छोट्या पडद्यासाठी मोठ्ठं व्यासपीठ
६०० पेक्षा जास्त वाहिन्या, गेल्या ५ वर्षाहून १२ टक्क्यांहून अधिक वाढ, ५० कोटींहून अधिक प्रेक्षकवर्ग आणि २०११ मध्ये ३३,००० कोटी रुपयांची घसघशीत उलाढाल हा सगळा तपशील आहे अमेरिका आणि चीन पाठोपाठ जगातील तिस-या क्रमांकावर असलेल्या भारतीय दूरचित्रवाणी क्षेत्राचा. अशा या भारतीय टेलिव्हिजन उद्योगाला पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी ‘ इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशन’ ने ‘इंडियन टीव्ही फेस्टिवल’ चे आयोजन केले आहे. देशविदेशातील तज्ञांचा या महोत्सवात सहभाग असून २ आणि ३ नोव्हेंबरला गोव्यामध्ये हा महोत्सव पार पडणार आहे.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील एका महत्वाच्या उद्योगाचा सोहळा म्हणून हा महोत्सव भरवण्यात येत आहे. या अभिनव व्यासपीठावरून भारतीय तसेच परदेशी प्रसारण उद्योगाला विविध व्याख्यानातून आणि चर्चासत्रांमधून आपल्या संकल्पनांची देवाणघेवाण करण्यात येईल. अँडी बर्ड, जॉन्सन, जेम्स मरडॉक, सुभाष चंद्र हे मान्यवरही या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
” या आयोजनाचा मुख्य हेतू भारत आणि इतर देशातील टीव्ही क्षेत्रातील मंडळींना एका छताखाली आणण्याचा आहे,” असे आयबीएफचे अध्यक्ष उदय शंकर यांनी सांगितले. या टेलिव्हिजन फेस्टिवल मध्ये व्यवसायाच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी खास जागाही महोत्सवात ठेवण्यात आली आहे. ” आता पहिल्यांदाच या महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र येऊन भारतीय टीव्ही क्षेत्राला जगभरात अग्रणी बनवण्याचा निर्धार केला आहे,” असे ‘टाईम्स टेलिव्हिजन नेटवर्क’ चे सुनील लुल्ला यांनी सांगितले.
या महोत्सवाविषयीची सर्व माहिती www.indiantvfest.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:
Post a Comment