उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांच्या आरभाट या संस्थेची निर्मिती असलेल्या 'मसाला' या चित्रपटासाठी पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले पुण्याची ओळख दाखविणार्या ठिकाणांचे चित्रण चित्रपटात असून त्यासाठीच आज पुण्यातल्या पौड रोड, शनिवारवाडा अशा वैशिष्ट्यपूर्णं भागात आज 'मसाला' या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भेटीगाठींसाठी एक आगळीवेगळी संकल्पना तयार करुन मसालाची टूर काढण्यात आली होती. अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि पुणे ही मसाला टूरच्या पहिल्या सत्रातील ठिकाणे होती. लवकरच दुसर्या फेरीला सुरुवात होणार असून त्यात मुंबई ते विदर्भ असा प्रवास घडणार आहे.
पुणे-मुंबई या महानगरांमध्ये मराठी सिनेमाची चर्चा अधिक होत असते, कलाकारांच्या भेटीगाठी होत असतात परंतु शहराबाहेरच्या रसिक प्रेक्षकांनासुद्धा या चित्रपटाची माहिती व्हावी, आणि महाराष्ट्रातल्या सर्वच महत्त्वाच्या शहरातल्या प्रेक्षकांशी या निमित्ताने संवाद साधावा हा या टूरचा मुख्य हेतू असून 'मसाला' या चित्रपटाची एक आकर्षक बस तयार करण्यात आली आहे. चित्रीकरण पहायला आलेल्या प्रेक्षकांशी आणि त्या ठिकाणच्या प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला जात आहे. एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment