Tuesday, January 24, 2012

सीमा प्रश्न आणि राजकारण यांच्यावर भाष्य करणारा 'हायकमांड' येतोय.

निर्मात्या दिप्ती किरण यांच्या 'ॐ साई संतोषी फिल्मस प्रॉडक्शन'  यांची निर्मिती असलेला हायकमांड नावाचा नवा कोरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. मराठीत पहिल्यांदाच सीमा प्रश्नावरील व त्यावरील राजकारणावर चित्रपट येतोय. या चित्रपटात हायकमांड येणार म्हटल्यानंतर गल्लीतील नगरसेवकांपासून दिल्लीतील मंत्र्याचा दमछाक होतो तर आमदार खासदारांना तर श्वासच रोखून धरायला लागतो. वाढती महागाई, गुन्हेगारी यावर स्वतःची पोळी कशी भाजतात हे राजकारणी मंडळी हे सर्व आपणास पहावयास मिळेल

चित्रपटांची कथा श्री मनीष राम कुलकर्णी तर कथेची संकल्पना किरणसाई कुलकर्णी यांची असून पटकथा, संवाद प्रदीप पाटील यांचे आहेत.  चित्रपटाचे दिग्दर्शक यशवंत भालकर हे आहेत. चित्रपटातील गीते स्व. वि. वा शिरवाडकर ( कुसुमाग्रज ) श्रीकांत नरुले यांची असून वैभव जोशी यांनी आयटम गीते लिहिले आहे. या गीतांना संगीताचा साज शशांक पोवार यांनी चढवला आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत शरद पोक्षे, सुनील बर्वे, राहुल सोलापूरकर, प्रियंका यादव, अश्विनी एकबोटे व स्वप्नील राजशेखर हे कलाकार आपणास पाहावयास मिळतील. तर आयटम सॉंग मध्ये आपणास हेमलता बाणे व सिया पाटील दिसणार आहेत.  

No comments:

Post a Comment