या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या 'शुभंकर श्रीगणेशा', 'झिम्म्ड झिम्मड' आणि 'सावळ्या घना' या तीन म्युझिक अल्बमचे प्रकाशन अनुक्रमे डॉ. विजया वाड, देवकी पंडित व सुरेश वाडकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप कोकिळ व स्मिता गवाणकर यांनी केले.
Friday, August 26, 2011
'स्वर -७१' अशोक पत्कींसाठी वाढदिवसाची भेट.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या 'शुभंकर श्रीगणेशा', 'झिम्म्ड झिम्मड' आणि 'सावळ्या घना' या तीन म्युझिक अल्बमचे प्रकाशन अनुक्रमे डॉ. विजया वाड, देवकी पंडित व सुरेश वाडकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप कोकिळ व स्मिता गवाणकर यांनी केले.
Wednesday, August 24, 2011
आयुष्य चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.
चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन स्वतः अभिजीत पाटील करणार आहे. राजा कांबळे यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले असून कलाकार आणि इतर तंत्रज्ञांची निवड होऊन गणेशोत्सवानंतर चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होणार आहे.
Wednesday, August 10, 2011
'कोण आहे रे तिकडे'चा वर्ल्ड टिव्ही प्रिमिअर.
मस्त चाललंय आमचं, गैर, मी सिंधुताई सपकाळ, कदाचित अशा विविध विषयांवरील लोकप्रिय आणि नवीन ब्लॉकबस्टर चित्रपटांचा नजराणा झी मराठीने 'झी मराठी प्रिमीयर' मधून घरबसल्या दिला. आता 'झी मराठी प्रिमीयर' घेऊन येत आहे 'कोण आहे रे तिकडे! ' रविवारी १४ ऑगस्टला रोजी संध्या ७ वाजता.
अंबिका पिक्चर्स निर्मित 'कोण आहे रे तिकडे' या चित्रपटाचे निर्माते आहेत दिपक भोसले आणि दिग्दर्शक आहेत तानाजी एम. घाडगे. अरविंद जगताप यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहीली आहेत तर हृषिकेश कामेरकर यांनी पार्श्वगायन केले आहे. डॉ. मोहन आगाशे,सुबोध भावे आणि शुभांगी गोखले या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर मोहन जोशी, शरद पोंक्षे, मंगेश देसाई, हेमांगी कवी, स्मिता तांबे अशी तगडी कलाकार मंडळी मजेदार भूमिकेत दिसतील.
Monday, August 8, 2011
'मोरया' १९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला.
'ए स्क्वेअर एण्टरटेनमेंट' निर्मित 'मोरया' ह्या चित्रपटात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील वैचारिक आणि आर्थिक विरोधाभास, या मंडळांचं अंतर्गत राजकारण आणि संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल. यामध्ये संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, दिलेप प्रभावळकर, पुष्कर श्रोत्री, गणेश यादव, परी तेलंग आणि स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Saturday, August 6, 2011
'हर्बेरिअम' उपक्रमातील चौथ नाटक 'आंधळ दळतंय' १३ ऑगस्टला रंगभूमीवर.
या नाटकाचे वैशिष्टय म्हणजे शाहिर साबळे यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे याचे दिग्दर्शन करीत आहे. त्याकाळी साबळेंनी वठवलेली सूत्रधाराची भूमिकादेखील केदार शिंदे यात साकारणार असून राजा मयेकर आणि सुहास भालेकर या कलावंतांच्या जागी डॉ. निलेश साबळे व संजय इंगळे ही नवी जोडगोळी दिसणार आहे. यांच्यासोबत प्रिया बेर्डेही यात भूमिका करणार आहे.
गण, गवळण, बतावणी, गीते, पोवाडे, नृत्य असे भरगच्च नाट्य असलेला 'आंधळ दळतंय' हे नाटक नक्केच हटके ठरणार असून मयूर वैद्य याचे नृत्यदिग्दर्शन करीत आहेत. नाटकाचे संगीत शाहीर साबळे यांचे असून त्याचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर करणार आहेत. नेपथ्य प्रदिप मुळ्ये यांचे असून प्रकाश योजना शितल तळपदे यांची आहे.
'उचल्या' आता रुपेरी पडद्यावर....
वर्णव्यवस्थेने व समाजव्यवस्थेने नाकारलेल्या या समाजाला शेकडो वर्षे पशुतुल्य जीवन जगण्यास भाग पाडण्यात आले. उपजीविकेची सर्व साधने बंद झाल्यामुळे 'चोरी करुन जगणे' हाच समाजापुढे एक पर्याय राहिला. 'उचल्या' कादंबरीची दाहकता मराठी रुपेरी पडद्यावर आणण्याकरिता निर्माते अमर कक्कड आणि पुष्पा कक्कड यांची 'अक्षरा फिल्मस अँड डिव्हिजन' या निर्मिती संस्थेने या कादंबरीचे हक्क मिळवून यावर मराठी चित्रपट निर्मिती करण्याचे ठरविले असून चित्रपटाचे दिग्दर्शन समित कक्कड करणार आहेत. सप्टेंबर अखेरीस चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.
Friday, August 5, 2011
'साद' कौटुंबिक चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.
या चित्रपटाची कथा महेश राज व पटकथा संवाद आनंद मोरे यांचे आहेत. चित्रपटाचे छायांकन अरुण फसलकर यांचे तर कला दिग्दर्शन राज कांबळे परभणीकर आहे. गीतकार, प्रविण दवणे व विश्वनाथ इवलेकर यांनी गीते लिहीली असून संगीत विवेक अस्ताना यांचे आहे.
या चित्रपटात प्रमुख भुमिकेत सागर तळाशिकर, भुषण कडू, नुतन जयंत, डॉ. सतीश सुर्यवंशी, ज्योती जोशी, आसावरी तांरे, प्रकाश धोत्रे हे कलाकार आहेत. निर्माते आणि दिग्दर्शकांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)