चिमुरडी, लाघवी आणि लडिवाळ रमा आणि तत्त्वनिष्ठ तरिही मायाळू महादेवराव रानडे यांची खरी खुरी कहाणी सांगणार्या 'उंच माझा झोका' या झी मराठीवरील मालिकेने शंभर भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे. या मालिकेचा शंभरावा भाग गुरुवार २८ जून रोजी प्रदर्शित झाला. या पार्श्वभूमीवर दि. २ जुलै ते ७ जुलै या कालावधीत रात्री ८.०० वाजता या मालिकेचा शतकपूर्ती सप्ताह प्रक्षेपित केला जाणार आहे. रमाबाई रानडे यांच्या जीवनातील पहिला मैलाचा दगड ठरलेली महत्त्वपूर्ण घटना या 'शतकपूर्ती सप्ताहा'त प्रक्षेपित होणार आहे ती म्हणजे प्रार्थना सभेतलं रमाचं पहिलं वहिलं भाषण !
अन्नपूर्णाबाईंच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या महिलांच्या सभेत, भाषण करण्यासाठी महादेवरावांनी रमाबाईंना भाषणाचे मुद्दे लिहून दिले आणि ते पाठ करायला सांगितले. रमाबाईंनी भाषण पाठ केलं. रमाला निरुपण करण्याची सवय होती. मात्र प्रार्थना सभेत सामाजिक प्रश्नांवर स्वतःचे विचार प्रकट करणं आणि प्रार्थना सभेत पहिलं वहिलं भाषण करत महिला सबलीकरणात पहिलं पाऊल उचललं. रमाबाई रानडे यांछं प्रेरणादायी चरित्र अनुभवण्यासाठी पाहात रहा - उंच माझा झोका. सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वाजता झी मराठीवर.
No comments:
Post a Comment