Friday, August 5, 2011

'साद' कौटुंबिक चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

'साद' या एम. बी. प्रॉडक्शन प्रस्तुत आणि दिग्दर्शक महेश देशपांडे व महेश राज निर्मित कौटुंबिक चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. हृदयस्पर्शी हळूवार कथानक असलेल्या या कौटुंबिक चित्रपटाला विनोदाची फोडणी दिली आहे. सध्या मराठीत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट निर्मिती केली जात असून 'साद' या चित्रपटाचे कथानक एका नाविन्यपूर्ण विषयावर बेतलेले आहे. 

या चित्रपटाची कथा महेश राज व पटकथा संवाद आनंद मोरे यांचे आहेत. चित्रपटाचे छायांकन अरुण फसलकर यांचे तर कला दिग्दर्शन राज कांबळे परभणीकर आहे. गीतकार, प्रविण दवणे व विश्वनाथ इवलेकर यांनी गीते लिहीली असून संगीत विवेक अस्ताना यांचे आहे. 

या चित्रपटात प्रमुख भुमिकेत सागर तळाशिकर, भुषण कडू, नुतन जयंत, डॉ. सतीश सुर्यवंशी, ज्योती जोशी, आसावरी तांरे, प्रकाश धोत्रे हे कलाकार आहेत. निर्माते आणि दिग्दर्शकांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment