'खेडयाकडे चला' असा संदेश देणार्या या चित्रपटाच्या निर्मितीचा संकल्प केला आहे निर्माते अरविंद तावरे यांनी. त्यांच्या 'मुक्ती व्हिज्युअल्स' या बॅनरखाली बनणार्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत समीर रावसाहेब तर चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे, सिया पाटील, डॉ. शरद भुताडीया, माधव अभ्यंकर, समीर विजय, संजय कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, शशांक शेंडे आणि गणेश यादव यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. चित्रपटाची कथा- पटकथा- संवाद शिव कदम यांची असून कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी आदि रामचंद्र हे सांभाळीत आहेत.
'जागरण' मधील अर्थपूर्ण गीते शिव कदम, प्रसन्न देशमुख यांनी लिहीली असून त्यांना आदि रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले आहे. तर ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, सुरेश वाडकर, वैशाली सामंत आणि आदि रामचंद्र यांनी गायली आहेत.
No comments:
Post a Comment