Saturday, August 6, 2011

'उचल्या' आता रुपेरी पडद्यावर....

इंग्रजी, हिंदी, तेलगू, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषांत अनुवादित आणि साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरविलेल्या 'उचल्या' या कादंबरीने मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवली. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गायकवाड लिखित 'उचल्या' या कादंबरीने पिडीत, शोषित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक चळवळच उभारली. 

वर्णव्यवस्थेने व समाजव्यवस्थेने नाकारलेल्या या समाजाला शेकडो वर्षे पशुतुल्य जीवन जगण्यास भाग पाडण्यात आले. उपजीविकेची सर्व साधने बंद झाल्यामुळे 'चोरी करुन जगणे' हाच समाजापुढे एक पर्याय राहिला. 'उचल्या' कादंबरीची दाहकता मराठी रुपेरी पडद्यावर आणण्याकरिता निर्माते अमर कक्कड आणि पुष्पा कक्कड यांची 'अक्षरा फिल्मस अँड डिव्हिजन' या निर्मिती संस्थेने या कादंबरीचे हक्क मिळवून यावर मराठी चित्रपट निर्मिती करण्याचे ठरविले असून चित्रपटाचे दिग्दर्शन समित कक्कड करणार आहेत. सप्टेंबर अखेरीस चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.

No comments:

Post a Comment