ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर विष्णुशास्त्री पणशीकर यांचे गुरुवारी रात्री पुण्यात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. ते गेली ६ दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत होते. त्यांनी जवळपास ४०पेक्षा अधिक नाटके गाजवली. 'तो मी नव्हेच' मध्ये त्यांनी साकारलेल्या लखोबामुळे त्या नाटकाचे २८०० विक्रमी प्रयोग झाले. या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी पाच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
'तो मी नव्हेच' व्यतिरीक्त त्यांची 'अश्रुंची झाली फुले', 'इथे ओशाळला मृत्यु', 'भटाला दिली ओसरी', 'इथे गवतात भाले फुटतात', 'थँक यु मि. ग्लॅड' अशा अनेक नाटकातल्या त्यांच्या भुमिका गाजल्या. तसेच त्यांची स्वतःची 'नाट्यसंपदा' ही नाट्यनिर्मिती संस्था सुद्धा ते चालवत होते. ' कट्यार काळजात घुसली', 'अंधार माझा सोबती' अशा काही नाटकांची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या सर्व नाटकांचे मिळून ८००१ शो झाले होते यातून ते रंगभूमीच्या किती जवळचे होते ते दिसते.
त्यांना 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार', 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार', 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' अशा अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

No comments:
Post a Comment