Monday, July 2, 2012

श्वेता शिंदे कमबॅकसाठी उत्सुक.

Shweta Shinde, Marathi Actress


नाटक, मालिका, चित्रपट आणि नृत्यामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवणार्‍या श्वेताला रुपेरी पडदा पुन्हा खुणवू लागला आहे. अभिनेत्री अर्थात सुपरमॉम श्वेता शिंदे कमबॅकसाठी उत्सुक आहे. पुनरागमन करताना श्वेताला पुर्वीपेक्षा काहीतरी वेगळ्या आणि हटके भूमिका किंवा एखादी ऐतिहासिक भूमिका करण्याची इच्छा आहे. 
परखड व्यक्तीरेखांसोबतच कॉमेडी व्यक्तीरेखा साकारण्यातही हातखंडा असणार्‍या श्वेताने प्रेक्षकांना पोटधरुन हसायला भाग पाडले होते. प्रेक्षकांची पोचपावती मिळाळ्यामुळेच या सुपर मॉमने ही कमबॅकची जय्यत तयारी केली आहे. श्वेता सांगते की, भूमिका कुटह्लीही असो त्यामध्ये कलाकाराने समरस व्हायला पाहिजे. तेव्हाच ती भूमिका प्रेक्षकांच्या कायम आठवणीत राहते, अशा प्रकारच्या भूमिका मला आताच्या नव्या प्रवासातही साकारायच्या आहेत. विनोदी भूमिका करणे त्यातून प्रेक्षकांना हसवणं फारच कठिण असले तरी त्या मला जमतात, मला लोकांना हसवायला आवडते. 

No comments:

Post a Comment