Thursday, January 12, 2012

'कुणी मुलगी देता का मुलगी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

निर्माते सुशील जैन, गौतम जैन, सचिन शर्मा आणि पंकज विश्वकर्मा यांनी 'माँ महालक्ष्मी एन्टरटेनमेंटच्या बॅनरखाली 'कुणी मुलगी देता का मुलगी' या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

या चित्रपटाची कथा सचिन शर्मा यांची असून पटकथा अशोक कार्लेकर आणि ऋग्वेद यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. संवाद, गीते आणि संगीत याची जवाबदारी ऋग्वेद यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या पत्नी रेखा भारद्वाज यांनी प्रथमच मराठी गाण्याला आपला आवाज दिला आहे. 

या चित्रपटामध्ये आशुतोष कुलकर्णी, शीतल मौलिक, पराग चौधरी, मनोज आचार्य, सुनील होळकर, विपुल वर्तक, जयवंत पाटेकर, विनीता सुळे-काळे, लीलाधर कांबळी, गणेश रेवडेकर, पूर्णिमा अहिरे, सुनिल शिंदे आणि मेघा घाडगे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

No comments:

Post a Comment