प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यकृतीवर तयार होत असलेल्या 'चांदी' या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना न्यायलयीन लढाईत यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच रेकॉर्ड करण्यात आले.
ज्ञानेश्वर गोवेकर यांच्या प्रभाकर फिल्म्स या बॅनरची निर्मिती असलेल्या आणि समीर नाईक दिग्दर्शित 'चादी' या चित्रपटासाठी लिहिले गेलेले टायटलसाँग जबरदस्त आहे. सुरेश वाडकरांच्या सांताक्रुझ येथील आजिवसन स्टुडिओमध्ये या गाण्याचे रेकॉर्डिंग अवधुत गुप्तेच्या आवाजात करण्यात आले.
लेखक अनिल पवार लिखित आणि समीर नाईक दिग्दर्शित चित्रपटातल्या या गीताला संगीतकार प्रवीण कुवर यांचे संगीत दिले असून मीना गोविंद यांनी ते शब्दबद्ध केले आहे.
No comments:
Post a Comment