पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करून लोकांना करमणूक करून दाखवणेस्वतःच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला असला तरी कष्ट करून मुलांना चांगले शिक्षण द्यायचे असे स्वप्न त्यांच्यातील अनेकजण पाहू लागले आहेत .
असेच काहीसे स्वप्न पाहणाऱ्या एका 'डोंबारी' कुटुंबाची कथा या चित्रपटात मांडली आहे. अशा वेगळ्या धाटणीच्या विषयाचे संवाद लेखन शंकर नर्हे यांचे असून गीत लेखन रवी पाईक व राजेंद्र भोसले यांचे आहे. तर संगीताची धुरा संगीतकार हर्षीत अभिराज यांनी संभाळली आहे.
मिलिंद शिंदे, हेमांगी कवी, मधू कांबीकर, मेधा घाडगे, मोहिनी कुलकर्णी, दादा पासलकर, दिपक करंदीकर, संजय खापरे हे कलाकार चित्रपटात आपल्याला दिसतील.
No comments:
Post a Comment