Monday, August 8, 2011

'मोरया' १९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला.

'झेंडा' च्या यशानंतर अवधूत गुप्तेंचा 'मोरया' १९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विषयाचं वेगळेपण आणि तगडी स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाच्या ध्वनिफीत प्रकाशनाचा सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात मुंबईच्या आजीवसन सभागृहात पार पडला. याप्रसंगी सचिन पिळगावकर, एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट्चे प्रमुख संजय छाब्रिया, चित्रपटाचे निर्माते अतुल कांबळे, कार्यकारी निर्माते हेमेंद्र कुलकर्णी, छायाचित्रकार राहुल जाधव आणि दिग्दर्शक अवधुत गुप्ते यांच्यासह चित्रपटातील कलाकार, गायक आणि तंत्रज्ञांची टिम उपस्थित होती.

'ए स्क्वेअर एण्टरटेनमेंट' निर्मित 'मोरया' ह्या चित्रपटात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील वैचारिक आणि आर्थिक विरोधाभास, या मंडळांचं अंतर्गत राजकारण आणि संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल. यामध्ये संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, दिलेप प्रभावळकर, पुष्कर श्रोत्री, गणेश यादव, परी तेलंग आणि स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

No comments:

Post a Comment