'नटसम्राट' म्हणून रसिक मान्यता मिळविणारे जेष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू
यांचे प्रदीर्घ काळानंतर रसिकांना मोठ्या पडद्यावर सुखद दर्शन होणार आहे.
आरभाट निर्मिती कृत व प्रवीण मसालेवाले यांच्या 'मसाला ' या आगामी चित्रपटात डॉक्टर श्रीराम लागू एका 'अत्तरवाल्याच्या' भूमिकेत दिसणार असून यानिमिताने त्यांच्या अभिनयाचा सुगंध पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दरवळणार आहे. 'मसाला' चे क्रिएटिव्ह प्रोड्युसर उमेश कुलकर्णी, अभिनेते - कथालेखक गिरीश कुलकर्णी व दिग्दर्शक संदेश कुलकर्णी या 'कुलकर्णी त्रयींनी' ही किमया साध्य केली आहे. बुजुर्ग कलावंतांची कलेवरची निष्ठा, त्यांची कामाची शिस्त आणि कामाकडे पाहण्याची दृष्ठी खूपच प्रेरणा देणारी असते असे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर उमेश कुलकर्णी यांचे प्रामणिक मत आहे. त्यामुळे त्यांच्या या पूर्वीच्या चित्रपटातही चंद्रकांत गोखले ( वळू ). विठ्ठल उमप ( विहीर ) , नसिरुदिन शहा ( देऊळ ) , हे बुजुर्ग कलावंत छोट्या छोट्या पण महत्वाच्या भूमिकेत पडद्यावर दिसले होते. आणि आता 'मसाला' या आगामी चित्रपटात डॉक्टर लागू 'हद्रीस भाई' नावाच्या एका 'अत्तरवाल्याच्या' भूमिकेत दिसणार आहेत.
No comments:
Post a Comment