'गुलदस्ता' या धमाकेदार विनोदी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अरविंद जगताप यांनी लिहीले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांनी केले आहे. या चित्रपटाला त्यागराज खाडिलकर यांचे संगीत असून मनीषराज यांच्या गीतांना अमृता नातू आणि त्यागराज खाडीलकर यांनी स्वरबद्ध केले आहे.
मकरंद अनासपुरे आणि जितेंद्र जोशी यांची कॉमेडीची जुगलबंदी ही प्रेक्षकांना तिगुळाचा गोडवा चाखून जाईल. या चित्रपटाद्वारे तेजस्विनी लोणारी ही नवोदित अभिनेत्री मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. यापुर्वी तिने 'द्रौपदी' या हिंदी मालिकेत द्रौपदीची भूमिका रंगवली होती. उदय टिकेकर, सागर तळाशीकर, मंगेश सातपुते, परि तेलंग, मेधा भागवत, विशाखा सुभेदार आणि सयाजी शिंदे यांच्या भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment