या सोहळ्याची सुरुवात 'आयडिया सारेगमप- लिटल चॅम्प्स' च्या या पर्वातील सगळ्या चॅम्प्सनी 'लाभले आम्हास भाग्य' या सुरेश भट यांच्या आणि कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेल्या अभिमानगीताने दमदारपणे केली.
शुभम खंडाळकर, वेदा नेरुरकर, अदिती आमोणकर, शरयु दाते आणि पद्मनाभ गायकवाड या पाचही लिटल चॅम्प्सनी स्वरांची चौफेर आतषबाजी केली. मात्र स्वरांच्या या पंचरंगी आतषबाजीत 'आयडिया सारेगमप- लिटल चॅम्प्स' च्या या पर्वाचा बाजीगर ठरला शुभम खंडाळकर!
No comments:
Post a Comment