रंगमंच एन्टरटेन्मेन्ट निर्मित 'कलाकार' या चित्रपटाचे निर्माते आशय पालेकर असून दिग्दर्शक साकार राऊत आहेत. भूषण प्रधान आणि अमृता देशमुख हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. छोट्या गावातून आलेल्या एका सामान्य तरूणाचा सुपरस्टार पर्यंतचा प्रवास म्हणजे 'कलाकार' चित्रपट होय. सुपरस्टार झालेला हा चित्रपटाचा नायक 'मॅक्स स्टोर्स'चे उद्घाटन करतो असे दृश्य मंगळवारी ठाण्याच्या आर मॉलमधील मॅक्स स्टोर्स येथे पार पडले. सदर दृश्य भूषण प्रधान याच्यावर चित्रीत करण्यात आले.
चित्रपटाविषयी बोलताना भूषण प्रधान म्हणाला की, माझी वाटचाल ही कुठेतरी कलाकार चित्रपटातल्या नायकासारखीच आहे. ही भूमिका साकारताना खरोखरच एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळत आहे.
'कलाकार'चे दिग्दर्शक साकार राऊत चित्रपटाविषयी माहिती देताना म्हणाले की, आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम अभिनेते आहेत. पण सुपरस्टार नाही. बॉलिवुडमधल्या सलमान, शाहरुख, आमिर सारखा सुपरस्टार आपल्याकडे देखील होऊ शकतो, हे या चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
No comments:
Post a Comment