Wednesday, August 10, 2011

'कोण आहे रे तिकडे'चा वर्ल्ड टिव्ही प्रिमिअर.


मस्त चाललंय आमचं, गैर, मी सिंधुताई सपकाळ, कदाचित अशा विविध विषयांवरील लोकप्रिय आणि नवीन ब्लॉकबस्टर चित्रपटांचा नजराणा झी मराठीने 'झी मराठी प्रिमीयर' मधून घरबसल्या दिला. आता 'झी मराठी प्रिमीयर'  घेऊन येत आहे 'कोण आहे रे तिकडे! ' रविवारी १४ ऑगस्टला रोजी संध्या ७ वाजता.

अंबिका पिक्चर्स निर्मित 'कोण आहे रे तिकडे' या चित्रपटाचे निर्माते आहेत दिपक भोसले आणि दिग्दर्शक आहेत तानाजी एम. घाडगे. अरविंद जगताप यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहीली आहेत तर हृषिकेश कामेरकर यांनी पार्श्वगायन केले आहे. डॉ. मोहन आगाशे,सुबोध भावे आणि शुभांगी गोखले या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर मोहन जोशी, शरद पोंक्षे, मंगेश देसाई, हेमांगी कवी, स्मिता तांबे अशी तगडी कलाकार मंडळी मजेदार भूमिकेत दिसतील.

No comments:

Post a Comment