‘ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट’ प्रस्तुत ‘कुटुंब’ नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ काकस्पर्श’ या सिनेमाच्या भरघोस यशानंतर महेश मांजरेकर आता एका नवीन कुटुंबाची कथा आपल्यासमोर आणणार आहेत. २६ जुलै २०१२ रोजी या सिनेमाचा फर्स्ट लूक करण्यात आला. महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, वीणा जामकर, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, मानसी नाईक हे चित्रपटातील सर्व कलाकार त्यावेळी उपस्थित होते.
‘कुटुंब’ या नावातूनच एक आनंदी, प्रेमळ, माणसांनी सजलेले असं घर डोळ्यासमोर येतं. एकमेकांना निरपेक्षपणे सहकार्य करणारी, समोरच्याने न बोलता त्याच्या मनातले सारे काही समजणारी माणसं ज्या कुटुंबात असतील असं आदर्श कुटुंब प्रत्येकाचंच असायला हवं. अशाच एक प्रेमळ, आनंदी, संकटांवर मिळून मात करणा-या कुटुंबाची कथा ‘कुटुंब’ या सिनेमात रेखाटली आहे.
कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत असलेला नामदेव (जितेंद्र जोशी) आणि त्याची बायको गंगा (वीणा जामकर) यांचे हे छोटेसे कुटुंब. त्यांची दोन मुले सुभान (मिहीर सोनी) आणि लक्ष्मी (गौरी इंगवले) यांच्याबरोबर सिद्धार्थ जाधव आणि मानसी नाईक यांची धम्माल जोडी या चित्रपटात आपल्याला पाहता येईल. जितेंद्र जोशी आणि मानसी नाईक यांचा एक वेगळाच लूक या चित्रपटात आहे. जितेंद्र जोशी एक माळ्याच्या भूमिकेत तर मानसी नाईक ही मुसलमान स्त्रीच्या भूमिकेत असणार आहे. कुटुंबासाठी आणि आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतीही गोष्ट करण्याची तयारी असलेला नामदेव कशा रीतीने आर्थिक संकटांचा सामना करून त्याचे कुटुंब सांभाळतो याचे चित्रण सिनेमात आहे.
सुदेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात एका पेक्षा एक फेम मिहीर सोनीची प्रथमच अभिनय क्षेत्रात एन्ट्री होतेय. या चित्रपटाचे संगीत अजित-समीर आणि अभिजित कवठलकर यांचे आहे.
‘कुटुंब’ ही संकल्पना जास्त व्यापक करता आली तर समाज कितीतरी पटीने सुखी बनू शकतो याचा अनुभव गावपातळीवर सजलेलं हे छोटसं कुटुंब प्रेक्षकांना देईल हे नक्की….

No comments:
Post a Comment