'संस्कृती कला दर्पण' चित्रपट महोत्सवाच्या दुसर्या दिवशी आजचा चित्रपट, जाहिरात आणि प्रमोशन या विषयावर चर्चा सत्र आयोजित केले होते. या चर्चा सत्रात अभिनेता मिलिंद गवळी, निर्माता दिग्दर्शक विजू माने, निर्माती दिग्दर्शका कांचन अधिकारी, पत्रकार अमित भंडारी, जनसंपर्क व्यवसायिक गणेश गारगोटे, मराठीमुव्हीवर्ल्ड डॉट कॉमचे संचालक श्री. जितेंद्र मोरे व डिझायनर मिलिंद मटकर आदी मान्यवरांचा सहभाग होता. या चर्चा सत्रात जाहिरात आणि प्रमोशन या विषयाचे विविध अंगी चर्चा करुन चित्रपट कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहचवला जाईल या विषयी ऊहापोह झाला.
हिंदी चित्रपटाची नक्कल केल्यामुळे मराठी चित्रपट फसतात ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाहीत असे प्रतिपादन दिग्दर्शक विजु माने यांनी केले. हॉलिवूड आणि बॉलीवुडच्या स्पर्धेत मराठी चित्रपटांने टिकण्यासाठी प्रमोशन आणखी मोठ्या स्तरावर केले पाहिजे असे प्रतिपादन गणेश गारगोटे यांनी केले. मराठीमुव्हीवर्ल्डचे संस्थापक श्री.जितेंद्र मोरे यांनी ऑनलाईन प्रमोशन या विषयावर बोलताना सांगितले कि "आपल्या इंडस्ट्री मधील कलाकार आणि तंत्रज्ञांना इंटरनेट ह्या माध्यमाची प्रमोशनसाठी हवी तितकी पुरेशी माहिती नाही. आज इंग्लिश आणि हिंदी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यातील कलाकार, दिग्दर्शक हे इंटरनेट चा प्रभावी वापर करत असताना मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार आणि निर्मात्यांनीही त्याचे महत्व जाणून घेण्याची गरज आहे. ऑनलाईन प्रमोशन म्हणजे फक्त वेबसाईट बनवणे किंवा सोशल नेटवर्किंग साईटवर आपले पेज बनवणे एवढेच नाही तर ते प्रॉपर स्ट्रॅटेजी आखून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून आपल्या प्रेक्षकांना एन्गेज कसे ठेवावे ते आहे." आणि हे सगळ करण्यासाठी मराठीमुव्हीवर्ल्ड डॉट कॉम कसे फायद्याचे आहे हे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.
निर्मात्याने आपला प्रेक्षक वर्ग निश्चित करायला हवा चित्रपट जर मल्टिप्लेक्ससाठी असेल आणि त्याचे प्रमोशन जत्रेत केले तर त्याचा काही फायदा होत नाही. आपल्याकडे मोठया नावाचे हिरो नाहीत त्यामुळे प्रमोशन जोरात करायला पाहिजे. असा आपला वेगळा ठसा निर्माती - दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी उमटवला. या चर्चासत्रास प्रेक्षकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
No comments:
Post a Comment