फ्लॅश मॉब म्हणजे जिथे १०० ते १५० जणांचा जमाव एखाद्या कारणासाठी एकत्र येऊन नृत्य सादर करण्याचा प्रकार. काही दिवसांपूर्वी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये फ्लॅश मॉब सादर केला होता. या ग्रुपने पुढे ठाण्यातील कोरम मॉल मध्ये एकत्र येऊन तिथेही 'मॅटर'च्या या अनोख्या डान्सच्या गाण्यांवर ठेका धरला. फ्लॅश मॉब या अनोख्या डान्सनंतर कोरम मॉलमध्ये 'मॅटर'च्या कलाकार तंत्रज्ञांच्या सोबतीने दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे यांनी या चित्रपटाच्या ध्वनिफितीच प्रकाशन केल. या प्रसंगी अभिनेता संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिग्दर्शक सतिश मोतलिंग, निर्माती पूनम शेंडे, संगीतकार अभिजित कवठाळकर, अभिनेत्री मेघा धाडे, व्हिडिओ पॅलेसचे नानू जयसिंघानी आदि मान्यवर उपस्थित होते.
'मॅटर' या चित्रपटात एकूण ११ गाणी असून ती ओरिजनल आणि रिमिक्स ट्रॅकमध्ये रसिकांना ऐकता येतील. जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, अभिनेत्री मेघा धाडे, योगिनी चौक आणि रुमा बोंद्रे यांनी चित्रपटातील या गाण्यासाठी पाश्वर्गायन केलं आहे. याशिवाय इतर गाण्यांसाठी अभिजित कवठाळकर, आदर्श शिंदे, आशिष गाडे, सागर सातपुते, अभिषेक मोतलिंग, रेश्मा सोनवणे अशा यंग बिग्रेड गायकांचा वापर करण्यात आला आहे. जितेंद्र जोशी आणि दिपक ठुबे यांच्या गीतांना अभिजित कवठाळकर यांनी संगीतबद्ध केलं आहे.
No comments:
Post a Comment