Wednesday, April 20, 2011

'मी मराठी' वाहिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऍनिमेटेड चित्रपट मराठीत.

Animated Marathi films, kids marathi movie


उन्हाळ्याच्या सुट्टीचे औचित्य साधून 'मी मराठी वाहिनीने' बाल दोस्तांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकाहून एक सरस असे बाल चित्रपट या महोत्सवात प्रसारीत करण्याचे ठरविले आहे. २५ एप्रिलपासून दररोज सकाळी १० वाजता 'मी मराठी वाहिनी'वरुन हे गाजलेले चित्रपट दाखविले जाणार आहेत. या चित्रपटांमध्ये सिंदबाद, अलिबाबा, सिंड्रेला अशा चित्रपटांचा समावेश आहे.
२५ एप्रिल - सिंदबाद
२६ एप्रिल - अलिबाबा
२७ एप्रिल - मुलान
२८ एप्रिल - ब्युटी अँड द बीस्ट
२९ एप्रिल - द हन्चबॅक ऑफ नोट्ररी
३० एप्रिल - द पाईप पाइपर ऑफ हॅमलिन
१ मे - द एम्परर्स न्यू क्लोदस
२ मे - गोल्डीलॉक्स
३ मे - पस इन द बुट्स
४ मे - ऍना अँड द किंग
५ मे - थ्री लिटिल पिग्स
६ मे - द काऊंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो
७ मे - इस्टर इन द बनिलॅंड
८ मे - प्रिन्स ऑफ नाईल -मोजेस
९ मे - पोकाहान्टोज
१० मे - द न्यू ऍडव्हेंचर रॉबिनहुड
११ मे - डी ४ द ट्रोजन डॉग
१२ मे - अनास्तासिया
१३ मे - सिंड्रेला
१४ मे - हॅन्सल अँड ग्रीटल
१५ मे - द न्यू ऍडव्हेंचर ऑफ विल्यम टेल्स
१६ मे - हर्क्युलस
१७ मे - द लिटिल मरमेड
१८ मे - फ्रँक आइंस्टाइन
१९ मे - थंबेलिना

Saturday, April 16, 2011

'ज्ञानेश्र्वरी एक्सप्रेस' येणार २२ एप्रिल रोजी.

निर्माते अनिल पत्याणे यांच्या नवलाई क्रिएशनची निर्मिती असलेला 'ज्ञानेश्र्वरी एक्सप्रेस' २२ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक प्रकाश पांचाळ दिग्दर्शित आणि लिखित ह्या चित्रपटाला सत्यघटनेची पार्श्वभूमी आहे. मनाला भिडणार्‍या या चित्रपटाची पटकथा प्रकाश पांचाळ आणि तेजेश घाडगे यांची असून संवाद लेखन तेजेश घाडगे यांनी केले आहे. श्रीकांत नरुले यांनी लिहिलेल्या गीतांना बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केले आहे. 

या चित्रपटात कोकणातील निसर्गरम्य पार्श्वभूमी पहायला मिळणार आहे आणि मार्लेश्र्वराच्या गुहेतील एक दृश्य लाईट न वापरता मंदिरातील समईच्या मिणमिणत्या प्रकाशात कॅमेरामन जीतू आचरेकर यांनी टिपले आहे. संकलन दिलीप दरक, नृत्ये अनिल सुतार यांची तर सदाशिव चव्हाण या चित्रपटाचे निर्मिती प्रमुख आहेत.

या चित्रपटात डॉ. गिरीश ओक, शरद पोंक्षे, आनंद अभ्यंकर, अश्विनी एकबोटे, शांता तांबे, मंजुषा गोडसे, अक्षया भिंगार्डे, अनिरुद्ध बनकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. निशा परुळेकर, विनोद पंडीत आणि भुषण कडु यांनी या 'ज्ञानेश्र्वरी एक्सप्रेस' मध्ये पाहुणे कलाकार म्हणून काम केले आहे.

लवकरच येणार 'मामाच्या राशीला भाचा'.......

Mohan Joshi, Siddharth Jadhav
एम. एस. मुव्हीज प्रस्तुत बद्रीश फिल्म निर्मित 'मामाच्या राशीला भाचा' हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. प्रमोद रामचंद्र जोशी यांनी सांभाळली असून या चित्रपटाचे निर्माते महादेव सांगळे आणि मनोज मांढरे आहेत. 

हा एक मल्टीस्टारर चित्रपट असून यात सिद्धार्थ जाधव, स्नेहा मक्ष्मेश्वर, मोहन जोशी, विजय पाटकर, पॅडी कांबळे, विजय गोखले, नुतन जयंत, वंदना वाकनीस, सुनिल गोडबोले व लावणी नृत्यांगणा नेहा लखनगावकर हे कलाकार आहेत. ह्या चित्रपटाचे शिर्षक गीत सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने गायले आहे. त्याच बरोबर उत्तरा केळकर, चंद्रशेखर गाडगीळ, योगीता पाठक व संदीप उबाळे यांनी सुद्धा या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे.  जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे. संतोष फुटाणे यांनी कला दिग्दर्शन केले असून राजेश बिडवे यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.

Thursday, April 14, 2011

लेट्स गो बॅक (परत फिरा रे) १५ एप्रिलला प्रदर्शित होणार.

'सुर्य एंटरटेन्मेंट' पुणे, बॅनरखाली निर्माते प्रमोद गोरे यांनी 'लेट्स गो बॅक' (परत फिरा रे...) ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बच्चे कंपनी आणि त्यांच्या पलकांच्या मनोरंजनाच्या हेतूने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याने सुट्टीच्या काळात म्हणजेच १५ एप्रिलला हा चित्रपट पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली व औरंगाबाद येथे प्रदर्शित होत आहे. प्रमोद गोरे यांनी अशोक राऊत यांच्या समवेत या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कथा, पटकथा, संवाद व गीते स्वतः प्रमोद गोरे यांनी लिहीली आहेत.

या चित्रपटात निलय गायकवाड, रोनक लांडगे, उन्मेश पाध्ये, सत्या यादव व तेजा जाधव यांच्यासह भाग्यश्री राणे, शिल्पा गोंजारे, रश्मी पांढरे अशा बर्‍याच कलाकारांचा आणि शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या चित्रपटाच छायांकन जितू आचरेकर आणि नृत्य दिग्दर्शन अनिल सुतार आणि संकलन संतोष गोठोस्कर यांच आहे.

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'संहिता' चित्रीकरण अंतिम टप्प्यात.

अशोक डामरे आणि निखिल रमेश सोरटे यांच्या 'अशोक मव्हीज प्रा. लि.' यांची निर्मिती असलेला आणि सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला बारावा चित्रपट 'संहिता' लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'संहिता' या चित्रपटात मिलिंद सोमण, देविका दफ्तरदार आणि राजेश्वरी सचदेव हे तीन प्रमुख कलाकार असून त्यांच्यासोबत उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, अश्विनी गिरी, डॉ. शरद भुताडिया, डॉ. शेखर कुलकर्णी आणि सारंग साठे असे कलाकार आहेत. 

'संहिता' चे कथा, पटकथा, संवादलेखन सुमित्रा भावे यांचे तर यातली गीतरचना सुनील सुकथनकर यांनी केलेली आहे. दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचे आहे. छायाचित्रण संजय मेमाणे यांचे आहे तर संकलक नीरज वोरालिया आहेत. कला दिग्दर्शन संतोष शखद, वेशभूषा गीता गोडबोले आणि ध्वनिसंयोजन अनमोल भावे यांचे आहे. शैलेंद्र बर्वे यांच संगीत असून आरती अंकलीकर यांनी पार्श्वगायन केले आहे.

Tuesday, April 12, 2011

'देऊळ' पूर्णत्त्वाच्या मार्गावर.

Deool
दिलीप प्रभावळर, नाना पाटेकर आणि नसिरुद्दीन शाह एकत्रित काम करत असलेला चित्रपट 'देऊळ' सध्या चर्चेत आहे.  यांच्याशिवाय सोनाली कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, उषा नाडकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, ॠषिकेश जोशी, अतिशा नाईक, श्रीकांत यादव यांच्यासुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी या चित्रपटातील गाण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील वाठार येथे खास सेट उभारले आहेत. स्वानंद किरकिरे या गाण्यांचे गीतकार आहेत. या चित्रपटातील महत्त्वाच्या दृष्यांचे चाळीस दिवसांचे चित्रीकरण सत्र नुकतेच पूर्ण झाले. गिरीश कुलकर्णी लिखित आणि उमेश कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Friday, April 8, 2011

'इचार ठरला पक्का' या चित्रपटाच्या गाण्यांच्या सीडीचे अनावरण.

Raj Thakarey, Ichar Tharala Pakka
'इचार ठरला पक्का' या चित्रपटाच्या गाण्यांच्या सीडीचे अनावरण नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, दिग्दर्शक मधुर भंडारकर, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगावकर तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या तसेच निर्मात्या सुनंदा पवार आणि चित्रपटातील कलाकार मंडळी यांचं अभिनंदन केलं. तसेच मधुर भंडारकरांनी चित्रपटाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

सामाजिक आशयाला फॅण्टसीची जोड देऊन लिहिण्यात आलेल्या कथानकावर आधारीत असलेल्या 'इचार ठरला पक्का' साठी सुप्रसिद्ध संगीतकार हरिशंकर यांनी संगीत दिले आहे. गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या जोडीला डॉ. प्रमोद बेजकर आणी मंडार चोलकर यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केले आहे. वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, अभिजीत कोसंबी, डॉ, नेहा राजपाल यांनी ही गाणी स्वरबद्ध केली आहेत.

गंगोत्री क्म्बाईन्सच्या बॅनरच्या सौ. सुनंदा रामराव पवार निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोहर सरवणकर यांनी केले आहे. चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद प्रदीप कबरे यांनी लिहिले आहेत. भरत जाधव, प्राची शाह यांच्यासोबत प्रदीप कबरे, विजय चव्हाण, आशिष पवार, किरण, विभा बोके, सुहास भालेकर, रेखा बडे, तेजश्री आणी दिप्ती आहिर यांच्या ही या चित्रपटात भूमिका आहेत.