Saturday, July 7, 2012

चित्रपटाच्या निमित्ताने मनसे आणि काँग्रेस एकत्र

cats चित्रपटाच्या निमित्ताने मनसे आणि काँग्रेस एकत्र



मनसे आणि काँग्रेस राजकारणात एकत्र नसले तरी चित्रपटासाठी दोघंही एकत्र येत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात केंद्रीय विज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव रितेश देशमुख मुख्य भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे राजकारणात विरोधक असणारे चित्रपटाच्या निमित्ताने मात्र एकत्र येत आहेत. निशिकांत कामत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर संगीत महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजय-अतुल यांचं असणार आहे. या चित्रपटाचे नाव अजून नक्की व्हायचं आहे आणि चित्रपटाची घोषणाही लवकरच होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा चित्रपट नेमका कसा असणार हे अजून नक्की कळायचं आहे.

No comments:

Post a Comment