Wednesday, August 1, 2012

‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ फर्स्ट लूक

download नो एन्ट्री पुढे धोका आहे  फर्स्ट लूक


अंडरग्राऊंड फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक २५ जुलैला करण्यात आला. प्रेमनाथ राजागोपालन आणि निखील सैनी निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. भरत जाधव, क्रांती रेडकर, सई लोकुर, अंकुश चौधरी, मनवा नाईक, अनिकेत विश्वासराव, सई ताम्हणकर हे चित्रपटातील सगळे कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.
हिंदी नो एन्ट्री चे दिग्दर्शक अनीस बाजमी, संगीत दिग्दर्शक अनु मलिक आणि सुधा यांनी सुद्धा कार्यक्रमाला हजेरी लावली. या चित्रपटातील गाणी गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिली असून नाकेश आणि सरगम यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचे छायांकन अरविंद सोनी यांनी केले आहे.
अनु मलिक आणि सुधाजींनी या चित्रपटाचे संगीत ऐकून या गाण्यांना आपली मनमुराद पसंती दिली. त्याचबरोबर अनीस बाजमी यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहून मराठी मध्ये असेच दर्जेदार चित्रपट तयार होत राहिले तर मराठी चित्रपटसृष्टीला सोनेरी दिवस येतील असे सांगून चित्रपटाला आपल्या शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment