Thursday, July 26, 2012

‘गावाकडची अमेरिका’: अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे चित्रण

गगनचुंबी इमारती, भव्य शॉपिंग मॉल्स, स्वच्छ आणि प्रशस्त रस्ते, वा-याच्या वेगाने धावणा-या कार, सिलिकॉन व्हॅली, हॉलीवूड, डिज्नीवर्ल्ड स्वप्ननगरी, मॅक्डॉनल्ड आणि पिझ्झाहट…….
इतकी सगळी लिस्ट बघितल्या नंतर या सगळ्याचं माहेरघर असणा-या ‘अमेरिकेचं’ नाव प्रत्येकाच्याच ओठावर येईल.
पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, त्या दोन्ही बाजू प्रत्येकालाच माहित असतील असं नाही. म्हणजे संपूर्ण जगाची ‘महासत्ता’ म्हणून ओळखल्या जाणा-या अमेरिकेची लखलखती बाजू सर्वांनाच माहित आहे. पण या झगमगाटापासून दूर असलेली, विकासाच्या पाउलवाटा अजूनही जिच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत अशीही एक अमेरिका अस्तित्वात आहे याची जाणीव फार कमी लोकांना आहे.
न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस, शिकागो म्हणजे अमेरिका असं एक समीकरणच बनलं आहे. पण या अतिप्रगत शहरांच्या सावलीत साधं- सुधं जीवन जगणारी, शेतात राबणारी, शहरी जीवनाचा वारा न लागलेली, देवभोळी – प्रसंगी कर्मठ धार्मिक, असलेली ग्रामीण अमेरिका नांदते आहे.
‘डॉ. संजीव चौबळ’ हे मूळचे मुंबईकर पशुवैद्यक. दहा वर्षाहून अधिक काळ नोकरीनिमित्ताने अमेरिकेच्या ग्रामीण भागात, आडवाटेच्या लहानशा गावांत, शहरी सुखसोयींपासून दूर वास्तव्य करताना डॉक्टरांनी सहकुटुंब ही ‘गावाकडची अमेरिका’ अगदी जवळून पहिली आणि अनुभवली. अमेरिकेत येणा-या पर्यटकांच्याच नाही तर तिथे वर्षानुवर्ष वास्तव्य करून राहणा-या अनेक भारतीयांना अनोळखी असलेले अमेरिकेचे ग्रामीण जीवन त्यांना अनुभवता यावे यासाठी डॉ. संजीव चौबळ यांनी आपले अनुभव शब्दबद्ध केले आहेत.
अमेरिका म्हणजे अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी असे कल्पनाचित्र रेखाटणा-या भारतीयांच्या समजुतीला छेद देणारे अमेरिकेचे ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण आहे.
अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये राहणा-या मराठी बांधवांना या ग्रामीण अमेरिकेचे रूप समजावे आणि भारतात राहून अमेरिकेच्या झगमगाटाची भव्य दिव्य स्वप्ने रंगवणाऱ्या भारतीय बांधवांना वास्तवाचा स्पर्श व्हावा हाही या पुस्तकामागचा उद्देश आहे.
अमेरिकेत राहूनही तेथील ग्रामीण जीवन न पाहिलेल्या मराठी अमेरिकन लोकांनी हे पुस्तक नावाजलं आहे. त्यामुळे नोकरी- धंदा, शिक्षण किंवा पर्यटनासाठी जाणा-या अथवा जाण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने वाचावे आणि संग्रही ठेवावे असे हे उपयुक्त पुस्तक आहे.
हे पुस्तक खरेदीसाठी आता उपलब्ध आहे.
छापील प्रत – महाराष्ट्रात – रु.३००/- (टपाल खर्च अंतर्भूत) …………………………………….
छापील प्रत – भारतात – रु.३५०/- (टपाल खर्च अंतर्भूत) …………………………………….
खरेदीसाठी संपर्क साधा:
मराठीसृष्टी
चाणक्य, ३रा मजला, क्लासिक प्लाझाच्या मागे, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२. भारत
दूरध्वनी: (९१-२२) २५४२११८५ / २५३३९००३
इ-मेल: bookshop@marathisrushti.com

No comments:

Post a Comment