ढोलकीच्या तालावर मध्ये 'लावणी' विरुद्ध शास्त्रीय नृत्य.
मराठी सिनेसृष्टी आणि मालिकांमध्ये काम करणार्या नऊ नायिका आणि तीन लावणी नृत्यांगणा यांचा स्पर्धक म्हणून सहभाग असलेल्या 'ढोलकीच्या तालावर' ह्या रिऍलिटी शो मधून दिवसागणिक एक एक लावण्यवती बाद होऊन स्नेहा वाघ, वैशाली जाधव, सुकन्या काळण, सोनाली पवार, सोनाली खरे आणि तेजा देवकर या लावण्यवती सेमी फायनलमध्ये दाखल झाल्या आहेत यांच्या सोबत कॉल बॅक एपिसोडच्या भागात पियुषा पाटील आणि सुझेन बरनेट या दोन लावण्यवती सेमी फायनल मध्ये दाखल होऊन अंतिम लढत या लावण्यवतींमध्ये होणार आहे.'ढोलकीच्या तालावर' हा कार्यक्रम ह्या ही वेळी विशेष ठरणार आहे तो जुगलबंदीमुळे. सेमी फायनलच्या भागात शास्त्रीय नृत्य आणि लावणीचा नजराणा प्रेक्षकांना मिळणार आहे. कथ्थक, कुचीपुडी आणि भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यांचा नजराणा आणि लावणी यांची जुगलबंदी रंगणार आहे 'ढोलकीच्या तालावर घुंगरांच्या बोलावर मध्ये.आगामी भागात हिंदी आणि मराठी मालिका आणि चित्रपटात काम करणारी तसेच कथ्थक या शास्त्रीय नृत्यात पारांगत असलेली अभिनेत्री, नृत्यांगणा प्राची शहा स्पेशल ज्युरी म्हणून येणार आहेत.
No comments:
Post a Comment