Wednesday, October 3, 2012

५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात 'साद'.

Anlesh Desai, Avantika, Saad Marathi Film
मानवी नात्यातील हळूवार भावनिक बंधावर बेतलेल्या कथानकावर 'अभिरुची फिल्मस' ही निर्मिती संस्था 'साद' हा पहिला मराठी चित्रपट घेऊन निर्मिती क्षेत्रात प्रवेश करीत आहे. प्रदर्शनासाठी सज्ज असलेला हा चित्रपट ५ ऑक्टोबरला राज्यात प्रदर्शित होत आहे.

हेमंत दाभाडे निर्मित, दिग्दर्शित 'साद' या चित्रपटातून अनलेश देसाई आणि अवंतिका सालियन ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर झळकतेय. सोबत यतीन कार्येकर, अरुण नलावडे, इला भाटे, प्रसाद पंडित, रवी पटवर्धन, संजीवनी जाधव, भाग्यश्री राणे, विवेक पांडकर, यशवंत चोपडे, मयूर पवार, रेधी ही अनुभवी- नवोदित स्टार कास्ट या चित्रपटात एकत्र आली आहे. चित्रपटाचे एक आकर्षण म्हणजे यातील काही प्रसंगांचे चित्रीकरण मलेशियातील निसर्गरम्य परिसरात करण्यात आले आहे. 

चित्रपटाची कथा आनंद म्हसवेकर यांनी लिहिली असून पटकथा आणि विस्तार अभिनेते दिपक देऊलकर आणि आरती देसाई यांनी केले आहे. संवाद दिपक देऊलकर आणि आनंद म्हसवेकर यांनी लिहिले आहेत. ५ ऑक्टोबरला 'साद' चित्रपटगृहात दाखल होत आहे.

No comments:

Post a Comment