सांग सांग गंगाराम या चित्रपटची कथा व पटकथा जगदीश वाठारकर यांची आहे. कथा फॅन्टसी व विनोदी आहे. बाबुराव नावाचा तरुण अपघातात स्वर्गवासी होतो. इंद्रलोकात चित्रगुप्ताच्या दरबारात बाबुरावाचा आत्मा पोहचलेला असतो. खाली पृथ्वीवर अधर्म असत्याचा प्रभाव इतका वाढला आहे की सत्य डळमळीत झाले आहे. धर्म बुडायला लागला आहे. तेव्हा पृथ्वी भ्रमण करून ह्या गोष्टीची खात्री केली पाहिजे, असे सर्वानुमते ठरते व पृथ्वीवर यमराजांना पाठवायचे ठरते. यमराज पृथ्वीवर येतात, त्यांना गंगाराम भेटतो, तो पृथ्वीवर चाललेल्या घडामोडी यमराजांना दाखवितो. मग यम आणि गंगाराम पृथ्वीवर काय हंगामा करतात. यमाला पृथ्वीवर काय काय अनुभव येतात? बाबुराव कोमातून बाहेर येतो काय? आणि नवशी सावित्री सारखी आपल्या नवऱ्याला यमाच्या पाशातून कसे सोडविते? आणि हे फक्त गंगारामच सांगू शकतो.
सांग सांग गंगाराम मध्ये गंगाराम कमलाकर सातपुते व यम अभिजीत चव्हाण यांनी साकारला आहे. सांग सांग गंगाराम ची गीते दिग्दर्शक जगदीश वाठारकर यांनी लिहिली असून बुजुर्ग संगीतकर बाळ पळसुले यांनी दिलं आहे. संवाद एन, रेळेकर, शैलेंद्र पाटील व जयप्रकाश परुळेकर या तिघांनी मिळून लिहिली आहेत. छायाकन अजिजभाई मोतीवाला, ध्वनी प्रकाश निकम यांचा आहे. कमलाकर सातपुते, अभिजीत चव्हाण, श्वेता बोराडे यांच्यासह सिधेश्वर झाडबुके, संदीप पाटक, अरुण कदम, सुरेखा कुडची, रवी फलटणकर, भालचंद्र कुलकर्णी, उमेश बोळके छाया सागावकर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.
पुढील दोन महिन्यात व्हिज्युअल ग्राफिक (VFX) पूर्ण होईल व लवकरात लवकर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment