रिद्धी एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटात बाप आणि बेटा या दोघांच्या नात्याचा, या दोन पिढ्यांमधल्या वैचारिक संघर्षाचा विषय हाताळण्यात आला आहे. निसार खान, मितेश देसाई, मुकेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, स्मिता तळवळकर, संतोष जुवेकर, स्मिता शेवाळे, आशालता वाबगावकर, बाळ धुरी, विजय चव्हाण, माधव अभ्यंकर, शैलेश दातार, आकांक्षा ठाकूर, प्रफुल्ल सामंत, प्रतिभा गोरेगावकर, इरावती लागू, रश्मी येसूगडे यंच्यासोबतच बालकलाकार पप्पन पाटील आणि आकांक्षा जगदाळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन आसित रेडीज यांचे असून चित्रपटाचे संवाद प्रवीण शांताराम आणि आसित रेडीज यांनी लिहीले आहेत. गीते बाबा चव्हाण यांनी लिहीली असून अशोक सराफ, मुग्धा वैशंपायन, क्षितीज तारे, निहीरा जोशी आणि हृषिकेश कामेरकर यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांना संगीतकर सतीश चंद्र यांनी संगीतबद्ध केले आहे. समीर आठल्ये यांचे छायांकन असून राजेश राव यांनी संकलन केले आहे,
शहरी आणि ग्रामीण संदर्भ असलेले कथानक असल्याने सगळ्याच स्तरातील प्रेक्षकांना हा चित्रपट पसंत पडेल याबद्दल शंकाच नाही.
No comments:
Post a Comment