'संस्कृती कला दर्पण नाट्य महोत्सव २०१२' या नाट्य महोत्सवाचा उदघाटन सोहळा ९२ व्या अ. भा. म. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व जेष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांच्या शुभहस्ते पार पडला.
'संस्कृतीला कला दर्पण नाट्य महोत्सवा' मध्ये एकूण २९ व्यावसायिक नाटकांमधून उत्कृष्ट १० नाटकांची निवड करण्यात आली. व्यावसायिक नाट्य परीक्षणाचे काम लीलाधर कांबळी, शशिकांत शिर्सेकर, अरुण घाडीगांवकर आणि नंदू गाडगीळ यांनी केले. तसेच ११ प्रायोगिक नाटकांमधून उत्कृष्ट ४ नाटकांची निवड निखील हजारे आणि अरुण घाडीगावकर यांनी केली. यामध्ये 'कोणे एके काळी', 'लख लख चंदेरी', 'अजिंठा' आणि 'बागुलबुवा' या नाटकांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment