या चित्रपट महोत्सवात तब्बल ५६ मराठी चित्रपटातून १७ उत्तम चित्रपटाची निवड करण्यात आली. या १७ चित्रपटामध्ये 'शाळा', 'गजर' , 'रे ला रे' , 'डँबिस', 'खेळ मांडला' , 'अर्जुन', 'आम्ही का तिसरे' , 'फक्त लढ म्हणा', 'आरोही' , 'सोपान एक जिदद' , 'मुक्ती' , 'बालगंधर्व' , 'झकास' , 'यदा यदा ही धर्मस्य' , 'नऊ सव्वा नऊची वेळ होती', 'देऊळ' या चित्रपटांबरोबर 'आजच्या चित्रपटावरील जाहिरात आणि प्रमोशन' व 'आधुनिक तंत्रज्ञान आणि चित्रपट' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे.
'शाळा' चित्रपटापासून सुरु झालेल्या महोत्सवाची सांगता 'देऊळ' या चित्रपटाने होणार आहे. या स्पर्धेत वरील १७ चित्रपटाचे परीक्षण करून सर्वोत्कृष्ट तीन चित्रपट निवडले जाणार असून निवडलेल्या तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांना प्रथम पारितोषिक रुपये २ लाख, द्वीतीय दीड लाख आणि तृतीय एक लाख रुपयाचे पारितोषिक हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे.
No comments:
Post a Comment