Saturday, July 14, 2012

भारतीयाच्या आई य्याई य्यो ची क्रेझ

केवळ सहा दिवसातच ८० हजारांपेक्षा जास्त फेसबुक व्युव्हर्स आणि साडेतीन हजारांहून अधिक यु ट्यूब व्युव्हर्स मिळवत देविशा फिल्म्स च्या गाण्याने यंगस्टर्स मध्ये आपली अनोखी क्रेझ निर्माण केली आहे. तब्बल तीन वर्षां नंतर अजय अतुल भारतीय द्वारे मराठी चित्रपटात पुनरागमन करत आहेत त्यामुळे त्यांच्या डाय हार्ड fan मध्ये त्यांच्या गाण्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती,गेल्या सहाच दिवसांपूर्वी भारतीयाच्या फेसबुक पेज वर अपलोड झालेल्या गाण्यांनी अल्पावधीतच रसिकांची मन जिंकली भारतीय मधल्या या झांगडगुत्त्याची क्रेझ जर अशीच कायम राहिली तर हे गाणे कोलावारी डी चे यश गाठू शकेल यात शंकाच नाही.
bharatiya 300x202 भारतीयाच्या आई य्याई य्यो ची क्रेझ
या गाण्यातले शब्द आणि ठेका आपल्याला एखाद्या साउथ इंडियन गाण्याची आठवण आणून देत असला तरीही हे गाणे मराठीतच आहे. या बद्दल गीतकार गुरु ठाकूर म्हणतो कि,” माझं आणि अजय अतुलचं ट्युनिंग इतकं पक्कं झाल आहे कि अनेकदा ते मला ट्यून मेल करतात आणि मी माझे शब्द त्यांना मेसेज करतो , मी जेव्हा हे गाणं लिहायला घेतल तेव्हा मी खरतर बऱ्याच कन्नड शब्दांचा आभ्यास केला आणि ते शब्द मला यात वापरता येतील का याचा विचार केला पण मग मला अस वाटलं कि त्या शब्दांचे अर्थच जर ऐकणाऱ्याला समजले नाहीत तर त्यात काही मजा येणार नाही मग मराठीतलेच कन्नड वाटतील असे शब्द वापरून मी हे गाणं लिहिलेलं आहे.”

अजय या गाण्या बद्दल असे म्हणतो कि,” चित्रपट सुरु झाल्यानंतर काही वेळातच येणार हे गाण आहे , त्यामुळे या गाण्यातून त्या गावाची एक वेगळी ओळख प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सहसा चित्रपटान मधून प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळतो या चित्रपटात मात्र प्रेमाचा अजब चौकोन मांडला गेलाय त्याची ओळखही या गाण्यामधून होत जाते. श्रेया सारख्या गुणी गायीके बरोबर परत एकदा काम करायला खूप मज्जा आली,” झांगड गुत्ता हे गाणं श्रेया अफलातून पणे गायली आहे. त्यामुळे हे गाणं क्रेझ निर्माण करणारच या बद्दल शंकाच नाही.तुमच्या पैकी अजूनही काही असे असतील ज्यांनी हे गाणं पहिल नसेल तर त्यांनी www.bharatiyathefilm.com वर लॉग ऑन करा किंवा खास ईसकाळच्या वाचकासाठी http://www.esakal.com/esakal/20120711/5019899679539599057.htm हि लिंक आहे आणि फेसबुक युजर्स http://www.facebook.com/bharatiyathefilm


हि लिंक फॉलो करून देविशा फिल्म्सच्या ‘भारतीय’ बद्दल अपडेटेड राहू शकतात.सुबोध भावे, जितेंद्र जोशी, डॉ मोहन आगाशे , कुलदीप पवार , ह्रीशिकेश जोशी, मिता सावरकर , तेजश्री, उज्वला जोग,शुभांगी लाठकर ,सुशांत शेलार,आणि मकरंद अनासपुरे अशी जबरदस्त स्टार कास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्याच बरोबर अप्रतिम सौंदर्याने नटलेले लोकेशन्स हि या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू असणार आहे.
bharatiya marathi movie
अनिरुद्ध पोतदारची अनोखी कथा, गिरीश मोहितेच अनुभवी दिग्दर्शन , संजय पवारांचे दुव्वाधार संवाद, अजय अतुलच अजिंक्य संगीत आणि देविशा फिल्म्सचे अभिजित घोलप यांच्या सारखा चाणाक्ष निर्माता असं फुल्ली लोडेड कॉम्बिनेशन म्हणजे “भारतीय….म्हंजी काय रं भाऊ “

No comments:

Post a Comment