Saturday, July 7, 2012

'लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध पुरस्कर २०१२'.

Lokshahir Vitthal Umap

काही माणसं मृदगंधासारखी असतात....  ज्यांनी भेगाळलेल्या, खडतर वाटावरुन प्रवास करुन कलेची, रसिकांची सेवा करुन जनसामान्यात आपल्या कार्याचा सुगंध दरवळत ठेवला आहे. 

महाराष्ट्राच्या मातीतील विविध क्षेत्रात अशा काही प्रतिभाशाली व्यक्तीमत्वांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि विचाराने आपल्या मातीचा मृद्गंध महाराष्ट्रासोबत जगभर पसरविला आहे.  कला, साहित्य, शिक्षण, संगीत, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याची दखल घेणारा कृतज्ञता सोहळा 'वत्सला प्रतिष्ठान'च्या वतीने 'लोकशाहीर विठ्ठल उमप मृद्गंध पुरस्कार २०१२' आयोजित केला आहे. 

विठ्ठल उमप यांच्या स्मरणार्थ हा सोहळा गेल्या वर्षीपासून आयोजित करण्यात येत असून यंदा हे या सोहळ्याचे दुसरे वर्ष आहे. रविवार १५ जुलैला प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात हा सोहळा रंगणार असून अवघ्या महाराष्ट्राच्या वतीने सन्मानितांना मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

लोकसंगीताला मान्यता प्राप्त करुन देणार्‍या लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावे देण्यात येणारा 'लोकशाहीर विठठल उमप मृदगंध पुरस्कार' हा प्रत्येक कलावंतासाठी तितकाचा बहुमोल आणि सन्माननीय आहे.

'वत्सला प्रतिष्ठान'चे मुख्य विश्वस्त संदेश विठ्ठ्ल उमप यांच्यासह विश्वस्त श्री. राजन गावंड, श्री उदेश विठ्ठल उमप आणि श्री. नंदेश उमप सोहळ्याची धुरा सांभाळीत आहेत. 

No comments:

Post a Comment