Wednesday, January 18, 2012

'गोळाबेरीज' मध्ये सतिश शहा साकारत आहेत 'पेस्तन काका'.

'डिफरण्ट स्ट्रोक्स कम्युनिकेशन्स प्रा.लि.' संस्थेचा 'गोळाबेरीज' हा चित्रपट १० फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होतोय. डॉ. देवदत्त कपाडिया निर्मित, क्षितीज झारापकर दिग्दर्शित या आगामी चित्रपटातून पुलंनी रंगविलेल्या असंख्य व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहेत. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा परस्परांहून भिन्न असली तरी तिची खास स्वभाव वैशिष्ठ्य आहेत. त्यामुळे कोणती व्यक्तीरेखा कोणता कलाकार साकारणार ही उत्सुकता आता सिनेरसिकांमध्ये पहायला मिळत आहे. 

अनेक कलावंतांची फौज असलेल्या 'गोळाबेरीज' चित्रपटातील पेस्तन काकांची भूमिका हिंदीतील अनुभवी अभिनेते सतीश शहा यांनी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते मराठीत काम करीत असून त्यांची ही भूमिका पारशी लोकांच्या स्वभावातील बारकाव्यांचे, लकबींचे अभ्यास करुन साकारली आहे. पारशी लोकांच्या बोलण्याची पद्धत, मराठी बोलण्याची शैली आणि त्यातूनच निर्माण झालेली भाषिक गंमत 'गोळाबेरीज' पाहताना रसिकांना येणार आहे.

No comments:

Post a Comment