाचे कसब नायकाच्या पत्नीच्या भूमिकेतून दाखवून दिले आहे. मिलिंद जोशी यांचे पार्श्वसंगीत, शीतल तळपदे यांची प्रकाश योजना, गीता गोडबोले यांची वेशभूषा अशोक राऊत यांची रंगभूषा या सर्व रसायनातून हे नाटक सगळ्याच बाबतीत दर्जेदार ठरत आहे. केवळ दोनच पात्रांच्या ताकदीच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कमाल तर या नाटकाने नक्कीच केली आहे…

Friday, August 24, 2012

‘कुटुंब’ ३१ ऑगस्टला चित्रपटगृहात

Screen Shot 2012 08 21 at 9.06.49 PM कुटुंब ३१ ऑगस्टला चित्रपटगृहात

‘काकस्पर्श’ या सिनेमाच्या भरघोस यशानंतर महेश मांजरेकर आणखीन एक विलक्षण कहाणी प्रेक्षकांसमोर आणत आहेत. ‘ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट’ प्रस्तुत ‘कुटुंब’ हा सिनेमा येत्या ३१ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित केला जाणार आहे.
‘कुटुंब’ या नावातूनच एक आनंदी, प्रेमळ, माणसांनी सजलेले असं घर डोळ्यासमोर येतं. एकमेकांना निरपेक्षपणे सहकार्य करणारी, समोरच्याने न बोलता त्याच्या मनातले सारे काही समजणारी माणसं ज्या कुटुंबात असतील असं आदर्श कुटुंब प्रत्येकाचंच असायला हवं. अशाच एक प्रेमळ, आनंदी, संकटांवर मिळून मात करणा-या कुटुंबाची कथा ‘कुटुंब’ या सिनेमात रेखाटली आहे.
कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत असलेला नामदेव (जितेंद्र जोशी) आणि त्याची बायको गंगा (वीणा जामकर) यांचे हे छोटेसे कुटुंब. त्यांची दोन मुले सुभान (मिहीर सोनी) आणि लक्ष्मी (गौरी इंगवले) यांच्याबरोबर सिद्धार्थ जाधव आणि मानसी नाईक यांची धम्माल जोडी या चित्रपटात आपल्याला पाहता येईल. जितेंद्र जोशी आणि मानसी नाईक यांचा एक वेगळाच लूक या चित्रपटात आहे. कुटुंबासाठी आणि आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतीही गोष्ट करण्याची तयारी असलेला नामदेव कशा रीतीने आर्थिक संकटांचा सामना करून त्याचे कुटुंब सांभाळतो याचे चित्रण सिनेमात आहे.
एका पेक्षा एक फेम मिहीर सोनी प्रथमच या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.या चित्रपटाची कथा- पटकथा महेश मांजरेकर यांची असून संवाद प्रवीण तरडे यांचे आहेत. जितेंद्र जोशी आणि बाबा चव्हाण यांच्या गीतांना अजित-समीर आणि अभिजित कवठलकर यांनी संगीत दिले आहे. रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, बेला शेंडे आणि अजित परब यांनी ही गाणी गायली असून उमेश जाधव यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
इच्छाशक्ती आणि व्यापक कुटुंबाचे सहकार्य यामुळे दोन चिमुरड्यांनी घेतलेली ही उंच भरारी प्रेक्षकांना ३१ ऑगस्टपासून पाहता येईल.

Thursday, August 23, 2012

शिक्षणाच्या साथीने आयुष्याचे सोने करणारा : ‘परीस’

2 शिक्षणाच्या साथीने आयुष्याचे सोने करणारा : परीस

‘सिल्व्हर स्क्रीन एंटरटेनमेन्ट’ या बॅनरखाली ‘परीस’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. सौ. सीमा शरद या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. आपल्या आयुष्याला सोनेरी रंगानेच नाही तर सुवर्ण गुणांनी उज्ज्वल करणारा हा परीस प्रत्येकाच्याच आयुष्यात काही तरी देऊन जातो. आपल्या नकळत आपल्या उत्कर्षासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असतात, ज्यांना आपण या परिसाची उपमा देऊ शकू. त्याची रूपं वेगवेगळी असतील- कोणासाठी ते आई वडिलांनी केलेले संस्कार असतील, कोणासाठी गुरुंनी दिलेले ज्ञान असेल, तर कोणासाठी अनुभवांची शृंखलाच या परिसाचे कार्य करेल…..’परीस’ हा चित्रपट एका महत्वाकांक्षी मुलाला शिक्षणरुपी परीसस्पर्श होउन त्याचे आयुष्य कसे घडवतो याची कथा सांगणारा आहे.
दिग्दर्शक रमेश साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदय सबनीस, अजय पाध्ये, प्रदीप पटवर्धन आणि कोमल आपटे यांच्यावर चित्रपटाचे मुहूर्त दृश्य चित्रित करण्यात आले. चहाच्या टपरीवर काम करणारा एक गरीब मुलगा शिक्षणाच्या ओढीने त्याचा ध्यास घेतो. त्यासाठी अपार कष्ट आणि मेहनत करून यशाच्या शिखरावर पोहोचतो याचे प्रेरणादायी चित्रण या चित्रपटात केले आहे. शरद कुमार प्रस्तुत ‘परीस’ साक्षरतेबाबत जागरूकता वाढवणारा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा- पटकथा- संवाद आणि छायाचित्रण अशी बहुरंगी कामगिरी सुनील खरे करत आहेत. उमेश कामत, निशा परुळेकर, उदय सबनीस, अजय पाध्ये, प्रदीप पटवर्धन, राजू शिसदकर आणि कोमल आपटे या कलाकारांचा अभिनयही प्रेक्षकांना या चित्रपटात पाहता येईल.

Tuesday, August 21, 2012

‘Conflict and Custody’ : राणी धवन शंकरदास यांनी अनुभवलेली तिची पल्याडची कथा

आज सर्वत्रच गर्भात होणा-या स्त्रीच्या हत्येला सगळ्याच स्तरावरून विरोध होत आहे. प्रत्येक संघटना, संस्था, डॉक्टर, स्त्रीच्या या जन्मापूर्वीच होणा-या निर्घूण छळाच्या विरुद्ध आवाज उठवत आहेत. पण कित्येक काळापासून स्त्रीच्या जन्मानंतर तिला होणा-या यातना आणि त्या यातनांना कवेत घेऊन ती कंठत असलेले तिचं जीवन या परिस्थितीत मात्र अजूनही पूर्णपणे फरक पडलेला दिसत नाही. समाजात वावरणारी स्त्रीसुद्धा तिची सुरक्षितता, तिचे अधिकार, तिचा मान या सर्वांवर कुठे विरजण तर पडणार नाही ना या भीतीने ग्रासलेली दिसते, तर मग समाजाच्या एका लहान पण भयानक अशा अंधा-या कोठडीत आयुष्य घालवणा-या अगतिकेची काय कथा?
याच अगतिक स्त्रियांच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न ‘प्रजा’ (पीनल रिफॉर्म अँड जस्टीस असोसिएशन) या संस्थेने केला असून राणी धवन शंकरदास यांनी ‘ Conflict and Custody’ या पुस्तकातून त्यांची हाक ऐकली आहे. तुरुंगांच्या चार दगडी भिंतींमधल्या गुदमरलेल्या विश्वात आयुष्य ढकलणा-या या स्त्रिया, त्या कोंदट वातावरणात ज्यांचे श्वासही कोंडले जात आहेत अशा स्त्रियांच्या आयुष्याची कथा या पुस्तकात मांडली गेली आहे. राणी धवन शंकरदास या पीनल रिफॉर्म अँड जस्टीस असोसिएशन या संस्थेच्या जनरल सेक्रेटरी आणि पीनल इंटरनॅशनल रिफॉर्म च्या ऑनररी प्रेसिडेंट आहेत. देशभरातील तुरुंगांमध्ये हिंडून आणि तिथल्या महिला कैद्यांशी समुपदेशनाच्या निमित्ताने चर्चा करून त्यातून आलेल्या अनुभवातून हे पुस्तक साकार झालं आहे. वेगळ्या वाटेने जाऊ इच्छिणा-या समुपदेशकांनी या सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक कारणांनी गांजलेल्या महिलांना मानसिक आधार देऊन शास्त्रीय पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करण्यास पुढाकार घ्यावा हा या पुस्तकाचा मूळ हेतू आहे.
तुरुंगातलं आयुष्य स्तब्ध करणार हे वातावरण मानसिक आरोग्यासाठी अतिशय घातक असून ज्या महिला ६ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्या आहेत, त्यापैकी ५० % स्त्रियांना कोणता न कोणता मानसिक आजार असल्याचं या पुस्तकाद्वारे लक्षात आलं आहे. मानसिक आरोग्य हेसुद्धा माणसाच्या सुदृढ आयुष्याचं द्योतक आहे ही गोष्ट आता कुठेतरी स्थान मिळवत आहे. स्त्रियांना समुपदेशन करण्यासाठी, त्यांच्या समस्या, त्यांच्या मूक भावनांमधील त्यांनी सोसलेल्या यातना या सर्व समजून घेण्यासाठी समुपदेशकाजवळ विशेष प्राविण्य असायला हवेच.त्यासाठीचे मार्गदर्शनही या पुस्तकात उत्तम रीतीने केले आहे.
नग्न करून मारझोड करणाऱ्या नवऱ्याला संपवलेली विमला , पिटा कायद्याखाली अटक झालेली आणि आईने धंद्याला का लावलं असावं या प्रश्नाने ग्रासलेली सलोनी , बालपणी मेहुण्याने केलेल्या बलात्काराचं ओझं शरीर आणि मनावर म्हातारपणापर्यंत वागवणारी ‘ पी ‘… अशा अनेकजणी…..यांच्या कथा वाचून ‘यांचे स्त्रीत्व हाच त्यांचा गुन्हा का?’ असा जीवघेणा प्रश्न वाचकाला भेडसावत राहतो. ब्लॅक अँड व्हाइट फोटोमधून दिसणारे त्यांचे डोळे जणू प्रकाशातल्या अंधाराची सहन न होणारी जाणीव करून देतात.
सेज पब्लिकेशन द्वारा प्रकाशित झालेलं हे पुस्तक २८२ पानांचे असून त्याची मूळ किंमत ४२५ रु. आहे.
समाजापासून दूर असलेल्या, रुक्ष भावनांचेच ऋतू जिथे बारा महिने हैदोस घालत असतात अशा नरकयातना भोगणा-या अनेक मातांची ही कहाणी एकदातरी वाचावी अशीच आहे…..

Monday, August 20, 2012

सुयोग निर्मित ‘केशवा माधवा’

383909 479463868739154 383514778 n सुयोग निर्मित केशवा माधवा



गुजराती आणि हिंदी रंगमंच गाजवल्यानंतर ‘केशवा माधवा’ हे नाटक आता मराठी रूपांतरण होऊन ‘सुयोग’ तर्फे मराठी रंगमंचावर आले आहे. या नाटकाची मूळ कथा गुजराती लेखक भावेश मंडालिआ यांनी लिहिलेली असून याचा मराठी अनुवाद चारुदत्त भागवत आणि अरविंद जगताप यांनी केला आहे. ‘देव’ या संकल्पनेबाबत प्रत्येकच पिढीमध्ये नव्याने वाद- प्रतिवाद होत असतात. आस्तिक आणि नास्तिक या दोन मोठ्या गटांमध्ये अगदी न संपणारे द्वंद्व चालू असते.
‘केशवा माधवा’ या नाटकामधील नायक केशव पाडळशिंगीकर हा नास्तिक, देवावर विश्वास न ठेवणारा आहे. पण उदरभरणासाठी म्हणून देवांच्याच मूर्त्या घडवून त्या विकणे असा त्याचा व्यवसाय आहे. अर्थात नाटकाच्या अखेरी देवाचे अस्तित्व मान्य न करणा-या केशवला ते मान्य करायला लावायचे याच अनुषंगाने संपूर्ण नाटक लिहिलेले आहे.
नायकाच्या भूमिकेत मकरंद अनासपुरे असून हेमंत भालेकर, अरुण शेलार, दीपक कदम, भरत शेलार, अतुल अभ्यंकर, निलेशसावे, धनश्री क्षीरसागर, विनिता काळे यांच्याही भूमिका या नाटकात आहेत. नाटकाचे दिग्दर्शन मंगेश कदम यांनी केले असून प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे. अशोक पत्की यांनी नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले आहे आणि नेपथ्य प्रदीप पाटील यांचे आहे.
आता नास्तिक केशवला आस्तिक बनवणारी अशी कोणती घटना त्याच्या आयुष्यात घडली आहे हे समजण्यासाठी प्रेक्षकांना नाटक पाहावेच लागेल.

Sunday, August 19, 2012

‘महाराष्ट्र कला निधी’ : मराठी चित्रपट उद्योग समूहासाठी नवीन आधार

झगमगाट आणि देखाव्यांपेक्षा वैचारिक बाजू आणि परिपूर्ण कलाविष्कार यांनी समृद्ध असलेले मराठी सिनेमे मराठी प्रेक्षक नेहमीच उचलून धरतात आणि रसिकांची मनमुराद दादही त्या सिनेमांना मिळते. असे अनेक मराठी सिनेमे आज प्रदर्शित होत आहेत. पण चित्रपट निर्मिती आणि त्यांचे प्रदर्शन यांच्यामध्ये असलेला महत्वाचा भाग अजूनही थोडा अपरिपूर्ण राहतोय, तो म्हणजे चित्रपटाचे मार्केटिंग……
म्हणूनच स्वाभिमान संघटनेचे युवा नेते नितेश राणे आणि ज्येष्ठ निर्माते अनंत पणशीकर यांनी मिळून चित्रपट निर्मिती आणि मार्केटिंग यासाठी आवश्यक असणारे आर्थिक पाठबळ पुरवण्याचा मानस असल्याचे जाहीर केले आहे. ‘महाराष्ट्र कला निधी’ या संस्थेची निर्मिती करून केवळ चित्रपट निर्मितीसाठीच नव्हे तर त्याच्या मार्केटिंगसाठी आवश्यक असलेले आर्थिक पाठबळ या संस्थेतर्फे पुरवले जाईल, असे नितेश राणे यांनी सांगितले. तसंच मराठी चित्रपटाच्या उद्योग जगतात दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करण्याची क्षमता असून हा दर्जा टिकवण्यासाठी ‘महाराष्ट्र कला निधी’ ची स्थापना केली गेली असल्याचं निर्माते अनंत पणशीकर यांनी स्पष्ट केलं.
मराठी चित्रपटांना बॉलीवूडमधील सिनेमांसारखी प्रसिद्धी मिळत नाही. उत्तम दर्जा आणि वैविध्यता असलेल्या मराठी चित्रपटांचे मार्केटिंगसुद्धा तेवढ्याच ताकदीचे व्हायला हवे. त्यासाठी मराठी उद्योजकांनी एकत्रित येऊन चित्रपट उद्योगासाठी मदत करण्याचे आवाहन नितेश राणे या संस्थेद्वारे करणार आहेत. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसारख्या पाहुण्यांकडून आपण मदतीची अपेक्षा करतो पण त्याआधी आपल्याच उद्योग समूहासाठी मराठी उद्योजक किती योगदान देतात याचा विचार व्हायला हवा, असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.
मूळ महाराष्ट्रीय असलेले आणि जगभरात नाव कमावलेले कलावंत, राजकीय क्षेत्रातील संबंधित व्यक्ती आणि उद्योग जगातील अनुभव या सर्व गोष्टींना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा विश्वास संपादन करून ही प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक कशा प्रकारे करता येईल आणि यातून आपला विकास कसा साधता येईल याचा विचार या उपक्रमातून केला जाईल असे नितेश राणे आणि अनंत पणशीकर यांनी सांगितले.

Saturday, August 18, 2012

गोव्यात भरणार पहिला भारतीय टीव्ही महोत्सव

छोट्या पडद्यासाठी मोठ्ठं व्यासपीठ
६०० पेक्षा जास्त वाहिन्या, गेल्या ५ वर्षाहून १२ टक्क्यांहून अधिक वाढ, ५० कोटींहून अधिक प्रेक्षकवर्ग आणि २०११ मध्ये ३३,००० कोटी रुपयांची घसघशीत उलाढाल हा सगळा तपशील आहे अमेरिका आणि चीन पाठोपाठ जगातील तिस-या क्रमांकावर असलेल्या भारतीय दूरचित्रवाणी क्षेत्राचा. अशा या भारतीय टेलिव्हिजन उद्योगाला पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी ‘ इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशन’ ने ‘इंडियन टीव्ही फेस्टिवल’ चे आयोजन केले आहे. देशविदेशातील तज्ञांचा या महोत्सवात सहभाग असून २ आणि ३ नोव्हेंबरला गोव्यामध्ये हा महोत्सव पार पडणार आहे.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील एका महत्वाच्या उद्योगाचा सोहळा म्हणून हा महोत्सव भरवण्यात येत आहे. या अभिनव व्यासपीठावरून भारतीय तसेच परदेशी प्रसारण उद्योगाला विविध व्याख्यानातून आणि चर्चासत्रांमधून आपल्या संकल्पनांची देवाणघेवाण करण्यात येईल. अँडी बर्ड, जॉन्सन, जेम्स मरडॉक, सुभाष चंद्र हे मान्यवरही या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
” या आयोजनाचा मुख्य हेतू भारत आणि इतर देशातील टीव्ही क्षेत्रातील मंडळींना एका छताखाली आणण्याचा आहे,” असे आयबीएफचे अध्यक्ष उदय शंकर यांनी सांगितले. या टेलिव्हिजन फेस्टिवल मध्ये व्यवसायाच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी खास जागाही महोत्सवात ठेवण्यात आली आहे. ” आता पहिल्यांदाच या महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र येऊन भारतीय टीव्ही क्षेत्राला जगभरात अग्रणी बनवण्याचा निर्धार केला आहे,” असे ‘टाईम्स टेलिव्हिजन नेटवर्क’ चे सुनील लुल्ला यांनी सांगितले.
या महोत्सवाविषयीची सर्व माहिती www.indiantvfest.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Friday, August 17, 2012

अघोर : २४ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

3 X 20 अघोर : २४ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

आज प्रत्येक गोष्ट मोजण्याचं ‘पैसा’ हे एवढं एकच परिमाण असल्याचं दिसून येतं. पण सेवाभावी वृत्ती ठेवून देशाला निरोगी बनवणा-यांची सुद्धा या धंदेवाईक जगात पैशासाठी स्पर्धा लागलेली पाहायला मिळते आहे. सध्या समाजात घडत असलेल्या विविध घटनांमुळे डॉक्टर आणि रुग्णामधली विश्वासाची गाठ कुठे तरी सैल होत असल्याचं लक्षात येतं. ही सुटत चाललेली गाठ पुन्हा एकदा घट्ट व्हावी या सकारात्मक दृष्टीकोनातून ‘अघोर’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
‘प्रतिभा फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार होणा-या या चित्रपटात, डॉक्टरांच्या वाढत्या व्यावसायिक दृष्टीकोनातून वैद्यकीय जगताचं झालेलं बाजारीकरण आणि त्याचे समाजावर होत असलेले परिणाम रेखाटण्यात आले आहेत. राजू धिवधोंडे, अॅड. रमण सेनाड, मंगेश पितळे निर्मित ‘अघोर’ चित्रपटाचे दिग्दर्शन सलीम शेख यांनी केले असून चित्रपटाची संकल्पना राजू धिवधोंडे यांची आहे.
चित्रपटाची कथा- पटकथा सलीम शेख यांचीच असून संवाद सलीम शेख आणि पराग धोंगे यांचे आहेत. गीतकार प्रवीण दवणे यांचे अप्रतिम शब्द आणि ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांच्या संगीत दिग्दर्शनाने चित्रपटातील गाणी सुश्राव्य अशी बनली आहेत.रवींद्र साठे, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, कुणाल गांजावाला, स्वप्नील बांदोडकर, कौस्तुभ दातार, वैशाली सामंत आणि बेला शेंडे या एक से एक गायकांची सुरावट गीतांमधून ऐकता येईल. चित्रपटाचे छायांकन आशुतोष आपटे, नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर, कला दिग्दर्शन अमर गायकवाड यांनी केले असून संकलन पराग- सुशांत यांनी केले आहे. आशुतोष खोब्रागडे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
संतोष जुवेकर, अनिकेत विश्वासराव, सई ताम्हणकर, मानसी कुलकर्णी, किशोरी शहाणे, डॉ. विलास उजवणे, विनोद राऊत, तेजस्वी पाटील, शादाब, रमण सेनाड या कलाकरांच्या भूमिका प्रेक्षकांना या चित्रपटात पाहता येतील. अत्यंत नाजूक सामाजिक आशयावर आधारलेला ‘अघोर’ हा चित्रपट येत्या २४ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

Wednesday, August 15, 2012

‘दि स्ट्रगलर्स – आम्ही उद्याचे हिरो’

The strugglers poster2 दि स्ट्रगलर्स   आम्ही उद्याचे हिरो
जन्माला येणारा प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात स्ट्रगल अनुभवत असतो. मुळात स्ट्रगल हा प्रकार प्रत्येक क्षेत्रात आहे. आजकाल आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पायरी, प्रत्येक प्रमोशन किंवा प्रत्येक अधिकार हा स्ट्रगलशिवाय मिळत नाही. हे १००% वास्तव आपण नाकारू शकत नाही. त्याचप्रकारे फिल्म इंडस्ट्रीतही फार मोठ्या प्रमाणावर स्ट्रगल करावे लागते. रुपेरी पडद्यावर येण्यासाठी बरेचसे कलाकार जीवाचा आटापिटा करताना आपल्याला दिसतात. फक्त एक संधी मिळावी यासाठी हे कलाकार वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. मग अशाच कलाकरांचा गैर फायदा घेणारे ठग सुद्धा या क्षेत्रात पावला पावलावर आढळतात. आपल्या स्वप्नांच्या मागे बेभान होऊन भरकटलेल्या अशा कलाकारांचं आणि त्यांच्या पालकांचं स्ट्रगल, वर्षानुवर्षे या क्षेत्रात मोलाचे काम करूनही आयुष्याच्या शेवटी पुन्हा स्ट्रगलरच, अशाच काही फिल्म इंडस्ट्रीतल्या नवोदित कलाकारांच्या स्ट्रगल वर टाकलेला हा सुवर्ण प्रकाश “दि स्ट्रगलर्स – आम्ही उद्याचे हिरो”.
‘दि स्ट्रगलर्स – आम्ही उद्याचे हिरो’ हा चित्रपट तयार असून प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत चिन्मय मांडलेकर, दिपाली मांडवकर तसेच संजय मोने, उदय सबनीस, प्रिया बेर्डे, सचिन आवटे सुनील देव, प्रकाश धोत्रे, अक्षय वाघमारे, संदेश गायकवाड, रणजीत घरत, विजय गीते, मानसी देवळेकर आदी मध्यवर्ती भूमिकेत आहेत. कथेला साजेशी असलेली गीते आणि नवोदित संगीतकार अनुराग गोडबोले यांचे सुमधुर संगीत ही या चित्रपटाची वैशिष्ट्ये आहेत. बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला तसेच ‘सारेगम’ फेम राहुल सक्सेना, अनघा ढोमसे तसेच ‘आता होऊन जाऊ दे’ चा विजेता आदर्श शिंदे यांनी या चित्रपटाची गाणी स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल आणि अहमदनगर येथे झाले असून तेथील स्थानिक नवोदित कलाकारांना देखील चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. गंभीर अशा वास्तववादी विषयावर मार्मिक विनोदाची झालर या चित्रपटात पाहता येईल. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या रॅगिंग या चित्रपटानंतर लेखक दिग्दर्शक विजय शिंदे यांचा हा दुसरा आशयपूर्ण सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज असून लवकरच जवळच्या सिनेमागृहात पाहता येईल.

Tuesday, August 14, 2012

‘लॉक ग्रिफिन’ : राजकीय रहस्याची आगळीवेगळी कथा

तीन पिढ्यांचा संदर्भ असलेली, आंतरराष्ट्रीय राजकीय- सामाजिक पटलावर उलगडणारी ‘लॉक ग्रिफिन’ ही वसंत लिमये यांची उत्कंठावर्धक कादंबरी नुकतीच ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रसिद्ध करण्यात आली. राजकारणाच्या पार्श्वभूमीवर रंगलेली ही मराठी कादंबरी प्रथमच मोठ्या कॅनव्हासवर मांडण्यात आली असून या कादंबरीचे प्रकाशनही आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी डिटेक्टीव्हच्या भूमिकेत प्रवेश करून कादंबरीशी निगडीत असलेल्या व्यक्तींशी संवाद साधला. कादंबरीतील रहस्यमय वातावरण आणि गूढता, प्रसंगाचे गांभीर्य या सर्व बाजू आपल्या अभिनयातून साकार करत राहुल सोलापूरकर यांनी कादंबरी उलगडण्याचा अनोखा प्रयत्न यावेळी केला.
ठाण्याच्या मल्हार सिनेमाजवळील सरस्वती मंदिर क्रीडा संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले असून अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते कादंबरीच्या ई- आवृतीचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले. कुमार केतकर यांनी आपल्या भाषणात १९७० ते १९८४ च्या काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपल्या सामाजिक जीवनावर झालेला परिणाम आणि त्यानंतर राजीव गांधींच्या हत्येपर्यंतचा काळ श्रोत्यांसमोर उभा केला.
पावणेपाचशे पानांच्या या कादंबरीची किंमत पाचशे रुपये आहे.

Monday, August 13, 2012

मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये बंदी

एका हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी १५ ऑगस्ट पासून राज्यभरातील सर्व मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांवर अघोषित बंदी घालण्यात आली आहे. शिवसेना आणि मनसे यांनी या अन्यायाचा निषेध करत त्याविरुद्ध आवाज उठवला आहे. ‘एक था टायगर’ या चित्रपटाला राज्यभरातील सर्व शो हवे असल्यामुळे राज्यातील सर्व मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठीची दारे बंद करण्यात आली आहेत, असं चित्रपट वितरणातील सूत्रांनी सांगितले आहे.
‘देऊळ’चे निर्माते अभिजित घोलप यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भारतीय’ या चित्रपटाला बंदीचा पहिला फटका बसला आहे. या अन्यायाविरुद्ध चित्रपटातील सर्व कलाकारांची टीम उद्या लोअर परेल येथील पीव्हीआर फिनिक्स मल्टीप्लेक्स मालकांची भेट घेणार आहे. शिवसेना आणि मनसे यांनी या लढाईत प्रवेश केला असून त्यांनी शासनाला २४ तासांची डेडलाईन दिली आहे. यानंतरही मराठी चित्रपटांवर होत असलेला अन्याय न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हवामान, पाणी टंचाई, शेती समस्या, पेट्रोलच्या दरांची चढ उतार अशा वास्तववादी आशयावर आधारलेल्या ‘भारतीय’ या चित्रपटाचे, राज्यभरात २०० सिनेमागृहात २५० शो सुरु आहेत. पण आता मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांवर बंदी घालून आपल्याच राज्यात इतर चित्रपटांना परवानगी मिळतेच कशी, असा सवाल चित्रपटाचे निर्माते अभिजित घोलप यांनी केला आहे.
“मल्टीप्लेक्स मालकांना २४ तासांची मुदत दिली जाईल. त्यानंतरही हालचाल न केल्यास मनसे स्टाईल ‘खळ्खट्याक’ आंदोलन केले जाईल.” असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
“भारतीय चित्रपटाच्या समूहाशी आमचे बोलणे झाले. त्यासंबंधी आधीच लोअर परेल येथील पीव्हीआर फिनिक्स मल्टीप्लेक्स मालकांना आम्ही पूर्वसूचना दिल्या आहेत. तरीही चित्रपटांवर बंदी घातली तर योग्य ती कारवाई केली जाईल ” असे भारतीय चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिजित पानसे यांनी स्पष्ट केले आहे.

मनसेच्या दणक्यानंतर मल्टीप्लेक्स चालक नमले

DSC 0016 1 मनसेच्या दणक्यानंतर मल्टीप्लेक्स चालक नमले

मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात नुकताच प्रदर्शित झालेला भारतीय हा मराठी चित्रपट काढून हिंदी चित्रपट दाखवण्याच्या तयारीत असलेल्या मल्टीप्लेक्स चालकांना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा दणका बसल्यानंतर भारतीय या मराठी चित्रपटाचे खेळ प्राईम टाईममध्ये दाखविण्यात येतील असे मल्टीप्लेक्स व्यवस्थापनांकडून सांगण्यात आले. मल्टीप्लेक्स व सिंगल स्क्रिन चित्रपटगृहामध्ये मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळत नाही, अशी तक्रार ‘भारतीय’ या चित्रपटाचे निर्माते अभिजित घोलप यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडे केली. याविषयाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने मल्टीप्लेक्स चित्रपटगृह चालकांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या शिष्टमंडळाने मल्टीप्लेक्स चित्रपट व्यवस्थापनेला या बाबतचे पत्र दिले. मराठी चित्रपट प्रत्येक आठवड्यात प्राईम टाईममध्ये दाखवले गेले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी मल्टीप्लेक्स चालकांची असेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याकडून देण्यात आला. शासन निर्णयानुसार मल्टीप्लेक्स चित्रपट गृहामध्ये मराठी चित्रपट दाखवणे हे बंधनकारक आहे. परंतु, मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये या नियमाचे पालन करण्यात येत नाही, तसेच शासन सुद्धा या मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांच्याबाबत कठोर कारवाई करत नाही. जर असेच चालत राहिले तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आपल्या पद्धतीने याबाबत तोडगा काढेल असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सांगितले. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर मल्टीप्लेक्स चित्रपट गृहाच्या व्यवस्थापकांनी मराठी चित्रपट प्राईम टाईममध्ये दाखवले जातील असे लेखी पत्रक दिले. या प्रसंगी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते महेश कोठारे, मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी, अभिजित घोलप व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे व स्थानिक मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Sunday, August 12, 2012

‘अभिजित पानसे’ दिग्दर्शकाच्या भूमिकेत

IMG 7294 2 अभिजित पानसे दिग्दर्शकाच्या भूमिकेत

शिवसेनेच्या भारतीय चित्रपटसृष्टीचे अध्यक्ष आणि लेखन- काव्य या क्षेत्रातील रसिक असलेले धडाडीचे नेते अभिजित पानसे प्रथमच दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रवेश करत सिनेमासृष्टीत पाऊल टाकणार आहेत. ‘रेगे’ या आगामी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे करत असून या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच खा. संजय राऊत यांच्या हस्ते कमालिस्तान स्टुडीओ येथे पार पडला.
‘द आर्टबीट’ या निर्मिती संस्थेद्वारे या चित्रपटाची निर्मिती होत असून ‘रेगे’ हा पहिलाच मराठी चित्रपट ते करत आहेत. डॉ. सुहास पंखे आणि श्री. अभिजित पानसे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
प्रत्येक तरुण मुलाच्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा येतो, ज्यावेळी मनाला गोंधळवून टाकणारं वातावरण किंवा परिस्थिती त्याच्या समोर उभी राहते. पण या संभ्रमातून सारासार विचार आणि सद्सद विवेकबुद्धीच्या जोरावर निर्णय घेऊन जो या परिस्थितीला योग्य रितीने सामोरा जातो त्याचं आयुष्य पुढे नक्कीच उज्ज्वल असतं. “भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असताना मला विविध वयोगटातल्या विद्यार्थ्यांना जवळून पाहता आलं. आणि अशा प्रकारच्या विषयावर आपण सिनेमा बनवावा असं मी निश्चित केलं. मला वाटतं सामाजिक संदेश ठळकपणे मांडण्यासाठी चित्रपट हे माध्यम आजच्या पिढीला आकर्षित करू शकतं,” अशी प्रतिक्रिया अभिजित पानसे यांनी व्यक्त केली. आरोह वेलणकर, पुष्कर श्रोत्री, संतोष जुवेकर, प्रवीण तरडे आणि महेश मांजरेकर अशा सर्व लोकप्रिय कलाकारांच्या अभिनयाने चित्रपट अधिक उत्कृष्ट होईल यात शंका नाही.
दबंग, हिरॉईन फेम महेश लिमये चित्रपटाचे छायांकन करत असून नवीन पिढीचे आवडते गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाची कथा- पटकथा आणि दिग्दर्शन अभिजीत पानसे करत असून संवाद अभिजित पानसे आणि प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. संतोष फुटाणे कलादिग्दर्शनाची बाजू सांभाळणार असून रवींद्र करमरकर आणि शिवकुमार पार्थसारथी हे सहदिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रत्नकांत जगताप हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
‘द आर्टबीट’ निर्मिती संस्थेचा हा सिनेमा नववर्षाच्या मुहूर्ताला म्हणजेच २०१३ च्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित केला जाणार आहे.

Saturday, August 11, 2012

बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये ‘दुस-या जगातली’ ची बाजी

3 बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये दुस या जगातली ची बाजी

राज्य पुरस्कारांच्या यादीमध्ये नाव मिळवून गौरवल्या गेलेल्या मराठी चित्रपटांच्या रांगेत आता अजून एका यशस्वी चित्रपटाची भर पडणार आहे. सतीश रणदिवे निर्मित आणि दिग्दर्शित ‘दुस-या जगातली’ या चित्रपटाची बर्लिन महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट पासून सुरू होत असलेल्या या बर्लिन महोत्सवामध्ये १७ ऑगस्टला बर्लिन मधील Padilon थिएटर मध्ये हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. भारतातील विविध भाषांतील चित्रपटांचा यात समावेश असून मराठीतून ‘दुस-या जगातली’ ची निवड करण्यात आली आहे.
झी गौरव मध्ये नामांकन मिळवलेल्या, महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट सामाजिक चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शित चित्रपट आणि थर्ड आय एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराच्या भूमिकेसाठी गौरवली गेलेली ही ‘दुस-या जगातली’ आता बर्लिनवासियांचे मन जिंकून घेणार आहे. पसायदान चित्र निर्मिती संस्थेची निर्मिती असलेला हा चित्रपट ३ ऑगस्टला पुण्यात प्रदर्शित झाला असून १० ऑगस्टला मुंबईसह इतर राज्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. डॉ. भा.ल. पाटील यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट अनाथ मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारा आहे.
या चित्रपटात ज्येष्ठ दिग्दर्शक राजा परांजपे आश्रम चालकाच्या मुख्य भूमिकेत असून बालकलाकार वैष्णवी रणदिवे हिने ‘रमी’ या अनाथ मुलीची भूमिका साकारली आहे. जर्मन अभिनेत्री सुझेन बर्नेट आणि अमेरिकन अभिनेता नश नोबर्ट या परदेशी कलाकारांच्या अभिनयाने चित्रपट वास्तववादी झाला असून चित्रपटात मधु कांबीकर, नंदा रणदिवे, प्रमोद शिंदे, प्रसाद माळी, सेवा मोरे, मिलिंद ओक, दिलीप बापट, चंद्रकांत जोशी, पूजा पवार- साळुंखे या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. अनाथ बाल संकुल कोल्हापूर मधील शेकडो अनाथ मुलींचाही चित्रपटात सहभाग आहे.
जर्मन अभिनेत्री सुझेन बर्नेट हि बर्लिन चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच एक अतिशय संवेदनशील सामाजिक विषय सतीश रणदिवे यांनी उत्तमरीत्या हाताळला आहे आणि या कलाकृतीतील संदेश प्रेक्षकांच्या मनापर्यंत अचूक पोहोचवला आहे असेच म्हणता येईल.

Friday, August 10, 2012

‘सलाम पुणे’ पुरस्कार प्रदान सोहळा

News सलाम पुणे पुरस्कार प्रदान सोहळा
प्रख्यात उद्योजक डीएसके उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी, पुण्य नगरीचे संस्थापक संपादक मुरलीधर अनंता शिंगोटे, सकाळचे राजकीय संपादक गोविंदराव घोळवे आणि सिंघम, रावडी राठोड फेम मराठी अभिनेता अशोक समर्थ यांना सलाम पुणे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अनाथांचा आधार असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील नवी पेठ मधील एस एम जोशी फौंडेशनच्या मुख्य सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे तसेच चित्रपट निर्माते मेघराज राजे भोसले, जे.के. पाटील, वैभव जोशी, जगदीश उणेचा, इम्पाचे संचालक विकास पाटील, सुमित कॅसेटचे सुभाष परदेशी, हास्यकलावंत संतोष चोरडिया, संगीतकार हर्षित अभिराज, निखील महामुनी या सर्व मान्यवरांची उपस्थिती सोहळ्याला लाभणार आहे.
सलाम पुणे चे संजय लोणकर, सुभाषचंद्र जाधव, राम झोंड, श्रीकांत कुलकर्णी, राधिका कुलकर्णी, हरीश शर्मा आणि इतर पत्रकार मित्रांच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन केले गेले आहे.

Thursday, August 9, 2012

दहीहंडीच्या गाण्याने ‘कुंभारवाडा- डोंगरी’ चित्रपटाचा मुहूर्त

1 दहीहंडीच्या गाण्याने कुंभारवाडा  डोंगरी चित्रपटाचा मुहूर्त

सध्याच्या गुन्हेगारी वाढत चाललेल्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी जगताचं चित्रण करणारे अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. वास्तववादी चित्रण, तत्कालीन सामाजिक, राजकीय संदर्भ यामुळे हे चित्रपट पाहणाऱ्यांचा एक प्रेक्षकवर्गही तयार झाला आहे. मराठी सृष्टीत तितकासा न हाताळला गेलेला हा विषय ‘कुंभारवाडा- डोंगरी’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे. गुन्हेगारी जगावर नजर टाकून त्याची कहाणी मांडणा-या या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच दहीहंडीच्या गाण्याच्या चित्रीकरणाने पार पडला. ‘अंकुर मूव्हीज’ या बॅनरखाली तयार होणा-या या चित्रपटाची निर्मिती अंकिता लाड करत असून सदानंद पप्पू लाड हे दिग्दर्शन करत आहेत. अंकुर स्वामी हा नवोदित अभिनेता या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे. समिधा बांदिवडेकर, संदेश जाधव, के. टी. आनंदराव, भारती पाटील, अनिकेत केळकर, सुहास पळशीकर, रवींद्र बेर्डे आणि अनंत जोग यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
सध्या सर्वत्र दहीहंडीची धूम सुरू आहे आणि याचेच औचित्य साधून चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. ‘दहीकाल्याचा उत्सव छान रे, कुणी जाऊ नका लांब रे….’ या गीताच्या तालावर थिरकत गोविंदांच्या जल्लोषाचे चित्रीकरण करण्यात आले. मुलांच्या गोविंदाबरोबरच गोपिकांचा दहीकाला आणि त्यांचाही थरारक जल्लोष या गाण्यात चित्रित करण्यात आला. हे गीत पप्पू लाड यांनी लिहिलेले असून गाण्याचे संगीत अशोक वायंगणकर यांचे आहे.
मुंबईतील गुन्हेगारीची सुरुवात ‘कुंभारवाडा- डोंगरी’ या भागातूनच झालेली असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. सदानंद कोळी या तरुणाचा गुन्हेगारी जगात झालेला प्रवेश आणि त्यानंतरच्या त्याच्या आयुष्यात झालेल्या घटनांचा प्रवास या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. चित्रपटाची कथा पप्पू लाड यांची असून पटकथा, संवाद प्रकाश भालेकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच पूर्ण होऊन दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्माते आणि दिग्दर्शक यांचा विचार आहे.

Wednesday, August 8, 2012

तुझ्या ‘मनात’ कुणीतरी : मनातल्या मनातली मनस्वी कथा

या संपूर्ण मानवजातीच्या उत्क्रांतीतून विकसित झालेली निसर्गाची एक अद्भुत किमया म्हणजे माणसाचे ‘मन’. अच्युत गोडबोले लिखित ‘मनात’ या पुस्तकात याच मनाचा खोलवर जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न श्री. अच्युत यांनी केला आहे.
पृथ्वीच्या निर्मितीचा शोध लावण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावणारा माणूस अजूनही मनाच्या निर्मितीचा शोध लावू शकलेला नाही आणि तसा तो लागणारही नाही. अशा या बुद्धीच्या कक्षेत न सापडणा-या अदृश्य मनाची कहाणी या पुस्तकात वाचकांना कळणार आहे. माणसाच्या शरीर आणि मेंदूबरोबरच त्याच्या मनामध्येही अनेक बदल झाले, त्याच्या संकल्पना बदलल्या, निरनिराळे पैलू उलगडले अशा मनाचा इतिहास, त्यावर झालेले संशोधन, निष्कर्ष आणि त्याचे वेगवेगळे रूप आपल्याला पुस्तकात वाचता येईल. अतिशय सध्या, सोप्या भाषेतील तपशीलवार माहिती या पुस्तकात दिलेली आहे.
माणसाच्या मेंदूला ज्याचा थांग अजून लागलेला नाही असे हे अदृश्य मन आपल्या शरीराचा एक अवयवच आहे. अनादी आणि अनंत अशा मनाच्या संस्कृतीचा इतिहास वाचताना वाचकाच्या ‘मनामध्ये’ एक अवर्णनीय कुतूहल जागे होऊन त्यांना अचंबित करणारे ज्ञान या पुस्तकाच्या रूपाने मिळणार आहे. ज्याचे वर्णन वाचून आपलं ‘मन’ थक्क होतंय, आपण अवाक होतोय तेच मन आपल्याही शरीरात आहेच आणि सगळी त्याचीच लीला असल्यामुळे आपण हे अनुभव घेऊ शकतो हा अनुभव तर नक्कीच शब्दात मांडता येण्यासारखा नसेल….
निर्गुण- निराकार अशा अंतरात्म्याच्या अलीकडे अस्तित्वात असणारे ‘मन’ मात्र निराकार नसते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा षडरिपूंनी बद्ध झालेले हे मन माणसाच्या कळत नकळत त्याच्या आयुष्यातील घटनांना जबाबदार ठरत असते. क्षणार्धात बदलणा-या त्याच्या अवस्था म्हणजे आनंद, दु:ख, काळजी, राग, अभिमान, अहंकार, याच्या कचाट्यात सापडून माणूस मात्र पुरता थकून जात असतो. पण हे थकणे आपल्या मनाचे असून आपण मात्र निराकार राहून, स्थितप्रज्ञ राहून आयुष्य जगले पाहिजे हे समजणे फार गरजेचे असते.
‘एक वेळ आभाळाचा थांग लागेल पण माणसाच्या मनाचा नाही’ असं विधान आपण अनुभवत असतोच. पण याच अथांग मनाचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत असताना जे काही धागे दोरे महान तत्त्वज्ञांना सापडले त्याचा उल्लेख मनात या पुस्तकात आला आहे. श्रीकृष्ण, ख्रिस्त,बुद्ध, कालिदास असो किंवा मग शेक्सपियर, फ्रॉईड, टॉल्सटॉय असो यांच्या बरोबरीनेच अनेक मानसशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, तत्ववेत्ते अशा अनेक व्यक्ती आणि प्रवृत्ती या जगात होऊन गेल्या….या प्रत्येकाच्या अद्भुत व्यक्तिमत्वाचा गाभा हा त्यांच्या मनामध्येच झालेल्या उच्च विकसनातच दडला होता, या वास्तवाचा केवळ स्वीकार न करता त्याचा थोडा अभ्यास या पुस्तकाद्वारे आपल्याला करता येईल….
वाहणा-या वा-यासारखे चंचल असणारे हे मन सांभाळत आपण मात्र या वादळ वा-यात कसे स्थिर राहायचे याचे उत्तम मार्गदर्शन श्री. अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकाद्वारे केले आहे. ‘मनोविकास प्रकाशन’ तर्फे प्रकाशित होणारे हे पुस्तक ६२८ पानांचे असून पुस्तकाचे मूल्य रू. ३७५ आहे.प्रत्येकाच्याच अंतर्मनाला साद घालणारे आणि आपल्या जवळ असणा-या निसर्गाच्या एका आविष्काराचे साक्षी असणारे हे पुस्तक प्रत्येकाने मनापासून वाचायला हवेच.

Tuesday, August 7, 2012

युवराज सिंह लिहिणार आत्मचरित्र – कॅन्सरबरोबर झालेली युवीची लढाई ‘इन डिफरन्ट फॉर्म’

Yuvraj Singh recovered from Lung Tumour युवराज सिंह लिहिणार आत्मचरित्र   कॅन्सरबरोबर झालेली युवीची लढाई इन डिफरन्ट फॉर्म



आयुष्याच्या वाटेवर चालणा-या तमाम वाटसरूंना अनुभवांच्या साथीने बळ मिळतं ते आपल्या आधी काही क्षण जास्त आणि वेगळा रस्ता चाललेल्यांकडून…..यशस्वी, शून्यातून विश्वाची निर्मिती करणा-या, आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर प्रारब्धावर मात मिळवलेल्या व्यक्तींचे आत्मचरित्र म्हणजे अंधारात सापडलेल्या वाटसरूंना प्रकाशाची आशा दाखवणारे ठरते. आणि म्हणूनच कॅन्सरसारख्या रोगाच्या तावडीतून सहीसलामत सुटून टीम इंडिया मध्ये पुन्हा सामील झालेला ‘युवराज सिंग’ आत्मचरित्र लिहिणार आहे. ‘इन डिफरन्ट फॉर्म’ या त्याच्या आत्मचरित्रातून कॅन्सरशी झालेली त्याची लढाई तो सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे.
क्रिकेटच्या मैदानावर यशस्वी खेळी खेळणारा युवराज, वर्ल्ड कप मध्ये भव्य यश मिळवून दिल्यानंतर जणू गायब झाला होता. त्याच्या या उज्ज्वल यशावर काळोख पसरवणारा कॅन्सर समोर आल्यावर मात्र युवीच्या तमाम चाहत्यांनी त्याच्या सुदृढ आयुष्याबद्दल प्रार्थना सुरु केल्या होत्या. आणि सर्वाच्याच आशीर्वादाने थेट अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर सर्वांचा लाडका युवी आज पुन्हा नव्या उमेदीने मैदानावर उतरण्यास सज्ज झाला आहे. इतर कॅन्सर झालेल्या रुग्णांना प्रेरणा देणारं त्याचं आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर युवराजने भारतातील कॅन्सरग्रस्त रुग्णांची माहिती काढली. कॅन्सरग्रस्तांच्या यादीत आपले नाव जाऊन आज आपण सहीसलामत बाहेर आल्यामुळे त्या रोगाने ग्रासलेल्या माणसांची मनस्थिती, त्यांच्या वेदना यांचा युवीला अनुभव आहे. वर्ल्ड कप ते कॅन्सर या दोन वर्षांच्या काळामध्ये एक अनपेक्षित अध्याय युवीच्या आयुष्यात आला ज्याने त्याच्या आयुष्याला वेगळंच वळण दिलं. त्यामुळे इतर कॅन्सर झालेल्या रुग्णांना प्रेरणा देणारं त्याचं आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. ज्या संस्थेने लान्स आर्मस्ट्राँगचे पुस्तक प्रकाशित केले तीच संस्था युवीचे हे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे.
नवी दिल्लीतील ‘Random House’ या प्रकाशन संस्थेतर्फे ‘इन डिफरन्ट फॉर्म’ प्रकाशित केले जाणार असून १२ डिसेंबर २०१२ रोजी हे पुस्तक बाजारात येणार आहे.

Monday, August 6, 2012

Gangs of Wassepur बरोबर ‘BIG 92.7 FM’ करणार Olympic ची सफर

RJ Yamini with cast of Gangs of Wasseypur Richaa Chadda and Nawazuddin Siddique promoting BIG Music Olympiad at BIG FM Mumbai Gangs of Wassepur बरोबर  BIG 92.7 FM करणार Olympic ची सफर

भारताचे नंबर १ रेडिओ नेटवर्क आणि ब्रॉडकास्टर BIG 92 .7 FM तर्फे ऑलिम्पिक संबंधित एक भव्यदिव्य स्वरूपाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ऑलिम्पिकच्या रणांगणावर चालू असलेल्या खेळांची बित्तंबातमी या कार्यक्रमात दिली जाणार आहे. त्याचबरोबर Gangs of Wassepur या हिंदी चित्रपटातील कलाकारांचा या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग असणार आहे. हा शो सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळांना ऑन एअर असून BIG 92 .7 FM च्या 30 स्टेशन्स वर प्रस्तुत केला जाणार आहे.
RJ यामिनी हि Gangs of Wassepur च्या कलाकारांबरोबर ‘Music Olympiad’ हा शो करत आहे. ऑलिम्पिकच्या घडामोडींबरोबरच Gangs of Wassepur च्या कलाकारांच्या हास्य विनोदांनी आणि प्रश्न-उत्तरांनी हा शो रंगणार आहे. अर्थात संपूर्ण भारताशी या निमित्ताने हे कलाकार संवाद साधणार असल्यामुळे त्यांना खूप मोठी प्रसिद्धी मिळणार हे नक्की…..
‘BIG Music Olympiad’ हा शो ऑन एअर टूर्नामेंटबरोबरच संगीताच्या साथीने ताल धरायला लावणार आहे. BIG BBC Olympic stars, BIG BBC Past Forward- offering trivia, BIG BBC Maidaan-E-Olympic या सर्वांच्या सहकार्याने हा शो होणार आहे. खेळातील विशेष घडामोडींबरोबरच ताज्या चालू घडामोडींची माहिती मिळण्यासाठी BBC चे सहकार्य मोलाचे असणार आहे. यामध्ये पदक मिळवलेले खेळाडू , नवीन रेकॉर्ड, त्याचबरोबर खेळातील दोन्ही बाजूंकडील स्पर्धकांची माहितीसुद्धा देण्यात येईल. अशा प्रकारे भारतभरातील श्रोत्यांचे परिपूर्ण मनोरंजन करणारं हे Music Olympiad आहे. खेळाडूंच्या मुलाखतींची भर या कार्यक्रमाला आणखीनच थेट स्वरूप देईल……
रेडिओ आणि टेलिव्हिजनशी संबंधित असलेले विशेष वितरक या शोचे प्रायोजक असणार आहेत.
” BIG 92 .7 FM हे या आधी कधीही सादर करण्यात न आलेले विशिष्ट विषयांचे कार्यक्रम सर्व ठिकाणच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी खूप मेहनत घेत आहेत. संगीत मनोरंजन हे प्राथमिक उद्दिष्ट तसेच जपून ऑलिम्पिकच्या महत्वाच्या बातम्यांची रेलचेल या Music Olympiad मध्ये असेल. BBC च्या मोठ्या सहकार्याने आम्ही आमच्या श्रोत्यांपर्यंत ख-या आणि मुद्देसूद घटना पोहचवणार आहोत जेणेकरून श्रोत्यांना संगीताच्या साथीने या खेळाचा थरारक अनुभवसुद्धा घेता येईल.” असे बिग BIG 92 .7 FM च्या प्रवर्तकांनी सांगितले.

Saturday, August 4, 2012

हृदयस्पर्शी ‘दुस-या जगातली’

MG 9637 1 हृदयस्पर्शी दुस या जगातली

मेघराज राजेभोसले आणि वैभव जोशी यांच्या ‘नलिनोत्तम पांडव’ तर्फे एक अतिशय हृदयस्पर्शी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवामध्ये यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सामाजिक व उत्कृष्ट दिग्दर्शित म्हणून गौरवण्यात आलेला निर्माते- लेखक- दिग्दर्शक सतीश रणदिवे यांचा ‘ दुस-या जगातली’ हा भावनाप्रधान चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
डॉ. भा.ल. पाटील यांच्या ‘दुस-या जगातली’ या गाजलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आधारला आहे. अनाथ मुलींच्या भावविश्वावर मायेची नजर फिरवणारी या चित्रपटाची कथा आहे.
आपल्या जन्मदात्याच्या प्रतीक्षेत आयुष्यभर त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणारे निष्पाप जीव, कच-याच्या कुंडीत कुत्र्या- मांज-याचं भक्ष्य बनण्यासाठी फेकून दिलेले दुर्दैवी जीव, या अश्राप जीवांचे संगोपन करणारे आश्रम या सा-या हृदयद्रावक वास्तवाची कथा या चित्रपटात सांगितली आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कायद्याने हे मुले आश्रमावर अवलंबून राहू शकत नाहीत, त्यामुळे या मुलांचे भविष्य सुरक्षित राहावे म्हणून त्यांना हक्काचे आईवडील मिळवून देण्यासाठी आश्रमातील सेवाभावी सुजनांची धडपड या चित्रपटात रेखाटली आहे.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारे, जुनेजाणते आणि मराठी चित्रपटसृष्टीला ऋषितुल्य असणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक ‘राजदत्त’ हे या चित्रपटात ‘आबा’ या आश्रम चालकाच्या प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत.
झी गौरव मध्ये नामांकित झालेली आणि थर्ड आय एशिअन इंटरनेशनल फेस्टिवल मध्ये उत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आलेली वैष्णवी रणदिवे ‘रमी’ ही या चित्रपटात अनाथ मुलीची भूमिका करत आहे. आश्रमातील एका उपक्रमाअंतर्गत दिवाळीच्या सणानिमित्त काही दिवसांसाठी तिला पाहुणी म्हणून एका घरी पाठविले जाते. त्या कुटुंबवत्सल घरामध्ये मायेची उब तिला मिळते. आई, वडील, बहिण, भाऊ या नात्यांना पारखी झालेल्या तिला तिच्या आयुष्यातल्या रिकाम्या जागांची जाणीव त्या घरात होते. या उपकथानकाला वेगळं वळण देणारं परदेशी दत्तक प्रकरण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. जर्मन अभिनेत्री सूझेने आणि अमेरिकन अभिनेता नाश नोबर्त या परदेशी कलाकारांच्या अदाकारीने चित्रपटाला अधिक वास्तव स्वरूप दिले आहे.
या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण जयप्रभा स्टुडीओ, कोल्हापूर येथे झाले आहे. मधु कांबीकर, नंदा रणदिवे, प्रमोद शिंदे, प्रसाद माळी, सेवा मोरे, मिलिंद ओक, दिलीप बापट, चंद्रकांत जोशी, पूजा पवार- साळुंखे यांच्यासह अनाथ बाल संकुल कोल्हापूर येथील शेकडो अनाथ मुलींनी या चित्रपटात सहभाग घेतला आहे. या चित्रपटातील गाणी मधुकर आरकडे यांनी लिहिली असून शशांक पवार आणि मनोहर गोलांबरे यांनी गीतांना संगीत दिले आहे. चित्रपटाचे छायांकन-शरद चव्हाण, संकलन- विजय खोचीकर, पार्श्वसंगीत- महेश नाईक, कला- सतीश बीडकर, रंगभूषा- सुनील मुसळे, वेशभूषा- सुभाष कांबळे यांची आहे.कुटुंबाच्या प्रेमळ हाकेसाठी आसुसलेली ‘ दुस-या जगातली’ ती प्रेक्षकांना नक्कीच भावेल.

Friday, August 3, 2012

प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच ‘कुटुंब’

‘ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट’ प्रस्तुत ‘कुटुंब’ नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ काकस्पर्श’ या सिनेमाच्या भरघोस यशानंतर महेश मांजरेकर आता एका नवीन कुटुंबाची कथा आपल्यासमोर आणणार आहेत. २६ जुलै २०१२ रोजी या सिनेमाचा फर्स्ट लूक करण्यात आला. महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, वीणा जामकर, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, मानसी नाईक हे चित्रपटातील सर्व कलाकार त्यावेळी उपस्थित होते.
‘कुटुंब’ या नावातूनच एक आनंदी, प्रेमळ, माणसांनी सजलेले असं घर डोळ्यासमोर येतं. एकमेकांना निरपेक्षपणे सहकार्य करणारी, समोरच्याने न बोलता त्याच्या मनातले सारे काही समजणारी माणसं ज्या कुटुंबात असतील असं आदर्श कुटुंब प्रत्येकाचंच असायला हवं. अशाच एक प्रेमळ, आनंदी, संकटांवर मिळून मात करणा-या कुटुंबाची कथा ‘कुटुंब’ या सिनेमात रेखाटली आहे.
कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत असलेला नामदेव (जितेंद्र जोशी) आणि त्याची बायको गंगा (वीणा जामकर) यांचे हे छोटेसे कुटुंब. त्यांची दोन मुले सुभान (मिहीर सोनी) आणि लक्ष्मी (गौरी इंगवले) यांच्याबरोबर सिद्धार्थ जाधव आणि मानसी नाईक यांची धम्माल जोडी या चित्रपटात आपल्याला पाहता येईल. जितेंद्र जोशी आणि मानसी नाईक यांचा एक वेगळाच लूक या चित्रपटात आहे. जितेंद्र जोशी एक माळ्याच्या भूमिकेत तर मानसी नाईक ही मुसलमान स्त्रीच्या भूमिकेत असणार आहे. कुटुंबासाठी आणि आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतीही गोष्ट करण्याची तयारी असलेला नामदेव कशा रीतीने आर्थिक संकटांचा सामना करून त्याचे कुटुंब सांभाळतो याचे चित्रण सिनेमात आहे.
सुदेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात एका पेक्षा एक फेम मिहीर सोनीची प्रथमच अभिनय क्षेत्रात एन्ट्री होतेय. या चित्रपटाचे संगीत अजित-समीर आणि अभिजित कवठलकर यांचे आहे.
‘कुटुंब’ ही संकल्पना जास्त व्यापक करता आली तर समाज कितीतरी पटीने सुखी बनू शकतो याचा अनुभव गावपातळीवर सजलेलं हे छोटसं कुटुंब प्रेक्षकांना देईल हे नक्की….