Saturday, August 6, 2011

'हर्बेरिअम' उपक्रमातील चौथ नाटक 'आंधळ दळतंय' १३ ऑगस्टला रंगभूमीवर.

शाहीर साबळे यांनी १३ ऑगस्ट १९६६ साली रंगमंचावर आणलेल्या 'आंधळ दळतंय' या मुक्तनाटकाला महाराष्ट्राने उदंड प्रतिसाद दिला आहे. मुंबईतील मराठी माणसाचा प्रश्न या नाटकाद्वारे साबळे यांनी पहिल्यांडा मांडला होता. ४५ वर्षापूर्वी अवघा महाराष्ट्र या नाटकामुळे पेटून उठला होता. शिवसेना स्थापन होण्याला कारणीभूत ठरलेलं हे नाटक तेव्हाच्या सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे होते. आज भले संदर्भ बदलले असले, तरी परिस्थिती तीच आहे. त्यामुळे या काळातही हे नाटक तितकेच प्रभावी ठरणार आहे. म्हणूनच आता तब्बल ४५ वर्षानंतर तीच धग... तोच जोश घेऊन सुनील बर्वे यांच्या 'हर्बेरिअम' उपक्रमातील चौथ नाटक त्याच तारखेचा बेत साधून १३ ऑगस्टला पुन्हा रंगभूमीवर येत आहे.

या नाटकाचे वैशिष्टय म्हणजे शाहिर साबळे यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे याचे दिग्दर्शन करीत आहे. त्याकाळी साबळेंनी वठवलेली सूत्रधाराची भूमिकादेखील केदार शिंदे यात साकारणार असून राजा मयेकर आणि सुहास भालेकर या कलावंतांच्या जागी डॉ. निलेश साबळे व संजय इंगळे ही नवी जोडगोळी दिसणार  आहे. यांच्यासोबत प्रिया बेर्डेही यात भूमिका करणार आहे. 

गण, गवळण, बतावणी, गीते, पोवाडे, नृत्य असे भरगच्च नाट्य असलेला 'आंधळ दळतंय' हे नाटक नक्केच हटके ठरणार असून मयूर वैद्य याचे नृत्यदिग्दर्शन करीत आहेत. नाटकाचे संगीत शाहीर साबळे यांचे असून त्याचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर करणार आहेत. नेपथ्य प्रदिप मुळ्ये यांचे असून प्रकाश योजना शितल तळपदे यांची आहे.

No comments:

Post a Comment