Thursday, April 21, 2011

२५ एप्रिलपासून 'मी मराठी' वर येणार आहे 'अनोळखी'.

रहस्यमय कथांच्या घोडदौडीत 'मी मराठी' वाहिनी घेऊन येत आहे नवीन मालिका 'अनोळखी'. कॅम्स क्लब निर्मित चंद्रकांत गायकवाड दिग्दर्शित ह्या मालिकेचे क्रिएटिव्ह हेड स्वतः राकेश सारंग आहेत. मालिकेची कथा-पटकथा चिन्मय मंडलेकरची असून संवाद अंबर हडप यांचे आहेत. 

आनंद अभ्यंकर, उमा सरदेशमुख, संयोगिता भावे, सविता मालपेकर असे जुने कलाकार तसेच पूजा कदम आणि नकुल घाणेकर या नव्या चेहर्‍यांच्या यात प्रमुख भुमिका आहेत. अनोखी रहस्यमय मालिका 'अनोळखी' २५ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ वाजता मी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment