Thursday, April 28, 2011

'मी मराठी'वर ९ मे पासून नवी मालिका 'फिरुनी नवी जन्मेन मी'

मी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या थेट हृदयाला भिडणारी नवी मालिका 'फिरुनी नवी जन्मेन मी' सोमवार दि ९ मे पासून दररोज संध्याकाळी ७.३० वा. घेऊन येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे निर्मित 'फिरुनी नवी जन्मेन मी' ही मालिका कोकणातल्या देवबाग या गावात घडते. मालिकेची कथा आणि घटना कोकणातल्या पार्श्वभूमीची असल्याने या मालिकेचे चित्रीकरणही मालवण मध्ये देवबाग आणि तारकर्ली येथे करण्यात आले आहे.

या मलिकेची कथा-पटकथा आहे शिरीष लाटकर यांची तर संवाद सुषमा बक्षी यांचे आहेत. दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचे आहे.  या मालिकेत शरद पोंक्षे, प्राजक्ता माळी, गौतम रेड्डी यांच्यासह शीतल क्षीरसागर, वंडना वाकनीस, दिपक करंजीकर आदि कलाकार आहेत. 

No comments:

Post a Comment