किरण यज्ञोपवित दिग्दर्शित हा पहिलाच चित्रपट असून चित्रपटाची कथा सौरभ भावे यांची आहे. चित्रपटाची पटकथा किरण यज्ञोपवित व सौरभ भावे यांनी लिहीली आहे. संवादलेखन सुद्धा किरण यज्ञोपवित यांचेच आहे. छायाचित्रण प्रसिद्ध कॅमेरामन सुधीर पळसाने यांनी केले आहे. संगीत नंदू घाणेकर यांचे असून पार्श्वसंगीत नरेंद्र भिडे यांचे आहे.
या चित्रपटात सचिन खेडेकर यांच्यासोबत अश्विनी गिरी, किशोर कदम, विनय आपटे, शुभांगी जोशी, मिलिंद फाटक, जयवंत वाडकर, सुनील देव, शशांक शेंडे आदी कलाकारांच्या भुमिका आहेत. तसेच इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर ए दोन बालकलाकार सुद्धा आहेत.
No comments:
Post a Comment