Monday, January 23, 2012

मराठी चित्रपट निर्मितीत 'महिला महाबचत गटाचा' प्रवेश २७ जानेवारीला होणार '३१ डिसेंबर .. रक्ताविना क्रांती' प्रदर्शित.

मराठी चित्रपट निर्मितीत वेगवेगळे बदल होताना दिसत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच भंडारा जिल्ह्यातील शेप या महिला महाबचत गटाकडून ३१ डिसेंबर . . .  रक्ताविना क्रांती या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 

भारताला स्वतंत्र होऊन ६० वर्षे उलटून गेली. तरी आपापसातल युद्ध अजून संपत नाही. एका बाजूला देशाचे सशक्त संविधान लोकशाही आणि महान शांतीदूत भगवान गौतम बुद्ध यांची शिकवण तर दुसर्‍या बाजूला आत्मकेंद्रीत नक्षलवादी विचारसरणीचे द्वंद्व म्हणजेच ३१ डिसेंबर.. रक्ताविना क्रांती चित्रपट होय.

चित्रपटाची कथा राज (संतोष जुवेकर) आणि बिरसा (प्रभाकर सुखदेवे) यांच्या भावविश्वाभोवती गुंफण्यात आली आहे. मेजर कांबळे (मोहन जोशी) यांच्या मार्गदर्शनाखाली राज आणि त्याचे दोन मित्र विवान ( सिद्धार्थ चांदेकर) आणि इक्बाल यांचे नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी सुरु असलेले बौद्धिक, शारिरीक आणि मानसिक प्रशिक्षण आणि ३१ डिसेंबरला घडलेली क्रांती. या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या मोरेश्वर मेश्राम यांची निर्मिती आणि शशिकांत तुपे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात संतोष जुवेकर, सिद्धार्थ चांदेकर, मोहन जोशी, सयाजी शिंदे, रिमा लागू, कश्मिरा कुलकर्णी, स्नेहा रायकर, प्रभाकर सुखदेवे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात एकूण ५ गाणी असून सिद्धांत माधव यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. 

No comments:

Post a Comment